जिल्ह्यात वाढत्या बिबट्यामागे महाविकास आघाडी सरकार; माजी पालकमंत्र्यांचा अजब दावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.बिबट्याने अनेकांवर हल्ला करत त्यांना भक्ष बनवले आहे यावरून आता जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे.

बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यावरून आता माजी पालकमंत्र्यांनी थेट ठाकरे सरकारवर आरोप लावण्यास सुरुवात केली आहे यावेळी बोलताना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले कि, कोल्हापूरमध्ये हत्ती नियंत्रणात ठेवण्याचे कौशल्य वापरणारे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी ते बिबट्या पकडण्यासाठीही नगर जिल्ह्यात वापरावे.

नगर जिल्ह्यात बिबटे वाढत आहेत हेही राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे षडयंत्र आहे, असा अनोखा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.

नगर येथील भाजप कार्यालयात रविवारी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच यावेळी कृषी कायद्यावर बोलताना शिंदे म्हणाले, ७० वर्षानंतर प्रथमच शेतक-यांना त्यांचा माल कुठे विकावा याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी ख-या अर्थाने स्वतंत्र झाला आहे. मात्र केवळ राजकारण म्हणून विरोधक कायद्याला विरोध करीत आहेत. कायद्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत.

कोणाला संपवण्यासाठी हे कायदे नाहीत. बाजार समितीही स्पर्धेत उतरू शकतात. शेतमालाचा भाव पेरणीपूर्वीच निश्चित होणार आहे. फसवणूक झाली तर कारवाईची तरतूद असून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करता येणार आहे, असे शिंदे म्हणाले.

Leave a Comment