अहमदनगर ब्रेकिंग : कोवीड सेंटरवर गुंडांचा हल्ला !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहरातील साई स्पंदन ह्या कोवीड सेंटरवर गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  यावेळी डॉक्टरांनाही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली असून.शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  घटनेनंतर कोवीड सेंटर चालविणारे डॉ. रोहित रमेश आहेर यांनी शनिवारी मध्यरात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५ ने वाढ झाली.  … Read more

कृषी व कामगार विधेयकाच्या विरोधात कँग्रेसची ‘ही’ मोहीम; करणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच कामगारांच्या विधेयकावरूनही गदारोळ उठला आहे. या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर मोहीम उघडण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून नगरमध्ये शहरातील कामगारांच्या सह्यांच्या मोहिमेचा … Read more

ओव्हरफ्लो पाण्याचा उच्चांक; ‘मुळा’तून जायकवाडीला ‘इतके’ पाणी

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरले आहेत. अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा धरणा पूर्ण भरलेले असून मुळातून जायकवाडीला साडेबारा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. 1 हजार क्युसेसने जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरूच आहे. यंदाच्या पावसाळ्यात ओव्हरफ्लो पाण्याचा उच्चांक होऊन जायकवाडी धरणाला 12 … Read more

‘त्या’ कर्ज प्रकरणी ‘ह्या’ डॉक्टरांसह सात जणांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  नगर अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखांमधील कर्ज प्रकरणात 22 कोटी 90 लाखाच्या रकमेचा अपहार झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. बॅकेचे व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डॉ. निलेश विश्‍वासराव शेळके, डॉ. विनोद आण्णासाहेब श्रीखंडे, डॉ. रवींद्र दौलतराव कवडे, डॉ. … Read more

शेतकऱ्यांना खुशखबर ! कांदाचाळ उभारणीसाठी मिळणार ‘इतके’ अनुदान

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- शेतकऱ्यांना आर्थिक सोर्स मिळून उभा करून देण्यासाठी कांदा या पिकाची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. अनेकदा आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कांद्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावलेला आहे. आता या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कांदा साठवणीसाठी कांदा चाळ महत्वाची असते. या चाळीच्या उभारणीसाठी राज्यसरकारने ६० कोटी रुपयांचा निधी … Read more

मोठी बातमी! नगर अर्बन बँक कर्ज प्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  नगर अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखांमधील कर्ज प्रकरणात २२ कोटी ९० लाख रकमेचा अपहार झाला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सात जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यामध्ये डॉ. निलेश विश्‍वासराव शेळके, डॉ. विनोद आण्णासाहेब श्रीखंडे, डॉ. रवींद्र दौलतराव कवडे, डॉ. भास्कर रखमाजी सिनारे, गिरीश … Read more

समाजातील तृतीयपंथींच्या मदतीसाठी धावली भाजपा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरु असून याकाळात अनेकांनी माणुसकी जपत मदतीचा हात पुढे केला. अनेकांना या संकटातून बाहेर येण्यासाठी अनेक दातृत्वाचे हात पुढे सरसावले. अशातच समाजातील एक महत्वाचा घटक असणारे तृतीय पंथांसाठी भाजपा धावली आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. कोरोनाच्या महामारीत माणुसकीचा धर्म … Read more

लॉकडाऊन सत्कारणी! घरी बसलेली मुले शिकली घरगुती व्यवसाय

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  देशभर कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशभर लॉकडाऊन करण्यात आला होता. कडक नियमांमुळे घराबाहेर पडणे शक्य नव्हते. दिवसभर घरातच बसून अनेकांनी आपला परंपरागत व्यवसाय शिकला. तसेच वडिलोपार्जित सुरु असलेला उद्योग व्यसाय हा या रिकाम्या वेळेत आत्मसात केला. यामुळे खर्या अर्थाने लॉकडाऊन सत्कारणी लागला आहे, असे म्हणता येईल. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण @४५५०६ !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४८१ ने वाढ … Read more

मॅट्रिमोनीवरून महिलांची फसवणूक करणारा भामटा अटकेत

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-   विवाहासाठी इच्छुक वर तसेच वधू प्राप्तीसाठी अनेक विवाहनोंदणी (मॅट्रिमोनी) वेबसाईट उपलब्ध आहेत. मात्र अशाच एका वेबसाइटवरून महिलांना फसविणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, आरोपी कुणाल नंदकुमार जगताप ( वय ३७ वर्षे. रा.घर.नं.६, व्दारकाधिश हौसिंग सोसायटी, काटेगल्ली, त्रिकोणी गार्डनजवळ, व्दारका नाशिक) याने जीवनसाथी डॉट कॉम … Read more

आमदार रोहित पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत पार्थला टोला लागवला !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  गेल्याचे अनेक दिवसांपासून सुशांत सिंग मृत्यूप्रकरण चांगलेच गाजले होते. यामुळं राज्यातील राजकारण देखील ढवळून निघाले होते. आरोप – प्रत्यारोप झाले.  अखेर आज सुशांतच्या प्रकरणाचा अहवालास सर्वांसमोर आला. व आरोप कारण्याऱ्यांची तोंड गप्प झाली. सुशांतची हत्या नसून आत्महत्या आहे, असं एम्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांनी … Read more

खुशखबर! प्रत्येक कुटुंबातलय एका व्यक्तीस मिळणार नोकरी; कोठे आणि कसे? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- आपण नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. यूपीचे योगी आदित्यनाथ सरकार मोठी घोषणा करू शकते. वाढत्या बेरोजगारीच्या चिंतेचा सामना करण्यासाठी योगी सरकार अर्ध-शहरी आणि शहरी भागातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला नोकरी देणार आहे. लवकरच ही योजना जाहीर केली जाऊ शकते. यात मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज,तर वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत १४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला ४५ हजारांचा आकाडा !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५९७ ने वाढ … Read more

शिवसेना शहरप्रमुखांच्या बदलीसाठी ते जाणार थेट मुख्यमंत्र्यांच्या दारी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  दिवंगत नेते अनिल भैय्यांच्या जाण्याने पोरकी झालेली शहरातील शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. नुकतीच झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून उलट सुलट चर्चा होते आहे. आता नगरसेवक गणेश कवडे यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख यांच्याकडून सेनेच्या नगरसेवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच नगरसेवक व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव … Read more

शेतकर्‍यांना आणि कामगारांना अडचणीत आणणार्‍या धोरणाचा निषेध

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने जे नवे कृषि धोरण देशावर लादून शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु केला आहे. त्याचप्रमाणे नवीन कामगार धोरणातही कामगारांच्या हक्कांची पायमल्ली करुन त्यांचे हक्का हिरावून घेण्यात आले आहे. त्यांच्या या धोरणाला प्रखर विरोध करुन अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध केला आहे. शहराध्यक्ष बाळासाहेब … Read more

मुसळधार पावसामुळे या तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. दरम्यान या खड्यांचे लोकप्रतिनिधींनी देखील चांगलेच राजकरण केले होते. रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याने वाहनेच काय; पायी चालणेही कठीण झाले आहे. शेवगाव शहर … Read more