file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  येथील मार्केटयार्डमधील साधना एजन्सी या दुकानात काल पाच अनोळखी इसमांनी औषधे घेण्याच्या बहाणा करत दुकानदाराची नजर चुकवून ५६ हजारांचे कांद्याचे बियाणे लंपास केले.

याप्रकरणी अजय अमृतलाल बोरा यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समितीत बोरा यांचे साधना एजन्सी या नावाने बियाणे व रासायनिक खते विक्रीचे दुकान आहे.

दरम्यान दि.२८ रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास दुकानात फिर्यादी व त्यांचा मुलगा असताना पाच अनोळखी इसम आले.

यातील एकाने त्यांच्याकडे औषधांची विचारपूस केली. यावेळी इतरांनी पंचगंगा कंपनीचे सुपर कांद्याचे ५६ हजार रूपय किमतीचे ४०पाकीटे चोरुन नेली.

याबाबत बोरा यांनी कोतवाली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल केला असून याबाबत पोहेकॉ.ढगे हे अधिक तपास करत आहेत.