अहमदनगर – लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार मतमोजणीच्या दिवशी नगर शहरातील गांधी मैदान येथे गुरुवार (दि.२३) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. समीर गवळी (रा.शिला विहार, गुलमोहोर रोड) याने फिर्याद दिली आहे.

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सूरज सुभाष जाधव, ऋषिकेश (भैय्या) कैलास डहाळे, दर्शन करंडे यांच्यासह ४ ते ५ जणविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सूरज जाधव व ऋषिकेश डहाळे या दोघाना अटक करण्यात आली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आदित्य संजय गवळी (वय २२)हा गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गांधी मैदान परिसरात थांबला होता.

त्या वेळी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुरज जाधव याच्यासह ४ ते ५ जणांनी आदित्य याला लोकसभा निवडणुकीत तू भाजपाचा प्रचार का केला असे म्हणत बेदम मारहाण केली .

लाकडी दांडक्यानी मारहाण केली तसेच डोक्यावर  काचेच्या बाटल्या फोडत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.