अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील सुपा टोलनाक्याजवळ पळवे शिवारात पुणे – नगर महामार्गावर भरधाव वेगातील कंटेनरने (क्र.एम एच ४६ ए एफ ४१०९ ) ब्रिझा कार (क्र.एमएच १६ बी वाय ८६४८ ) ला जोराची धडक दिली.

यात कारमधील नामदेव ढाकणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . याबाबत अधिक माहिती अशी,

पुणे – नगर महामार्गावर कंटेनर चालक प्रदिप बाबु खरात (रा.वरकुटे मलवडी ता. मान जि .सातारा) याने त्याच्या ताब्यातील कंटेनर अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगात चालवून ब्रिझा गाडीस जोराची धडक दिली.

यामुळेच ती रस्त्याच्या खाली उतरून झाडावर जाऊन आदळल्याने ढाकणे गंभीर जखमी झाले असून गाडीचेही नुकसान झाले आहे.