Tur Market Rate: तुरीच्या दरात क्विंटलमागे झाली 300 ते 500 रुपयांची वाढ! मे महिन्यात टिकतील का तुरीचे भाव? शेतकऱ्यांनी तूर विकावी का थांबावे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Market Rate:- सध्या राज्यातील अमरावती तसेच अकोला व नागपूर जिल्ह्यातील कळमना बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात सुधारणा पाहायला मिळत असून फेब्रुवारी महिन्यापासून दहा ते साडेदहा हजार रुपयांवर स्थिर असलेले तुरीचे दर आता वाढून बारा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

जर आपण कळमना बाजार समितीचा विचार केला तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला तुरीचे दर साधारणपणे प्रतिक्विंटल नऊ हजार ते दहा हजार सातशे पर्यंत होते. त्यानंतर देखील तुरीचे दर स्थिर राहिल्यामुळे पुढच्या कालावधीत तूर आवकेत वाढ झाली. या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तुरदारांमध्ये सुधारणा होईल अशी एक अपेक्षा होती. शेतकऱ्यांनी तुरीच्या विक्री एकावेळी न करता ती टप्प्याटप्प्याने करण्यावर भर दिला.

त्याचा फायदा शेतकऱ्यांना असा झाला की आता मार्च महिन्यानंतर तुरीच्या दरामध्ये चांगली वाढ झालेली बघायला मिळत असून तुरीचे दर सध्या 12000 रुपयांवर आहेत. मागच्या आठवड्यामध्ये तुरीच्या दरात तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली व त्यामुळे तुरीचा भाव आता अकरा ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे.

त्यामुळे आता तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे की या दरामध्ये तूर विकावी की आणखी भाववाढीची वाट पहावी? तसेच येणाऱ्या कालावधीत तुरीचे दर कसे राहू शकतात? त्यामुळे यासंबंधीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 तुरीच्या दरात झाली क्विंटलमागे तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ

सध्या राज्यातील बऱ्याच बाजारपेठांमध्ये तुरीचा भाव हा 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल च्या दरम्यान पोहोचल्याची स्थिती आहे. परंतु काही राज्यांमध्ये भाव पातळी ही वेगवेगळी आहे. उदाहरणच घेतले तर महाराष्ट्रामध्ये तुरीचा भाव हा 11 ते 12 हजार रुपये आहे व हीच परिस्थिती कर्नाटक मध्ये देखील आहे.

परंतु त्या तुलनेत मात्र मध्य प्रदेश व इतर राज्यांमध्ये मात्र तुरीचे भाव सरासरी दहा हजार रुपये प्रती क्विंटलच्या आसपास आहेत.जर आपण या दृष्टिकोनातून बघितले तर बाजारपेठेमध्ये आवक वाढली नसून गेल्या काही दिवसापासून कमी कमी होताना दिसून येत आहे. परंतु त्या तुलनेत मात्र तुरीला उठाव चांगला आहे.

तुरीच्या या वाढलेल्या बाजार भाव तुरीची विक्री करावी की आणखी भाव वाढण्याची वाट पहावी?

मार्च महिन्यामध्ये तुरीचे भाव वाढतील अशी एक अपेक्षा होती. परंतु सरकारची काही धोरणे आणि इतर कडधान्यांचे उतरलेले दर यामुळे तुरीचे दर पातळी 12,000 पर्यंत पोचली नव्हती. परंतु आता बऱ्याच बाजारपेठांमध्ये तुरीचे भाव 11 ते 12 हजार रुपये दरम्यान पोहोचलेले आहेत.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 12000 पर्यंत दर जाण्याची अपेक्षा होती अशा शेतकऱ्यांनी या बाजारभावात काही तूर विक्रीला काढण्यास काही हरकत नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना आणखी भाव वाढिची अपेक्षा आहे असे शेतकरी थांबू शकतात. ज्या शेतकऱ्यांना जास्त तेजीची अपेक्षा आहे परंतु काही तूर विक्री करायची असेल तर असे शेतकरी थोडीफार तूर विक्री याबाबत करू शकतात.

गेल्या काही महिन्यांपासून पाहिले तर तुरीच्या दरात थोडीफार वाढ झाली तर शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने तूर विक्रीचे धोरण स्वीकारले आहे. तसेच तुरीचे दर थोडेफार वाढले तर शेतकरी तूर विक्रीला आणतात व त्यामुळे आवक वाढून तुरीचे दर कमी देखील होतात. म्हणजेच तुरीच्या दरामध्ये चढ-उतार हे सुरूच राहणार आहे.

तसेच आता जे काही तूर अकरा ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील काही ॲक्शन मोडवर येईल अशी शक्यता दिसून येते. परंतु केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला तरी देखील तुरीचे भाव खूपच जास्त प्रमाणात कमी होतील अशी स्थिती सध्या नाही. परंतु यामुळे तात्पुरत्या स्वरूपातले चढ-उतार दिसू शकतात.  परंतु तूर उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारातील चढउतारावर लक्ष ठेवून विक्रीचे नियोजन करणे गरजेचे आहे.

 तुर बाजाराला चांगला आधार असण्याची कारणे

यावर्षी तुर बाजाराला चांगला आधार दिसून येत आहे. कारण यावर्षी उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात होणारी तुरीची आवक फारच कमी आहे. तसेच इतर देशांकडून आयात केली जाणारी तूर देखील महाग पडताना दिसून येत आहे. भारत हा म्यानमार या देशाकडून मोठ्या प्रमाणावर तूर आयात करतो व म्यानमार मध्ये देखील तुरीचे भाव वाढल्याची सध्या स्थिती आहे. त्यामुळे आपल्याकडे तुरीच्या बाजारभावाला चांगला आधार असून येत्या महिना-दोन महिन्याच्या कालावधीत देखील तुरीचे भावात झालेली सुधारणा अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.

 तुरीच्या भावात का झाली वाढ?

फेब्रुवारी महिन्याच्या आसपास तुरीच्या दरात काहीशी नरमाई आली होती. हरभरा तसेच मसूर आणि इतर कडधान्याच्या भावात देखील घसरण पाहायला मिळाली होती. त्याचाच दबाव तुरीच्या बाजारभावावर देखील दिसून येत होता. तसेच सरकारने देखील ॲक्शन मोडमध्ये येत काही पावले उचलली होती.

निवडणुका जाहीर होण्याच्या कालावधीत जर तुरीचे भाव जास्त असतील तर सरकार भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करेल अशी शक्यता या कालावधीत होती. त्याचप्रमाणे सरकारने हस्तक्षेप केला व त्यासोबतच इतर कडधान्यांचे कमी झालेले भाव यामुळे फेब्रुवारीमध्ये तुरीचे दर कमी होते. एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर मात्र इतर कडधान्याचे भावात देखील वाढ झाली. दुसरी बाब म्हणजे भारतामध्ये म्यानमार कडून मोठ्या प्रमाणावर तूर आयात केली जाते.

म्हणजेच एकंदरीत भारत जितकी तूर आयात करतो त्यामधील सर्वाधिक वाटा हा म्यानमारचा असतो. परंतु यावर्षी म्यानमारच्या तुरीचे भाव देखील वाढल्याची स्थिती आहे. त्यामुळे देशातील तूर बाजाराला आधार मिळताना दिसून येत आहे. त्यामुळे मागच्या आठवड्याभरापासून तुरीच्या दरात सुधारणा झाल्याची स्थिती आहे.

त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून देखील तुरीच्या बाजारभावाकडे बारकाईने लक्ष ठेवले जात असून तुरीचे भाव वाढल्यानंतर सरकारकडून तुरीचे व्यापारी तसेच विक्रेते इत्यादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो व अशा प्रकारातून तुरीचे भाव पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जातो. तुरीचे भाव 11 ते 12 हजार रुपये क्विंटल आहेत व तूर डाळीचे भाव 170 ते 200 रुपये किलोच्या दरम्यान आहेत.

त्यामुळे या सगळ्या स्थितीमुळे केंद्र सरकार काही पावले उचलेल अशी एक शक्यता दिसून येते. कारण निवडणुकीच्या तोंडावर ग्राहकांची नाराजी ओढवून घेणे सरकारला परवडणारे नाही. त्यामुळे या कालावधीत सरकार बाजारात हस्तक्षेप करण्याची दाट शक्यता आहे.

सध्याच्या स्थितीमध्ये सरकारकडे तुरीचे भाव कमी करता येईल अशा पद्धतीचे खूपच कमी पर्याय उपलब्ध आहेत. कारण या अगोदर सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी सर्व हातखंडे वापरून पाहिले. तरी देखील तुरीचे दर आता 12000 पर्यंत आहेत. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत तुरीच्या बाजारात घट होईल अशी शक्यता दिसून येत नाही.

परंतु तरीदेखील सरकार काही प्रयत्न करेलच व त्यामुळे काही चढ-उतार पाहायला मिळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून तूर विक्रीचे नियोजन करावे असा देखील सल्ला या क्षेत्रातील बाजार अभ्यासकांनी दिला आहे.