file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या दुसऱ्या सत्राबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. या मोसमाच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्यामुळे आयपीएल 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली होती. आता 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये उरलेल्या 31 सामन्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या मोसमाच्या दुसऱ्या सत्रातला पहिला सामना मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही सामने दुबई, शारजाह आणि अबु धाबी या तीन स्टेडियममध्ये होतील.

दुबईमध्ये 15 ऑक्टोबरला आयपीएलची फायनल होणार आहे, तर पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबरला दुबईमध्ये होईल. एलिमिनेटर आणि दुसरी क्वालिफायर शारजाहमध्ये होतील. असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान आयपीएलचे आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.