लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर :- शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागील बाजूस चारचाकी वाहनात लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केला व ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने २७ वर्षीय युवतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

शहरात खासगी नोकरी करणाऱ्या युवतीने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत तिने म्हटले आहे, 

डिसेंबर २०१८ पासून ते जुलै २०१९ पर्यंत शोएब युनूस जमादार राहणार वाॅर्ड क्र. २ श्रीरामपूर याने श्रीरामपूर येथे पंचशील लॉज व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पाठीमागे चारचाकी गाडीमध्ये आपणास लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. 

मात्र, नंतर लग्नास नकार दिला व जर कोणास काही एक माहिती अगर तक्रार दिली, तर तुझी बदनामी करून तुला व तुझ्या घरातील लोकांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.


अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24