अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  ‘निवडणुकीच्या काळात लग्न, अंत्यविधी आणि दहाव्यालाही हजेरी लावणारे लोकप्रतिनिधी आता कुठं गेले? या काळात त्यांची लोकांना खरी गरज आहे.

करोनाला घाबरून ते घरात बसले आहेत. अश्या स्पष्ट शब्दात सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच राजकारण्यांवर निशाना साधला.

दरम्यान मलाही प्रशासनाकडून जास्त न फिरण्याचा सल्ला देण्यात येत आहे, मात्र लोकांच्या मदतीसाठी आपण फिरत राहणार आहोत.असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत बोलताना विखे पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनसंबंधी वेळोवेळी योग्य निर्णय घेतले त्यामुळे देश वाचला आहे.

त्यांचा लॉकडाउन करण्याचा उद्देश कोरोना संपविण्याचा नव्हता, तर लांबविण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले होते. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे वेगळी स्थिती होती. ती तयारी लॉकडाउनच्या काळात करून सोयी-सुविधा उभारण्यात आल्या.

देशातील लॉकडाऊन करोना थांबविण्यासाठी नव्हे तर लांबविण्यासाठी होतं. मधल्या काळात आपली यंत्रणा सज्ज झाल्यानं रुग्णांची वाढती संख्या हातळण्याची क्षमता निर्माण झालीय.

त्यामुळं आता लॉकडाउन शिथील करून इतर कामं सुरू करत करोनाला मागं टाकावं लागले,’ असे मत अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केलं.

लॉकडाउनमुळे आपण दिल्लीला जाऊ शकलो नाही. दिल्लीला गेलो असतो, तर उड्डाणपुलाच्या कामाची वर्कऑर्डरच घेऊन आलो असतो, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews