मोबाईल टॉवर विरोधात नागरिकांचा प्रेमदान चौकात रास्तारोको आंदोलकांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-  शहरातील धर्माधिकारी मळा येथे उभारण्यात येत असलेल्या फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम त्वरीत बंद करण्यासाठी संतप्त नागरिकांनी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने नगर-मनमाड रस्त्यावर प्रेमदान चौकात रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांना पोलीसांनी अटक केली. या आंदोलनात अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, … Read more

शिक्षकांना समाजात आजही तेवढाच सन्मान -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-  मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान झाला नाही. शिक्षकांनी कोरोनाच्या संकटकाळात फ्रंन्टलाईन वर्कर म्हणून कार्य केले. प्रत्येक क्षेत्रात शिक्षक योगदान देत आहे. शिक्षकांना समाजात आजही तेवढाच सन्मान आहे. जिवंत असे पर्यंत शिक्षक हे मार्गदर्शकाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने … Read more

मुसळधार पावसामुळे जनावरांसह कोंबड्या गेल्या वाहून; पहा कोठे घडली घटना…

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव मध्ये झालेल्या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील कांबी गावाला तडाखा दिला. या पावसाच्या पाण्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच खरीप पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून कांबीमधील काहींची जनावरे व कोंबड्या वाहून गेल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. मात्र यंदा शेवगाव – पाथर्डी … Read more

जिल्ह्यातील ‘त्या’ चार तालुक्यांमधील पाऊस सरासरीच्या ९० टक्के कोसळला

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यातच गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी ९१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यात चार तालुक्यांमधील पाऊस सरासरीच्या ९० टक्के इतका झाला आहे. सर्वाधिक पाऊस शेवगाव व पाथर्डी तालुक्यात असून पावसाची ही टक्केवारी शंभर टक्क्याहून अधिक आहे. तर दक्षिण भागातील पारनेर, जामखेड आणि कर्जत … Read more

जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतके’ टक्के पावसाची झाली नोंद

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-नगर शहरात पावसाची संततधार कायम असून शनिवारी रात्रभर पाऊस बरसल्यानंतर रविवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यातील पावसाची सरासरीच्या 409 मि.मी. पावसाची नोंद झाली असून टक्केवारीत हा पाऊस 90 टक्के आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी रात्रभर संततधार पडत होता. रविवारी सकाळपासून विश्रांती घेतल्यावर दुपारी चारच्या सुमारास पुन्हा … Read more

गुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा गुरु माऊली प्राथमिक शिक्षक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे यांची तर जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी बाळासाहेब सरोदे तर कार्याध्यक्षपदी अजय लगड यांची निवड करण्यात आली. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे चेअरमन … Read more

‘या’ कारणामुळे कर्जत तालुक्यातील तीन सावकारांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-  व्याजापोटी एका शेतकऱ्याची विहीर स्वतःच्या नावावर करून तिची परस्पर विक्री करणाऱ्या कर्जत तालुक्यातील तीन सावकारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक रामदास शिंदे, राजेंद्र महादेव कापरे (दोघेही रा.कापरेवाडी ता.कर्जत),विशाल उर्फ भाऊ जगताप (रा.सुपे ता.कर्जत) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी नाना … Read more

आमदार निलेश लंकेना अश्या छोट्या, मोठ्या गोष्टींमुळे फार काही त्रास होईल, असं वाटत नाही… 

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-  विधानसभा सदस्याच्या मर्यादा ठरल्या आहेत, तशा अधिकाऱ्यांच्याही मर्यादा ठरल्या आहेत. हा गाडा व्यवस्थित चालवायचा असेल तर मर्यादेत राहूनच काम झालं पाहिजे असे सांगत मंत्री जयंत पाटील यांनी तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणावर सूचक वक्तव्य केले. थोडा त्रास होतोय, याची आम्हाला जाणीव आहे मात्र योग्य वेळी योग्य निर्णय होईल असा … Read more

Ahmednagar News : अरे देवा..! ‘त्या’ तालुक्यात परत आला पूर…?

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कांबी परिसरात  शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गावातील नदीला महापूर आला असून, या पुराचे पाणी गावात घुसल्याने अनेक नागरिक व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतही पुराच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने उसासह अनेक पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर … Read more

दोन टेम्पोमधून गुटखा वाहतूक करणार्‍या पाच जणांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तर त्यांचा एक साथीदार शेख अब्दूल रऊफ (रा. मोमीन गल्ली, भिंगार) हा पसार झाला आहे. त्यांच्याकडून हिरा गुटखा, रॉयल 717 तंबाखू व दोन टेम्पो असा 15 लाख 62 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नगर-दौंड रोडवरील अरणगाव (ता. नगर) चौक येथे … Read more

आमदाराला मर्यादा आहेत तशा अधिकाऱ्यांनाही मर्यादा असतात; जयंत पाटलांचे सूचक विधान

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान या व्हायरल ऑडिओ क्लिपवर जयंत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. निलेश लंके हे उत्तम काम करत आहे. गेल्या काही दिवसांत काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांच्याविरुद्ध प्रश्नचिन्ह … Read more

चोरटे बिनधास्त… पोलीस निर्धास्त… नागरिक जगतायत दहशतीखाली

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. चोऱ्यांचे प्रमाण वाढले मात्र गुन्ह्यांचा शोध घेण्याचे प्रमाण मात्र अल्प आहे. यामुळे सध्या नागरिकांची सुरक्षा हि बेभरवशी आहे, असेच चित्र सध्या नगर शहरासह जिल्ह्यात दिसून येत आहे. नुकतेच नगर शहरातील कल्याण रोड परिसरात … Read more

जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी एकावर चाकू हल्ला करत केले ठार

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी एका तरुणावर चौघांनी चाकू हल्ला करीत त्याचा खून केल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात राजेंद्र रामकिसन जेधे (वय ३३) याचे निधन झाले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल केले असून तिघांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रशांत बबन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवाजी कर्डीले यांच्या मध्यस्थीने तनपुरे कारखाना कामगारांचे उपोषण मिटले !

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगारांनी गेल्या १४ दिवसापासून उपोषण सुरू केले होते.सत्ताधारी संचालक मंडळाने दोन पाऊले पुढे तर कामगारांनी दोन पाउले मागे घेऊन १४ व्या दिवशी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आले. माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, पत्रकार विनित धसाळ यांनी समनव्याची भूमिका बजावून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ७५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १५ हजार १५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

निकृष्ठ रस्ते… रस्त्यावर वृक्षारोपण करून नागरिकांनी व्यक्त केला संताप

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची मोठी दुरावस्था निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यां निर्माण होत आहे. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमधून संतापाची लाट निर्माण होत आहे. नुकतेच अशीच काहीशी परिस्थिती राहुरी तालुक्यातील करजगाव येथे निर्माण झाली आहे. करजगाव येथील रस्ता मुत्युचा सापळा बनला असून रस्त्याची … Read more

तू जर पैसे घेऊन आली नाही तर तुला जिवंत सोडणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात महिला हिंसाचाराच्या घटना सुरूच असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच अशीच एक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. पतीने आपल्या पत्नीकडे दुबईला जाण्यासाठी पत्नीकडे ५० हजार रुपये माहेरहून घेऊन ये म्हणत तिचा छळ केला. . दरम्यान याप्रकरणी जयश्री … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 723 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम