दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे, या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील सरसावले आहे. अशाच एका टोळीला पोलिसांनी मोठ्या धाडसाने गजाआड केले आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत केडगाव शिवारात कांदा मार्केट ते निल हॉटेल दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे. … Read more

गदिमांच्या स्मारकासाठी सरकारला जाग आणण्यासाठी गदिमांच्या साहित्यावर काव्यजागर

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी, गीतरामायणकार ग.दि. माडगळूकर यांचे स्मारक महाराष्ट्राचे संचित ठरेल. त्यासाठी गदिमांची जन्मभूमी शेटफळ, मुळ गाव माडगूळ व कर्मभूमी पुणे येथे स्मारकासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले. गदिमांच्या स्मारकासाठी सरकारला जाग आणण्यासाठी 36 जिल्हे, 4 राज्ये व 6 देशात … Read more

नवनागापूर, निंबळक, इसळक आणि वडगावगुप्ता या चार गावांसाठी एक नगरपालिका स्थापन करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील 11 हजार घरकुल वंचितांना तसेच परिसरातील 5 हजार घरकुल वंचितांना परवडणारी घरे मिळावीत व त्यांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी शहराच्या उत्तरेला असलेल्या नवनागापूर, निंबळक, इसळक आणि … Read more

अभिप्राय नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणार्‍या ओबीसी सेलचे अमित खामकर यांचा विशेष सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी पक्षाच्या अभिप्राय नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणार्‍या ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तर नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, संभाजी पवार, उद्योजक जय दिघे व आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक विपुल … Read more

वडिलांच्या नियुक्तीची जुनी कागदपत्रे मिळत नसल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या प्रवेशद्वारात कुटुंबीयांसह ठिय्या !

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- नगरपालिकेत सफाई कामगार असलेल्या वडिलांच्या नियुक्तीची जुनी कागदपत्रे मिळत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव काते यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारात कुटुंबीयांसह ठिय्या आंदोलन केले. महापालिकेचे गेट बंद आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी आंदोलकांना रोखले. सदर मागणीचे निवेदन उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना देण्यात आले. डॉ. पठारे … Read more

बिग ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आरोपी बाळ बोठेस कोर्टाचा दिलासा !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीच्यावेळी आरोपीला कोर्टासमोर हजर ठेवावे ही तपास अधिकाऱ्यांची मागणी न्यायालयाने नामंजूर केली आहे. त्यामुळे बोठे याला कोर्टात उपस्थित राहण्याची गरज नाही. अटकपूर्व जामीन अर्जावर आता उद्या (१५ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. या दिवशी जामीन अर्जावर पोलीस तपास यंत्रणेचे व सरकारी वकिलांचे कोर्टाने म्हणणे मागविले होते.त्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २१५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार २७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२३ ने … Read more

युवकांना फक्त कार्यकर्ता बनवून न ठेवता त्यांच्याकडे नेतृत्व देण्याची क्षमता मनसेत -गजेंद्र राशिनकर

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-सिव्हिल हडको परिसरातील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. युवा कार्यकर्ते तथा तांडव ग्रुपचे अध्यक्ष ऋतिक लद्दे आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेत दाखल झाले. जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी युवकांचे पक्षात स्वागत केले. यावेळी सरचिटणीस नितीन भुतारे, मनसे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष इंजि. विनोद काकडे, महिला जिल्हाध्यक्षा … Read more

दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे व निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारने शेतकर्‍यांचे आणि ग्राहकांची लूट करण्याच्या हेतूने कॉर्पोरेट कंपन्यांचा फायदा करून देणारे तीन जनविरोधी कृषी कायदे संसदेत पारित केले आहे. हे कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित किसान, कामगार आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करुन निदर्शने करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठे याच्या अर्जावर झाला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात एक अर्ज केला होता. सुनावणीच्या वेळी आरोपी बाळ बोठेने स्वत: उपस्थित रहावे, असं या अर्जात नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, पोलिसांच्या या अर्जावर आज (दि. १४) सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीनंतर कोर्टाने निकाल राखीव ठेवला आहे. … Read more

समाज बिघडला तर व्यवस्था बिघडते, व्यवस्थेला दोष देण्याची प्रवृत्ती म्हणजेच मानवाधिकाराचे उल्लंघन – पद्मश्री पोपट पवार

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्ताने कोरोना काळात मानवाधिकार संरक्षणासाठी महत्वपूर्ण भूमिका घेवून दीपस्तंभासारखे उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मानवाधिकार अभियानामार्फत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. पुरस्काराचे वितरण समारंभ सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालय या ठिकाणी आयोजीत करण्यात आला होता. हजारो स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत ठरलेल्या सी.एस.आर.डी. चे संचालक डॉ.सुरेश पठारे, … Read more

नगरसेवक सागर बोरूडे यांच्या वतीने निंबळकच्या ध्यान आश्रम उभारणीच्या कामासाठी सिमेंटची मदत

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-निंबळक (ता. नगर) येथील प.पू. माताजी श्री निर्मला देवी प्रणीत सहजयोग ध्यान आश्रम उभारणीच्या कामासाठी मनपाचे नगरसेवक सागर बोरूडे यांनी 30 सिमेंटच्या गोणी भेट दिल्या. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश घोगरे पाटील, अशोक कोतकर, दीपक कळसे, शिवशंकर मतकर, शांतिलाल काळे, श्रीमंत किंकर, जाधव साहेब, नानासाहेब कुसमाडे, महेश … Read more

महागाई निर्देशंकानुसार वेतनवाढसाठी अवतार मेहेरबाबा कामगार युनियन आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-  अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशंकानुसार 8 ते 12 हजार रुपया पर्यंत वेतनवाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांकडे गेले असताना तारखेला हजर न राहता एकूण वेतनाच्या फक्त 7 टक्के वेतनवाढ करण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या ट्रस्टच्या … Read more

ना. शरद पवार यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता महाराष्ट्रातील जनतेचा अभिमान -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-थंडी निमित्त शहरातील तापमानाचा पार खालवत असताना भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने निराधार व वंचित घटकातील 80 ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भिंगार येथे … Read more

युवक काँग्रेसमध्ये तरुणांचे इन्कमिंग……

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-अहमदनगर शहर युवक काँग्रेस मध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वखाली काम करण्यासाठी नगर शहरातील तरुणांनी आता युवक काँग्रेसची साथ धरली आहे , युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या माध्यमातून युवकचे जिल्हा अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे यांच्या हस्ते … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ६० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७१ ने वाढ … Read more

जिल्ह्यात वाढत्या बिबट्यामागे महाविकास आघाडी सरकार; माजी पालकमंत्र्यांचा अजब दावा

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.बिबट्याने अनेकांवर हल्ला करत त्यांना भक्ष बनवले आहे यावरून आता जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यावरून आता माजी पालकमंत्र्यांनी थेट ठाकरे सरकारवर आरोप लावण्यास सुरुवात केली आहे यावेळी बोलताना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले कि, … Read more

काल कोरोनामुळे झाले इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. नवे २३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दिवसभरात ३०७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ९१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे. नगर शहर … Read more