माजी मंत्री आणि भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या सुपुत्र अक्षय आणि नववधू प्रियांका यांचा शुभ विवाह समारंभ बुधवारी बुऱ्हानगर या ठिकाणी पार पडला.

विवाह सोहळ्याला तुफान गर्दी !

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे, सरकार आणि स्थानिक पातळीवर निर्बंध घातले जात आहे.पण दुसरीकडे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला तुफान गर्दी झाली होती.

‘ह्या’ प्रमुख नेत्यांची उपस्थिती

विशेष म्हणजे या गर्दीत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस खासदार सुजय विखे,तसेच माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,

माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे ,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के,माजी मंत्री राम शिंदे, राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे,

माजी आमदार दादाभाऊ कळमकर, यांच्यासह शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने या विवाहास उपस्थित होते.

नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित ?

नेतेमंडळीच निर्बंध लावतात आणि अशा कार्यक्रमांमध्ये तेच नियम गुंडाळून ठेवतात.त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

राजकीय नेत्यांना नियमावली नाही का ? 

लग्नाला खुल्या जागेत केवळ 200 पाहुण्यांना बोलावण्याची मुभा असताना आणि नियम मोडल्यास तात्काळ गुन्हे दाखल होत असताना राजकीय नेत्यांना नियमावली नाही का असा सवाल आता विचारण्यात येत आहे.

सोशल डिस्टन्स आणि मास्कचा अभाव

या लग्न सोहळ्यास सुमारे तीन पेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता. मात्र सोशल डिस्टन्स आणि मास्कचा अभाव असल्याचं निदर्शनास येत होतं. अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शाही लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.