उस्मानाबाद : एकीकडे राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात, मात्र दुसरीकडे भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं समजतं.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व जागांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने २८८ विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातही भाजपच्या मुलाखती पार पडत आहेत.

शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघात भाजपकडून पाच ते दहा जण ईच्छुक असल्याचं कळतं. विशेष म्हणजे भाजपने प्रत्येक इच्छुकांचे अर्ज भरुन घेतले आहेत. भाजप शिवसेनेमधील चर्चेत ५० – ५० चा फॉर्म्युला रहबातल झाल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात दिले होते.
युतीच्या जागावाटपावर २०१४ ला जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाईल, असं पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
विधानसभेच्या जागांविषयी बोलताना ते म्हणाले की, युतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला मी, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मिळवून ठरवू. परंतु आता भाजपने सर्वच २८८ मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्याने, निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
- पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं, वारी करून माघारी येतांना मात्र कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेत वारकऱ्यानं जीवन संपवल
- अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरकरांसाठी गुड न्यूज ! नगरमधील ‘या’ भागात फक्त 5 लाखात घर मिळणार ! म्हाडाची लॉटरी जाहीर
- अहिल्यानगर महापालिकेने केली २७ कोटींची विक्रमी कर वसली, कर न भरणाऱ्यावर लवकरच कारवाई होणार
- अंबानी कुटुंबाला रिलायन्समधून किती पगार मिळतो?, लाखो नव्हे कोटींमध्ये जातो हा आकडा!
- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ; जून महिन्याचा हफ्ता जमा होतोय, पण जुलैचा हफ्ता कधी ? समोर आली मोठी अपडेट