अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हिंगोलीकडून परभणीकडे जाताना त्यांचा गाडीचा अपघात झाला आहे. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र, या अपघातात तीन गाड्यांचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. नांदेड आणि हिंगोलीचा दौरा केल्यानंतर आज ते परभणीच्या दौऱ्यावर रवाना झाले होते.

परंतु परभणीकडे जातानाच कोश्यारी यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांचा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

संविधानाने मला जे अधिकार बहाल केले आहेत त्या अधिकारांचा वापर करून मी या हिंगोेली जिल्ह्यात आलो आहे, असं कोश्यारी म्हणाले.

त्यांनी सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेत जिल्ह्यातील सोयी सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.