तापसी पन्नूची या बायोपीकसाठी निवड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बॉलीवूडमध्ये सध्या विविध खेळाडूंच्या जीवनावर आधारीत बायोपीकची क्रेझ आहे. महेंद्रसिंग धोनी, कपिलदेव, सायना नेहवाल यांच्या जीवनावरील बायोपीकसोबतच आता महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूच्याही बायोपीकची चर्चा आहे.

यापूर्वी एका खेळाडूची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री तापसी पन्नूची या बायोपीकसाठी निवड केल्याचे बोलले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या जीवनावर चित्रपट येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे, तर मितालीच्या भूमिकेसाठी तापसीची निवड केल्याचे म्हटले जात आहे.

मात्र, त्याबाबत अधिकृत घोषणा झाली नसून, चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान तापसीला मिताली राजच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले होते.

तेव्हा ही भूमिका आनंदाने स्वीकारण्यास तिने दुजोरा दिला आहे. दरम्यान, दिलजीत दोसांज यांच्या ‘सुरमा’ या चित्रपटात हॉकी प्लेअरच्या भूमिकेत यापूर्वी तापसी झळकली होती.

दरम्यान, वयाच्या १६व्या वर्षी क्रिकेटमधील पर्दापणासोबतच पहिले शतकही ठोकण्याचा मान मितालीने मिळवला आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये ६००० धावा पूर्ण करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू म्हणूनही नावाजली गेली. त्यामुळे तडफदार भूमिका साकारणाऱ्या तापसीला एका क्रिकेटरच्या भूमिकेत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24