भाजपच्या ‘या’ विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत आव्हान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : कर्जत-जामखेडला पालकमंत्री प्रा. राम शिंदे, राहुरीला शिवाजी कर्डिले, शिर्डीला राधाकृष्ण विखे व अकोल्यात वैभव पिचड या चार जागांवरील उमेदवारांना पक्षांतर्गत आव्हान सध्या तरी दिसत नाही. पण तीन तालुक्यांतून मात्र विद्यमान आमदारांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

कोपरगावला स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राधाकृष्ण विखेंचे मेव्हणे राजेश परजणे व कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे तर पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात मोनिका राजळेंना माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांचे आव्हान आहे तसेच नेवाशाचे बाळासाहेब मुरकुटे यांना सचिन देसरडा यांचा विरोध सुरू आहे.

अर्थात या तीन मतदारसंघांत विद्यमान आमदारांना आव्हान देणाऱ्यांपैकी देसरडा व काकडेंसारखे एक-दोन जणच भाजपच्या मुलाखतींना प्रत्यक्ष हजर राहण्याची शक्यता आहे. परजणे व वहाडणेंसारखे इच्छुक भाजपच्या मुलाखतींना येण्याची शक्यता कमी आहे.

पण, भाजप नेते असलेल्या विखेंवर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळेच कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवारीची दावेदारी करतो, याची उत्सुकता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24