अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी आरोपींनी ४५ लाखांची सुपारी दिली होती.

अशी धक्कादायक माहिती NIAकडून कोर्टात देण्यात आली आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे हिरेन यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती.

असा मोठा खुलासा NIAकडून करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अटक झालेले आरोपी अत्यंत खतरनाक आहेत. तसेच ४ ते ५ साक्षीदारांना धमकी सुद्धा देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

परंतु त्यांच्या हत्येसाठी हे पैसे आरोपींना कुणी दिले, असा महत्त्वाचा सवाल येथे उपस्थित होत आहे. NIAने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी ४५ लाख रूपये देण्यात आले होते.

तसेच NIAने यासोबतच आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखीन ३० दिवसांचा अवधी मागितला होता. यापूर्वी कोर्टाने NIAला ९ जून रोजी शपथ पत्र दाखल करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला होता.

दरम्यान, हिरेन यांच्या हत्येसाठी फंडिंग कोणाकडून करण्यात आली, या गोष्टीचा तपास करण खूप महत्त्वाचं आहे. असं NIAने कोर्टाला सांगितलं आहे.