अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 758 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर मध्ये अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूमुळे खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- केडगाव येथे आजारी अवस्थेत आढळून आलेल्या पन्नास वर्षीय अनोळखी पुरुषाचा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दि. 15) घडली. नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील पंचम वाईन दुकानासमोर एक अनोळखी व्यक्ती आजारी अवस्थेत आढळून आला. त्यास पंचम वाईनचे मालक प्रदीप पठारे यांनी उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. … Read more

अहमदनगरकर काळजी घ्या शहरातील वाढली कोरोना रुग्णसंख्या बनली चिंताजनक !

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  शनिवारी २४ तासांत नगर शहरात नवे २८ रूग्ण आढळून आले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तिसरी लाट रोखण्याचे आव्हान प्रत्येकासमोरच आहे. नगर शहरातील कोरोना बाधितांचा आकडा पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत कमालीचा वाढला. मार्च, एप्रिल मध्ये शहरातील झपाट्याने रूग्णवाढ सुरू होती. महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी त्यावेळी खमकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेत तरुणाने संपवली जीवनयात्रा !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- आजकाल आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा नैराश्यातून आत्महत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातच नगर तालुक्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे राहणाऱ्या संकेत बाळासाहेब काळे (वय 22, रा.खडकी रोड, सारोळा कासार) या तरुणाने राहत्या … Read more

आली रे आली आता तुझी बारी … शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला दणका !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात श्रीपाद छिंदमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या गुन्ह्यात … Read more

लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवा

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  लसीकरण केंद्रावर नागरिकांना चुकीच्या सुचना देऊन घरी पाठवत असल्याचा आरोप जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी केला आहे. तर लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवून सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नागपूर आरोग्य केंद्रावर लसीकरणसाठी आलेल्या नागरिकांना आरोग्य कर्मचारी वर्ग चुकीच्या सूचना सांगत … Read more

केंद्रातील भाजप सरकारमुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- केंद्रातील भाजप सरकारमुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. ओबीसीला त्यामुळे मोठा फटका बसला असून ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातून एक लाख ओबीसी कार्यकर्ते दिल्लीला जाणार असून जंतरमंतर मैदानावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाणार असल्याची माहीती, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे … Read more

अहमदनगर शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  नगर शहरातील काही भागात नळाला दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी महापालिकेत दाखल होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने दोष दुरूस्त करण्याचे नियोजन आखले आहे. शहरातील धरती चाैकासह बुरडगल्ली भागात दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत बाळासाहेब भंडारी यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर परिसरात ड्रेनेजलाीन लिक असल्यामुळे … Read more

शिवसेना जिल्हा उपप्रमुखांसह सहा जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- गाळा बांधकाम करायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत एकास खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह सहा जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान याप्रकरणी विजय रमेश सामलेटी यांनी ही फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,विजय सामलेटी यांच्यासह श्रीपाद छिंदम व त्यांच्या ओळखीचे … Read more

मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्‍वस्तांवर कारवाई करा..!

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  महार वतनाची ७२ एकर जागा बळकावल्याचा आरोप अहमदनगर : नगर तालुक्यातील व शहरा पासून जवळ असणाऱ्या अरणगाव येथे महार वतनाची ७२ एकर जागा अवैधरित्या बळकावून त्यांच्यावर अन्याय करणार्‍या अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्‍वस्तांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे. … Read more

वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोविड सुसंगत वर्तणूक ठेवा : जिल्हाधिकारी

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-   जिल्ह्यात पुन्हा एकदा काही भागात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. प्रशासनाने आवाहन करुनही काही नागरिक कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करत नाहीत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. विशेषता शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. वास्तविक आठवड्याच्या शेवटच्या … Read more

अर्बन बँक फसवणूक: ‘त्या’ तीन डॉक्टरांचा जामीन नामंजूर आता ‘या’ गुन्ह्यात वर्ग करणार

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- नगर अर्बन बँकेच्या २२ कोटी ९० लाख रूपये कर्ज फसवणूक प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेले डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ.भास्कर सिनारे व डॉ.रवींद्र कवडे यांचे जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहेत. दरम्यान शहर सहकारी बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात या तीन डॉक्टरांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या त्या मोठ्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- गाळा बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्या मागे पाच हजार याप्रमाणे 12 गळ्याचे 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत एकास खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना नगर दक्षिण उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधवसह सहा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यामध्ये जाधवसह त्याचा भाऊ राजेश जाधव, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ५८६ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ५७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७८ हजार ४७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५८६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची राज्यभर सायकल रॅली

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- केंद्र सरकारने सामान्य जनतेवर पेट्रोल डिझेल दरवाढ करून मोठा बोजा लादला आहे . याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने 16 जुलै ते 18 जुलै 21 या काळात संपूर्ण राज्यात सायकल रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे .. याबाबत अधिक … Read more

मनसेच्या आवाहनानंतर शहरातील जिल्ह्यातील हॉस्पिटलला करोडो रुपयांचा मोठा दणका बसणार !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये लाभ मिळावा याकरिता सर्व कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांचे बिले परत देण्यासाठी मनसेने आव्हान केल्यानंतर जवळपास जिल्ह्यातून ३०० अर्ज हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सादर झाले आहेत यामध्ये सर्व रुग्णांनी ज्या हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लाभ मिळतो आशा हॉस्पिटल … Read more

कोरोना संकट काळात रूग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  शहरासह उपनगरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध असलेल्या डॉक्टर डॉ. देवदाण कळकुंबे, डॉ.ईकाम काटेवाले, डॉ. महेश वीर, डॉ.एस.एस.गुगळे, डॉ. सबापरवीन खान, डॉ.विवेक गांधी, डॉ.रमाकांत मरकड, डॉ.अमित पवळे आदी डॉक्टर सह सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी कोरोना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 586 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम