🚨 सत्यजित तांबे यांचा मोठा विजय ! पहा शुभांगी पाटील यांच काय झालं ? | Nashik Pavidhar Election Result Live Updates | नाशिक पदवीधर निवडणूक निकाल

Nashik Pavidhar Election Result Update: नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2023

Last Updated On 10.32

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

📌 नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456.

➡️ सत्यजित सुधीर तांबे : 60161
➡️ शुभांगी भास्कर पाटील 33776
➡️ रतन कचरु बनसोडे :2297
➡️ सुरेश भिमराव पवार :649
➡️ अनिल शांताराम तेजा :83
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर :223
➡️ अविनाश महादू माळी :1524
➡️ इरफान मो इसहाक :68
➡️ ईश्वर उखा पाटील :192
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे :617
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख :326
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले :240
➡️ नितीन नारायण सरोदे :223
➡️ पोपट सिताराम बनकर :75
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे :142
➡️ संजय एकनाथ माळी :164
➡️ वैध मते :100760
➡️ अवैध मते :11240
➡️ एकूण :112000

=========================

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांची आघाडी

आघाडीवर असल्याचे कळताच मतदान केंद्र बाहेर तांबेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

सत्यजित तांब्यांच्या समर्थनात युवा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी 

सकाळी आठ वाजेपासून 28 टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली असून एका टेबलवर एक हजार मतांची मोजणी होईल.

या एका टेबलवर तीन अधिकारी उपस्थित राहतील. यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा समावेश असेल. तसेच सुरुवातीला 25-25 चे गठ्ठे तयार करण्यात येऊन ते एकमेकांत मिसळले जातील, सध्या ही प्रक्रिया सुरू आहे.

यातून वैध मते काढून मतमोजणाला सुरुवात होईल. या प्रक्रियेला सुमारे चार तास लागतील. तर नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीचं ठिकाण हे सय्यद पिंपरी असून मतमोजणीच्या वेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. मात्र मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

मतमोजणी कशी होणार? 

वैध मतदानाच्या आधारावर कोटा काढण्यात येईल. वैध मताला दोनने भागून त्यात एक आकडा मिळविला की कोटा प्राप्त होतो. ज्या उमेदवाराने पहिल्या पसंतीची मते मिळवून कोटा पूर्ण केला त्याला विजयी घोषित करण्यात येईल. कोटा पूर्णच झाला नसेल तर पहिल्या पसंतीची मते ज्याला सर्वांत कमी मिळाली त्या उमेदवाराला बाद ठरवून त्याच्या मतपत्रिकेत मतदाराने दुसरा पसंतीक्रम कुणाला दिला त्यानुसार मतमोजणी केली जाते.

मतपत्रिकेत पसंतीक्रम शब्दांत नोंदविणे, एकाच उमेदवारांच्या समोर 1, 2, 3 असा क्रम लिहिणे असे आढळल्यास ही मते अवैध ठरविण्यात येईल. केंद्रात असलेल्या जांभळ्या शाईच्या पेनाऐवजी इतर पेन वापरला तरीही मत अवैध ठरते.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक टपाली मतदानच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे एकूण टपाली मतदान 58 : वैध मते – 46 , अवैध मते – 12

  • नाशिकमध्ये मतपेट्या उघडल्या
  • पोस्टल मतांची मोजणी सुरू
  • दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट

2 लाख 62 हजार 678 पैकी 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी हक्क बजावला आहेत त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज. मतमोजणी केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप आलं

सत्यजीत तांबेंसाठी दुख:द बातमी ! निकालादिवशीच जवळच्या व्यक्तीचं अपघाती निधन

अशी होणार मतमोजणी ! मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 2 फेब्रुवारी रोजी सय्यद पिंप्री येथील गोदामात होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मत मोजणी प्रशिक्षणपूर्ण झाले आहे.

मतमोजणी प्रकिया

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात 28 टेबलवर होणार आहे. एका टेबलावर एक तहसीलदार आणि दोन नायब तहसीलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सर्व मतपेट्यामधील मतपत्रिका एकत्रित करून त्यांचे एक हजाराचे गठ्ठे करण्यात येतील.यानंतर बाद मतपत्रिका बाजूला काढून वैध मतपत्रिकेवरून कोटा ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

अशी करण्यात आली आहे तयारी

मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष, केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युत पुरवठा, आरओ, एआरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था तसेच आवश्यक त्या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे.

मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवत जबाबदारी देण्यात आलेल्या ठिकाणीच थांबावे तसेच उमेदवारांनी नेमलेल्या मतमोजणी प्रतिनिधी यांनी देखील नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थाबावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.