file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज बारावीच्या निकालाची घोषणा करण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात कोणती माहिती देण्यात आली नाही.

शाळा-महाविद्यालयांनी बोर्डाच्या संगणकीय प्रणालीवर बारावीचे मूल्यांकन ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता बोर्डाकडून निकालाच्या पुढील प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी पुढील दोन दिवस लागणार असून महिनाअखेर निकाल लागू शकतो.

निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मीडिया रिपोर्टनुसार ३१ जुलैच्या आधी निकालाची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सीबीएसईसहीत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करणे गरजेचे आहे.

कोर्टाने दिलेली वेळेची मर्यादा लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण मंडळ बारावी निकाल २०२१ ची आज किंवा उद्या घोषणा करेल अशी शक्यता आहे. या संकेतस्थळावर जाहिर होणार निकाल यावर्षी महाराष्ट्र एचएससी परीक्षा २०२१ साठी साधारण १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर जाहीर होणार आहे. दहावी निकाल २०२१ च्यावेळी ही वेबसाइट बंद पडली होती. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाने हा प्रकार बारावी निकालाच्या बाबतीत होऊ नये याची काळजी घेतली आहे.