file photo

नगर अर्बन बँकेच्या निवडणूक माघारीच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी दोघांनी माघार घेतली. महापालिका व भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड सर्वसाधारण मतदार संघातून अक्षय गोवर्धन बिहाणी, सुरेश रतनप्रसाद तिवारी यांनी माघार घेतली.

दरम्यान माघारीसाठी शुक्रवार, 12 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. नगर शहर आणि जिल्ह्यातील महत्त्वाची आर्थिक संस्था आणि शंभर वर्षांहून अधिक परंपरा असणार्‍या अर्बन बँकेसाठी 90 उमेदवारांचे 111 अर्ज दाखल केले आहेत.

यातील दोघांनी माघार घेतली आहे. बँकेच्या 18 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी एकूण 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

यातील चौघांचे अर्ज बाद झाले होते. आता 12 नोव्हेंबरला माघारीनंतर अंतिम उमदेवारी जाहीर झाल्यानंतर 15 तारखेला चिन्हाचे वाटप झाल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी पेटणार आहे.