वीजबिलाच्या वादातून महावितरणच्या अभियंत्याला धक्काबुक्की ; शहरातील प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- वीज बिल भरण्याच्या कारणातून शहराच्या गंजबाजार येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता स्वप्नील संजयराव उल्हे यांना 10 ते 15 लोकांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, महावितरण विभागाच्या गंजबाजार कार्यालयाअंतर्गत येणार्‍या जुना बाजार परिसरातील सुल्तान शेख याचे वीज बिल थकले होते. बुधवारी महावितरणचे … Read more

महागाईचा भडका ! महिलांनी पंतप्रधानांना पाठविल्या शेणाच्या गौऱ्या.

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली अभिनवरित्या निदर्शने करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून चक्क शेणाच्या गौऱ्या कुरियर द्वारे दिल्लीला पाठविण्यात आल्या आहेत. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना हिंदीतुन निवेदन पाठविले आहे. … Read more

एक बनावट कॉल पडला लाख रुपयांना… नेमकं काय घडले जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- चोरी, गुन्हे यांच्यासह गुन्हेगार देखील अपग्रेड झाले आहे. यातच तंत्रज्ञांनाच्या युगात आता सायबर गुन्ह्याचा घटना वाढू लागल्या आहेत. यात गुन्हेगारांकडून अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. असाच काहीसा प्रकार नगर शहरात घडला आहे. नगर शहरातील आगरकर मळा येथील एकाची जिओ प्रतिनिधी असल्याची बतावणी करून ९८ हजार ९९९ रूपयांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले 458 रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज ४८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७७ हजार ९०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : श्रीपाद छिंदमसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  अहमदनगर मध्ये एका टपरी धारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत, तसेच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अट्रोसिटीसह विविध कलमाअंतर्गत आज गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे वादग्रस्त छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान … Read more

विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील – ब्रिजलाल सारडा

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  हिंद सेवा मंडळाचे जिल्ह्यातील सर्वच शाळेत विद्यार्थ्यांना सर्व समावेशक असे शिक्षण दिले जाते समाजाच्या शेवटच्या घटकातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशापासून ते त्यांच्या शैक्षणिक गरजा कशी पूर्ण होतील हे आवर्जुन पाहिले जाते. यासाठी संस्था, पदाधिकारी, शिक्षक, शाळा प्रयत्नशील असते. केवळ भौतिक सुविधाच नव्हे तर वैयक्तिक अडचणी सोडविण्यासाठी सर्वच प्रयत्नशिल … Read more

गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी शहर जिल्हा महिला काँग्रेसने पंतप्रधानांना पाठविल्या शेणाच्या गौऱ्या ;

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली अभिनवरित्या निदर्शने करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून चक्क शेणाच्या गौऱ्या कुरियर द्वारे दिल्लीला पाठविण्यात आल्या आहेत. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना हिंदीतुन निवेदन पाठविले आहे. … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात इतक्या रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता २ हजार ९७५ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात नवे ५३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नगर शहर व जिल्ह्यात नऊ जुलैपासून सातत्याने नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून … Read more

पाणीप्रश्न ! आमदार संग्राम जगतापांनी महावितरणला दिला महत्वाचा आदेश

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा सुरळीत करा, असा आदेश आमदार संग्राम जगताप यांनी महावितरणला दिला. नगर शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्नांची अडचण पाहता आमदार जगताप यांनी तातडीने महावितरण व महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वरील … Read more

मनपाच्या विरोधी पक्षनेते पदासाठी जोरदार रस्सीखेच

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वीच अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आता या निवडीनंतर विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र महापौरांनी भाजपचे नगरसेवक तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिले होते. परंतु, भाजपच्या प्रदेशध्यक्षांनीच ही नियुक्ती थांबविण्याचा आदेश दिला. यामुळे महापालिकेतील … Read more

निसर्गचक्र टिकविणे करिता वृक्षारोपण करणे खूप गरजेचे

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- आपण आधीपासूनच प्रदुषणाचा सामना करीत आहोत. वृक्षतोडीमुळे आणखी त्यामध्ये भर पडते. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व समजले, त्यामुळे आता वृक्षारोपणासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. निसर्गचक्र टिकविण्याकरीता वृक्षारोपण करणे खूप गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. सावेडी उपनगरात प्रभाग 2 मधील श्रीराम चौक ते वसंत टेकडी पर्यंतच्या रस्त्याच्या … Read more

अमरधाम मधील कर्मचार्‍यांचा गौरव जीवाची पर्वा न करता कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याने कोरोना योध्दा सन्मान प्रदान

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये जीवाची पर्वा न करता कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या नालेगाव अमरधाम मधील कर्मचार्‍यांचा छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस) अहमदनगर परिवाराच्या वतीने कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी संदीप नवसुपे, वसंत आभाळे, आजिनाथ मोकाटे, मनोज सोनवणे, संजय शिंदे, प्रमोद काकडे, शुभम रक्ताटे, रोहिणी वाघमारे, विजय … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रतिष्ठीत व्यक्तीवर ‘त्या’ महिलांचा हनीट्रॅप.!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- प्रतिष्ठीत व्यक्तींना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचे आणि त्यांचे अश्लिल व्हिडिओ काढून त्यांनाच ब्लॅकमेल करायचे. लाखो रुपयांची मागणी करायची आणि नाही दिली तर चार चौघात मारहाण करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दहशत निर्माण करायची असा प्रकार अहमदनगर जिल्ह्यात अनेक दिवसांपासून सुरु आहे. प्रतिष्ठेपोटी कोणताही पुरुष नम्र होऊन या हनी ट्रॅपचा … Read more

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना गुलाम बनवले!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचार्‍यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम रहावे व महागाई कमी करण्यासह विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकार भांडवलदारांच्या हिताचे निर्णय … Read more

क्रीडा शिक्षकांची प्रलंबित भरती तातडीने करण्याची काँग्रेस क्रीडा विभागाची मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- राज्यातील क्रीडा शिक्षकांची भरती अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. क्रीडा शिक्षक याकडे आस लाऊन बसले आहेत. राज्य शासनाने या बाबतीमध्ये निर्णय करत तातडीने या भरतीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहेत. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेला चोविस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 538 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोविस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम    

शहरातील अमृत भुयारी गटार योजनेचे काम थांबवा

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :-  अमृत भुयारी गटार योजनेचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात या योजनेंतर्गत खोदकाम केले आहे. पावसामुळे तेथे चिखल झाला आहे. वाहन चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत ही कामे थांबवावी, असे पत्र उपमहापाैर गणेश भोसले यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिले.खोदकाम झाल्यानंतर ती माती … Read more

केडगाव-नेप्ती रस्त्याची ८ दिवसांत दुरुस्तीन झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  केडगाव-नेप्ती रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची ८ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका सुनीता कोतकर यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या मागणीचे निवेदन विभागाचे कुलकर्णी यांना … Read more