file photo
  1. अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- अनुसूचित जाती मधील १० वी मध्ये ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक व उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करता यावी या करिता विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजने अंतर्गत विशेष अर्थसाहाय्य देण्यात येत आहे.

ही योजना मार्च २०२१ मधील इयत्ता १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय/निमशासकीय सेवेत कार्यरत नसावा, यासाठी पालकांनी स्व-घोषणापत्र द्यावयाचे आहे.

सोबत विद्यार्थी/वडील यांचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, इयत्ता १० वी चे गुणपत्रक, रहिवाशी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापक यांचे शिफारस पत्र इत्यादी दस्ताऐवज कागदपत्राच्या साक्षांकित प्रती सह अर्ज “डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था”(बार्टी),पुणे यांचे पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावे.

योजनेच्या अटी-शर्ती,निकष व कार्यपद्धती,अर्जाचा नमुना या बाबतची माहिती BARTI (बार्टी)च्या संकेतस्थळ https://barti.in/notice-board.php यावर देण्यात आली आहे, असे सहायक आयुक्त, समाजकल्याण राधाकिसन देवढे यांनी कळविले आहे