अहमदनगरमधील सर्व व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी ! व्यवसाय करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर महापालिका सातत्याने नवनवीन उत्पन्नाच्या स्त्रोताच्या शोधात असते. आता उत्पन्नवाढीसाठी आता महापालिका लवकरच एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहीत मिळाली आहे.

नगर शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, दुकानांना न अधिनियमातील तरतुदीनुसार व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क २०० रुपये ते १५ हजार रुपयादरम्यान असू शकते असा अंदाज आहे.

येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी

शहरात साधणार ३० ते ४० हजार आस्थापना आहेत. हे शुल्क जर सुरु झाले तर साधारण दोन कोटी रुपये उत्पन्न मिळेल असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून येत्या १५ दिवसांत त्याची अंमलबजावणी देखील होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.

स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या प्रस्तावात काय ?

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी व्यवसाय परवाना शुल्क आकारणे आवश्यक झाले आहे. प्रभागनिहाय सर्व व्यवसायिक आस्थापनांचे सर्वेक्षण करून त्यांना परवाना शुल्क आकारणी करणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला होता.

२०० ते १५ हजारांपर्यंत वार्षिक शुल्क

अकोले महापालिकेच्या धर्तीवर विविध प्रकारच्या आस्थापनांना २०० ते १५ हजारांपर्यंत वार्षिक शुल्काचा दर यात प्रस्तावित करण्यात आला होता. विशेष म्हणजे याला स्थायीने मंजुरी देखील दिली आहे.

शहरात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील प्रकरण २२ कलम ३७२ ते ३८६ नुसार लायसन्स आणि परवान्यासाठी शासनाने कलम ४५४ अवये ३३९ प्रकारच्या व्यवसायांना १० ऑक्टोबर २००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे.

परवाना शुल्काची अंमलबजावणी कोण करणार ?

परवाना शुल्काची अंमलबजावणी मार्केट विभागाकडून केली जाईल. यासाठी प्रथम मनपा आयुक्तांनी मंजुरी दिली की जाहीर नोटीस प्रसिध्द होईल. व्यावसायिक आस्थापनांना नोंदणीसाठी आवाहन केले जाईल.

मनपाच्या मार्केट विभागात अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कोणत्या प्रकारच्या आस्थापनांना किती शुल्क आकारले जाणार याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व माहिती संकलित झाली की, त्यानुसार कार्यवाही सुरु केली जाईल.

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी व्यवसाय परवाना शुल्क आकारले जाणार आहे. आकडेवारीनुसार पालिकेच्या उत्पनात दोन कोटी भर पडेल असे सांगितले जात आहे.