अहमदनगर जिल्ह्यातील घटना : चिकन मार्केटजवळच चार कावळ्यांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- पारनेर बाजारतळाजवळ चिकन मार्केेट परिसरात दोन दिवसांत चार कावळे मृतावस्थेत आढळले. मृत्यू बर्डफ्लूमुळे झाला की इतर कारणांमुळे याचा शोध घेण्यासाठी पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

दोन दिवसांपूर्वी दोन कावळे मृतावस्थेत आढळले. नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांनी ते कचरा डेपोत टाकले. पुन्हा बुधवारी दोन कावळे मृतावस्थेत आढळले. त्यापैकी एक कावळा नगरपंचायत कार्यालयासमोरच पडला होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यासंदर्भात पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. स्नेहलता गवारे यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी त्या मृत कावळ्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले.

त्यांचा अहवाल आल्यानंतर या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे किंंवा इतर कारणांमुळे झाला याचा उलगडा होणार आहे. दरम्यान, कावळे मरू लागल्यामुळे चिकन शौकिनांनी चांगलाच धसका घेतला आहे.

बाजारतळ परिसरात वटवाघळांची संख्याही मोठी आहे. कावळे मृत्यूमुखी पडू लागल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता वटवाघळांचाही मृत्यू झाला किंवा नाही याची चाचपणी करण्यात येत आहे.