लसीकरणाला येणार वेग…जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयास १० हजार सिरिंजची मदत

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयास लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल १० हजार सिरिंजची मदत पुरविण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहा हजार सिरिंज जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांच्याकडे सुपूर्त करण्यात … Read more

डिंबे धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडल्याने घोड धरण पन्नास टक्के भरणार

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  कुकडी प्रकल्पातील सर्वात जादा क्षमता असलेले डिंबे धरण १०० टक्के भरले धरणातून नदीत ७ हजार ६८० क्युसेकने तर दोन्ही कालव्यांना ७५० क्युसेकने पाणी सोडले आहे. पिंपळगाव जोगे धरणात १ हजार ९६८ एमसीएफटी म्हणजे ५१ टक्के भरले आहे. कुकडी प्रकल्पातील डिंबे, वडज धरणे ओव्हरफ्लो झाले असून, डिंबे धरणातून ओव्हरफ्लोचे … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात पसरतेय कुत्र्यांची दहशत; प्रशासन मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यासह शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील अनेक भागांत अधूनमधून पिसाळलेल्या कुत्र्याकडून हल्ल्याचे प्रकार घडत असतात. आजवर त्यात कित्येक बालके व नागरिक जखमी झाले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या या प्रकारामुळे शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ऐककडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे प्रशासन मात्र निर्धास्त आहे. श्रीगोंदा तालुक्यातील … Read more

पैशाअभावी जामखेड आगाराला मिळेना डिझेल; काही बससेवा ठप्प

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला कोरोना महामारीचा फटका बसला असून, प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. अशा परिस्थितीत इंधन दरवाढ गगनाला भिडली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेची चाके उलटी फिरू लागली. पैशाअभावी जामखेड आगाराला डिझेल मिळत नाही. जामखेड आगारात एकूण ५१ बसेस आहेत. त्यापैकी चार शिवशाही आरामबस आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ह्या ठिकाणी एकाची हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- लाकडी काठीने हातापायावर डोक्यावर मारहाण करुन जबर जखमी करुन हात पाय दोरीने बांधुन जिवे ठार मारल्याची घटना  नगर जामखेड रोडवर आठवड शिवारातील घाटात हॉटेल सार्थक येथे घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव कैलास घोडके असे नाव आहे. याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर जामखेड रोडवर आठवड शिवारातील घाटात … Read more

रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तडजोड करण्यासाठी दबावतंत्राच्या हालचाली !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तडजोड करण्यासाठी दबावतंत्राच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ! रेखा जरे यांचे चिरंजिव रूणाल जरे यांनी स्वतःच यासंदर्भात पोलिस अधिक्षकांना मंगळवारी निवेदन सादर केले असून अशा तडजोडींसाठी पुढाकार घेणारांवर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षी ३० … Read more

आमदार रोहित पवार अर्थमंत्र्यांच्या भेटीस; जाणून घ्या काय आहे भेटीमागचे कारण

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. मतदारसंघाच्या विकासासाठी पवार यांनी ही भेट घेतली. नागरिकांसाठी सर्व सुविधांची पूर्तता करता यावी यासाठी निधी मिळावी म्हणून त्यांनी अर्थमंत्र्यांकडे मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. हे आहेत भेटी मागचे कारण :- रोहित पवार यांनी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ३३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

खासदार सुजय विखे यांनी ‘त्या’ ठेकेदाराला दिला काळे फासण्याचा ईशारा!

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव ते नगर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषीत झालाय या रस्त्याचं काम येत्या पंधरा दिवसात सुरु न केल्यास ठेकादाराला पकडुन त्याच्या तोंडाला काळ फासण्याचा ईशारा आता भाजपाचे खासदार सुजय विखेंनी दिलाय. नगर ते मनमाड ह्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेत चांगला रस्ता शोधुनही सापडणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एकाचा मृत्यू ! ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- नगर-दौंड रोडवरील खडकी शिवारात भरधाव वेगातील ट्रक चालकाने जोराची धडक दिल्याने अपघात झाला.  अपघातात अशोक नामदेव अडसूळ (वय ४७, रा. बुरुडगाव) यांचा मृत्यू झाला.  राधाबाई नामदेव अडसूळ यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार  ट्रक (क्र. एमएच २१, एक्स ५५८१) चालकाविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  अज्ञात चालक … Read more

वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पापाचा घडा भरला !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठविला होता. त्यानुसार देवरे यांच्या बदलीचा आदेश राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी काढला आहे. मागील आठवड्यात अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने नाशिक विभागीय आयुक्तांच्या कार्यालया समोर … Read more

जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या त्या पोलिसाचे निलंबन करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या राहुरी येथील पोलीस कर्मचारी व त्याच्या मुलाकडून स्वत:च्या व कुटुंबीयांच्या जीवितास धोका असून, सदर कर्मचारी पोलीस असल्याचा गैरफायदा घेत पिस्तोलचा धाक दाखवित असल्याने त्याचे निलंबन करण्याची मागणी तक्रारदार विजय वाघ यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर सदर पोलिसाचे कुटुंबीय पोलीस वाहनचे घरगुती कामासाठी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 953 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

आयटी पार्क खोटच आहे म्हणूनच आमदारांनी किरण काळें समोर खुल्या चर्चेला येण्यापासून पळ काढला ;

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- आयटी पार्क प्रकरणावरून रणकंदन अजूनही संपलेले नाही. काँग्रेसच्या वतीने पोलखोल करत जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आयटी पार्कचे प्रणेते राष्ट्रवादीच्या आमदारांना आयटी पार्कच्या बिल्डिंगमध्ये हिंमत असेल तर समोरासमोर चार दिवसाच्या आत येऊन नगरकरां समोर खुली चर्चा करावी असे आव्हान दोन सप्टेंबर रोजी दिले होते. आज बारा दिवस उलटले तरी … Read more

कोरोनाने अनाथ झालेल्यांना ‘या’ शाळेत मिळणार मोफत शिक्षण

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- pकोरोनामुळे अनाथ झालेल्या किंवा घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्काचा भार श्री संत गजानन महाविद्यालय उचलणार असून, त्यांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. याबाबतची माहिती संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विजय गोलेकर यांनी दिली आहे. दरम्यान … Read more

या कारणामुळे झाली ज्योती देवरे यांची जळगावला बदली !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांची अखेर जळगावला बदली करण्यात आली. देवरे यांनी महिला आयोग आणि नाशिकच्या महसूल आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचा अहवाल समितीने दिला. देवरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींत तथ्य आढळून आल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला. त्यांना १४ सप्टेंबरपासून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात … Read more

बिग ब्रेकिंग : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली !

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर अहमदनगर जिल्ह्यातून अखेर बदली झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातुन जळगाव जिल्ह्यात ज्योती देवरे यांची नियुक्ती झाली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव ला संजय गांधी निराधार योजनेत बदली झाली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वर … Read more

वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोरोनामुळे देशभरात आरोग्य विभागावर मोठा ताण पडला आहे. यातच अनेक ठिकाणी अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांवर उपचार होत नाही व यामुळे रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहे. यातच पारनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हे सध्या समस्येच्या विळख्यात सापडले आहे. पारनेर ग्रामीण रुग्णालयात एम.डी. डॉक्टर नाही म्हणून व्हेंटिलेटर सुविधा, सीटी … Read more