अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- नगर-दौंड रोडवरील खडकी शिवारात भरधाव वेगातील ट्रक चालकाने जोराची धडक दिल्याने अपघात झाला. 

अपघातात अशोक नामदेव अडसूळ (वय ४७, रा. बुरुडगाव) यांचा मृत्यू झाला. 

राधाबाई नामदेव अडसूळ यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार 

Advertisement

ट्रक (क्र. एमएच २१, एक्स ५५८१) चालकाविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

अज्ञात चालक हा त्याच्या ताब्यातील ट्रक नगर-दौंड रोडवरुन घेवून जात असताना 

त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने पायी चालणाऱ्या अशोक अडसूळ या इसमास जोराची धडक देण्यात आली. 

Advertisement

धडकेत अडसूळ जखमी होवून मृत्यूमुखी पावले. पुढील तपास पोहेकॉ. लबडे हे करत आहेत.