bal bothe latest news अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात बहुचर्चित ठरलेल्या रेखा जरे (Rekha Jare)यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे (Bal Bothe) याने तब्बल १ हजार २०० कोटी रुपयांची अवैध व बेनामी संपत्ती जमवली असल्याचा आरोप रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी केला आहे.

बोठेवर कायदेशीर कारवाई करावी ! बोठेच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक पटीने जमवलेल्या बेनामी संपत्तीची चौकशी करावी व अवैधरित्या जमवलेली संपत्ती जप्त करावी,

बोठेवर कायदेशीर कारवाई करावी अशा विविध मागण्या रुणाल जरे यांनी आयकर विभागाच्या आयुक्तांकडे केल्या आहेत.

विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता :- यासंदर्भात आयकर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बाळ बोठे

आणि पत्नी सविता बोठे यांच्या नावावर नगर, पुणे नाशिक,औरंगाबाद,सोलापूर या शहरांसह राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता असल्याची माहिती समजली आहे.

बोठे दांपत्याची मोठी गुंतवणूक :- राज्यातील विविध शहरांमधील नामवंत रुग्णालये, गृहनिर्माण प्रकल्प, व्यापारी संकुले (रिअल इस्टेट) यामध्ये बोठे दांपत्याची मोठी गुंतवणूक असल्याची चर्चा आहे.

मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल :- बोठेने विविध प्रकरणात लोकांना धमकावून (ब्लॅकमेलींग) मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केली असून या पैश्यातून नातेवाईक,मित्र यांच्या नावावर काही संपत्ती घेतली असल्याचा आरोप रुणाल जरे यांनी निवेदनात केला आहे.

कितीतरी अधिक पटीने संपत्ती जमा केली :- बोठेचा पत्रकार ते संपादक हा प्रवास पहाता,या पदांवर काम करताना बोठेला मिळत असलेल्या

वेतनाचा अंदाज बांधला असता बोठेने अवैध व अज्ञात मार्गाने ज्ञात उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक पटीने संपत्ती जमा केली असल्याचा दावा जरे यांनी निवेदनात केला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या सलगीचा बोठेने गैरवापर केला :- आपल्या पदाचा गैरवापर करून विविध प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन बोठेने अमर्याद संपत्ती गोळा केली आहे.

त्यासाठी राजकीय व्यक्ती, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या सलगीचा बोठेने गैरवापर केला असल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

…………………………………………………………..

बेनामी मालमत्ता म्हणजे काय?

बेनामी म्हणजे अशी मालमत्ता ज्याचे पैसे एक जण भरतो परंतु ती दुसऱ्याचे नावे असते. ज्या व्यक्तीच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते त्याला बेनामदार असे म्हणतात आणि त्या मालमत्तेला बेनामी म्हणतात.

ज्या व्यक्तीने ती मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसे खर्चले आहे तो खरा या मालमत्तेचा मालक असतो आणि ज्याच्या नावे संपत्ती असते तो नामधारी असतो. जो खरा मालक आहे त्यालाच त्या संपत्तीचा वापर करायला मिळतो अथवा त्यावर मिळणारे भाडे तो स्वतःकडे ठेवतो.

बेनामी मालमत्तेमध्ये या गोष्टींचा समावेश

१. पत्नीच्या किंवा मुलांच्या नावे असणारी स्थावर मालमत्ता. जी खरेदी करताना भरण्यात आलेल्या रकमेचे विवरण देता आले नाही, तसेच मालमत्ता खरेदी करण्यासाठी जो पैसा वापरण्यात आला आहे त्याचे स्रोत कोणते आहेत हे दाखविण्यास मालक असमर्थ ठरला तर ती बेनामी ठरू शकते.
२. जर ट्रस्ट किंवा संस्थेमार्फत घेतलेली अशी संपत्ती जी खरेदी करण्यासाठी जो पैसा वापरण्यात आला आहे त्याचा स्रोत काय आहे हे सांगता न येणे.
३. भाऊ, नातेवाईक किंवा आई-वडिलांच्या सोबत असणारी अशी स्थावर मालमत्ता जी खरेदी करण्यासाठी जो पैसा वापरण्यात आला आहे त्याचा स्रोत काय आहे याचे विवरण न देता येणे, याला देखील बेनामी संपत्ती म्हटले जाऊ शकते.