लाडक्या बालकाचा छंद पुरवण्याची जबाबदारी पालकाची असते, आ. बाळासाहेब थोरातांची विखेंना कोपरखिळी !

thorat

आपण कधीही चुकीचे राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाने विकासाचे राजकारण केले, म्हणून जनता सातत्याने आपल्यासोबत आहे. त्यांचे दहशतीचे अन् जिरवाजिरवीचे राजकारण फार काळ चालणार नाही. दहशतीचे राजकारण आता जनता सहन करणार नाही, असे सांगत माजी मंत्री आमदार बाळासाहेव थोरात यांनी नाव न घेता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात तोफ डागली. डॉ. … Read more

मेहनतीने व कष्टाने पिकवलेले डाळिंब कठीण काळात देतेय शेतकऱ्यांना आधार !

dalimb

एकीकडे सर्व शेतीमालाचे भाव कोसळलेले असताना राहाता तालुक्यातील चितळी परिसरात डाळिंबाच्या बागा आजमितीला शेतकऱ्यांना कर्जाचे ओझे हलके होण्यास आधारवड ठरल्या आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यात भूजल पातळीत घट झाली. याचा परिणाम डाळिंब बहरावर झाला. त्यामुळे फळाचा आकार आणि वजन अपेक्षित वाढले नाही. यामुळे डाळिंबाचे उत्पादन २० टक्क्यांनी घटले. असे असले तरी गत वर्षीच्या … Read more

राहात्यात १६० कोटींचा पीक विमा मंजूर, ४६ हजार ८२२ शेतकऱ्यांना मिळणार लाभ !

pik vima

महायुती सरकारने सुरु केलेल्या महत्वकांक्षी एक रुपयात पीक विमा योजनेतून राहाता तालुक्यातील ४६ हजार ८२२ शेतकऱ्यांना १६० कोटी रुपयांचा पीक विमा मंजुर झाला असून, यापैकी ४०.८५ कोटी रुपये अग्रीम रक्कमेच्या माध्यमातून यापुर्वीच शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना पुर्णपणे मिळावी यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. … Read more

एकीकडे पावसाची प्रतिक्षा, दुसरीकडे लिंकिंगची समस्या, युरिया असूनही न मिळण्यामागचे कारण काय ?

yuriya

पुरेसा पाऊस न पडल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. ज्यांच्या बियाण्याची उगवण झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना आता खतांची आवश्यकता आहे. खत विक्रेत्यांकडे शेतकरी युरिया खतांच्या गोण्या घेण्याकरिता वारंवार चकरा मारत आहेत. गोडाऊनमध्ये, दुकानात युरिया असतानासुद्धा खत विक्रेते लिंकिंग अर्थात दुसरे खत घेण्यास अप्रत्यक्षरीत्या भाग पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. … Read more

पाऊस काही थांबेना ! राजुरीत पाऊस, प्रवरानगर कारखाना परिसरात वादळ

Ahmednagar News

Ahmednagar News : राजुरी परिसरात पाऊस तर प्रवरानगरमध्ये वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या वाऱ्यामुळे पडल्याचे चित्र गुरुवारी अनेक ठिकाणी पाहाव्यास मिळाले आहे. राहता तालुक्यातील राजुरी, बाभ ळेश्वर, प्रवरानगर या गावांसह अनेक ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी नागरिकांची धांदल उडाली. वादळी वारा इतका होता की पुढे रोडवरून … Read more

गोदावरी नदीचे पात्र झाले माळरानासारखे ओस ! गोदावरीचे उजाड पात्र पुढच्या पिढीकरीता विनाशाची घंटा

Ahmednagar News

Ahmednagar News : पुणतांबा येथील गोदावरीचे पात्र उजाड माळरानासारखे कोरडठाक पडले आहे. संपूर्ण पात्रात खडक दिसत असल्याने नदी ओस पडलेली आहे. परिसरातील नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राहाता तालुक्यातील पुणतांबा गावाला पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोदावरी नदी येथे उत्तर वाहिनी असल्याने महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून पुणतांब्याची ओळख आहे. … Read more

Ahmednagar Unseasonal Rain : विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी ! उकाड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासा

विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतात उघड्यावर असलेले कांदे झाकण्यासाठी धावपळ झाली. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने असह्य उकाड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासाही मिळाला. काल शुक्रवारी दिवसभरातील वातावरणातुन पावसाचे संकेत मिळत होते. काल दुपारनंतर ढग जमा झाले आणि सव्वापाच वाजता या अवकाळी पावसाने हजेरी लावली. राहाता तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली नसली, तरी … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी : वाकडी येथील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील वाकडी येथे चार पिल्लांसह वास्तव्य असलेल्या बिबट्याने पानसरे यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केल्याची घटना दि. २ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. वाकडीतील पानसरे वस्तीवरील शेतकरी सचिन सुभाष पानसरे सकाळीच जनावरांचा चारा आणण्यासाठी सकाळीच शेतात गेले होते. येथे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांची व बिबट्याची चांगलीच झटापट … Read more

कांदा निर्यात बंदी उठविलेल्या निर्णय स्वागतार्ह- ना. विखे पाटील

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठविलेला निर्णय स्वागतार्थ असून सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करत मोदी सरकारचे अभिनंदन केले. मागील काही महिन्यापासून राज्यात कांदा निर्यातीवर बंदी होती. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील आणखी दोन पतसंस्थांमधील चेअरमन ७६ लाखांच्या ठेवी घेऊन फरार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात नुकताच संपदा पतसंस्थेच्या गैरकारभाराचा पर्दाफाश झाला. यातील अनेकांना जन्मठेप व काहींना इतर शिक्षा झाल्या. दरम्यान अहमदनगर हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळख असतानाही या जिल्ह्यात असले प्रकार समोर येत आहेत. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील आणखी दोन पतसंस्थेमधील गैरकारभार देखील समोर आला आहे. राहाता येथील स्वामीनी अर्बन मल्टीपर्पज निधीचे चेअरमन संतोष अर्जुन … Read more

शेतकरी पाहाताहेत चातकाप्रमाणे आवर्तनाची वाट

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे. निवडणुकीचा ज्वर शहारासह ग्रामीण भागात चढत आहे; मात्र अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या व निळवंडेच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या नजरा पाण्याचे आवर्तन केव्हा सुटेल याकडे लागल्या आहेत. राहाता तालुक्यातील वाकडी, लाडेवाडी, धनगरवाडी, चितळी येथील शेतकरी चातकाप्रमाणे सध्या पाट-पाण्याची वाट पाहत आहे. निवडणुका होतील पण पाण्याचावून जनावरांचे हाल होत आहेत. … Read more

वीज जोडणीसाठी पोलवर चढला आणि व्यवसायिकाने फ्युज टाकला ! विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : वीज वाहक पोलवर विजेच्या तारेची जोडणी करत असताना गिरणी व्यवसायिकाने पूर्व कल्पना असताना देखील डीपी वरील फ्युज टाकला. त्यामुळे राहाता तालुक्यातील वाकडी येथील बाबासाहेब माधव लहारे (वय ५१) यांचा विजेच्या जबर धक्क्याने नुकताच मृत्यू झाला. याप्रकरणी विकास बाबासाहेब लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक शेळके, अशोक कोते यांच्याविरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

बनावट सोने विकण्याचा प्रयत्न…! सराफाने आरोपींना कोंडून केले पोलिसांच्या स्वाधीन

Ahmednagar News

Ahmednagar News : खोटी बिलं दाखवून बनावट सोन्याचे दागिने विकणाऱ्या दोन आरोपींना अत्यंत चलाखीने बोलण्याच्या नादात गुंतवून ठेवत, दुकानाचे गेट लावून, पोलिसांना बोलावून घेऊन, आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना बुधवारी राहाता शहरातील सराफ बाजारपेठेत घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून बनावट सोन्याचे १३ ओमपान तसेच बोगस बिले व एक चारचाकी … Read more

विक्रीस आणलेल्या गांजासह महिला जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : राहत्या घरात गांजा विक्री करणाऱ्या राहाता येथील एका महिलेस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून तिच्या ताब्यातील ४ किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार पोनि. … Read more

Ahmednagar News : बापरे ! वय ३५ भयंकर गुन्हे २३, तिघे सराईत गुन्हेगार जेरबंद, लाखोंचे सोने हस्तगत

Ahmednagar News

Ahmednagar News : चैन स्नॅचिंग प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून 81 ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. सिताराम ऊर्फ शितल ऊर्फ गणेश भानुदास कुऱ्हाडे, राहुल अनिल कुऱ्हाडे, सचिन मधुकर कुऱ्हाडे (तिघेही रा.चितळी स्टेशन, ता.राहाता) अशी आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी : सुवर्णा शाम मिसाळ (वय … Read more

Agriculture News : फळबागांचा पीक विमा रखडला ! दुष्काळ जाहीर मग मदत कधी?

Agriculture News

Agriculture News : राहाता तालुक्यातील फळबांगाचा पीक विमा तसेच खरीप पीक विम्याची उर्वरीत रक्कम रखडली आहे. विमा कंपन्यांनी पात्र शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राहाता तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत चालू वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विमा हिस्सा भरण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे गेल्या खरीपात हवामान … Read more

मंत्री विखेंच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात पाच कौशल्य विकास केंद्र

Ahmednagar News

Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पाच चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची नुकतीच सुरुवात झाली. या पाचही केंद्रांचा प्रारंभ काल बुधवारी (दि. १३) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत दुरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आला. नगर जिल्ह्यात नुकताच नमो महारोजगार मेळावा झाला होता. या मेळाव्यातच कौशल्य विकास केंद्राची उभारणी … Read more

नगरचे अहिल्यानगर नामकरण करून आश्वासनांची वचनपुर्ती : मंत्री विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहराचे अहिल्यानगर, असे नामकरण करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून, महायुती सरकारने आश्वासनांची वचनपुर्ती केल्याची प्रतिक्रीया महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी … Read more