महायुतीच्‍या उमेदवाराला पाठबळ देवून जिल्‍ह्याच्‍या विकासाचा मार्ग आपण सर्वजण धरुयात : विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : विकासाला प्राधान्य देतानाच, संस्कृती परंपरेचा वारसा जतन करण्याचे महत्वपूर्ण काम विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आयोध्येतील एैतिहासिक श्रीराम मंदिराची निर्मिती करून कोट्यावधी हिंदूच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहुरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री.खंडोबा यात्रेच्या निमित्‍ताने मंत्री विखे पाटील यांनी दर्शन घेतले. यात्रा उत्सवात … Read more

मुळा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा, नदी पात्राचे वाळवंटात रूपांतर !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात मुळा नदीचे पात्र कोरडे पडल्याने सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा जोरदारपणे सुरू आहे. मुळा नदी पात्राचे वाळवंटात रूपांतर होत असून पोलीस यंत्रणा व महसूल विभागाने वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, राहुरी स्टेशन परीसर हे … Read more

डॉ. तनपुरे कारखाना कामगारांचा खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा; जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत मेळावा

Ahmednagar News

Ahmednagar News : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात आपण कधीच राजकारण केलेले नाही सर्व कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिल्याने सर्व कामगारांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. राहुरी येथे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचा मेळावा जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री … Read more

Ahmednagar Accident : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील वडील ठार, मुलगा जखमी

Ahmednagar Accident

Ahmednagar Accident : राहुरी शहर हद्दीत नगर- मनमाड रस्त्यावर वडील व मुलगा मोटारसायकलवर कोल्हारकडून नगरकडे जात असताना मागून आलेल्या कंटेनरची त्यांना जोराची धडक बसली. या घटनेत विजय शिरसाठ यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलगा किरकोळ जखमी झाला. ही घटना दि. २० एप्रिल २०२४ रोजी सकाळी घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी, की विजय द्वारकानाथ … Read more

बारागाव नांदूर परिसरामध्ये अर्धा तास जोरदार पाऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये काल शनिवारी (दि.२०) सायंकाळी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. तसेच राहुरी शहरात देखील वादळी वाऱ्यासह काल सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी राहुरी तालुक्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. राहुरी तालुक्यातील वळण परिसरामध्ये रात्री आठ वाजता वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे … Read more

दारू वाहतूक करणाऱ्या एकाला पकडले : राहुरी पोलिसांची कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी शहरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई करण्यात येऊन सुमारे ३२ हजारांची दारू पकडण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राहुरी शहरात अवैधरित्या वाहनांमध्ये दारूची चोरटी वाहतूक होत … Read more

जयश्रीला मोबाईलवर कॉल मॅसेज का करतो असे म्हणून तरुणाचे अपहरण करुन लुटले !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका तरुणाला चार जणांनी जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण करून नेले. त्यानंतर तु मोबाईलवर कॉल व मॅसेज का करतो, असे म्हणुन शिवीगाळ करत केबल व लाकडी काठीने मारहाण केली. तसेच १ लाख १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम काढून घेतली. राहुरी तालुक्यातील वडनेर येथे (दि.१३) एप्रिल रोजी ही घटना घडली. याबाबत … Read more

सुसंस्कृत राजकारणामुळेच जनतेचे पाठबळ : खा. विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगर मधून खा. डॉ विखे पाटील निवडून जाणार एवढाच प्रचार करून महायुतीची बाजू मतदारासमोर कणखरपणे मांडा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील गुहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित … Read more

चुलता-चुलतीला लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतीचा वाद व आमचे शेतापासुन लांब गव्हाचे काड पेटुन दे, असे म्हणाल्याचा राग आल्याने पुतण्यांनी चुलता व चुलतीला लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे दि.९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी घडली. श्रीकृष्ण जगन्नाथ राजदेव, वय ५५ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे … Read more

Ahmednagar Crime : धूम स्टाईलने प्राध्यापिकेचे दागिने पळविणारे दोघे गजाआड

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुका हद्दीत धूम स्टाईलने महिलांच्या अंगावरील दागिने पळविणाऱ्या श्रीरामपूर येथील दोघा जणांचा राहुरी पोलीस पथकाने शोध घेऊन सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. सुमती संजय दिघे, वय ५३ वर्षे, या महात्मा फुले कृषी विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणुन नोकरी करतात. त्या राहुरी खुर्द येथील राजेश्वरी कॉलनी येथे रहावयास आहेत. दि. २१ मार्च २०२४ … Read more

पती-पत्नीला शिवीगाळ करत मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी दोघा पती-पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना येथे नुकतीच घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली दिपक चव्हाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वैशाली चव्हाण यांचे दिर अनिल रावसाहेब चव्हाण व आरोपींचे पुर्वी वाद झालेले आहेत. त्या कारणावरुन आरोपी दारु पिवून … Read more

Ahmednagar News : जाचाला कंटाळून कर्जदाराची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : एका पतसंस्थेवर असलेल्या प्रशासकाच्या जाचाला कंटाळून राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील सुभाष मघाजी चोथे (वय ५५) या कर्जदाराने रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष मघाजी चोथे (वय ५५, रा. चोथे वस्ती, टाकळीमियाँ) हे मंगळवारी (दि.९) … Read more

महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली : खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली, त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्याचा महाराष्ट्राला कधीच विसर पडणार नाही अशा शब्दांत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. राहुरी शहरात प्रचार सभेच्यादौरान महात्मा … Read more

उंबरे येथे एकाला गजाने मारहाण…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेती व सामायिक घराच्या वादातून प्रवीण गायकवाड यांना कोयता, गज व दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी घडली. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की प्रविण शहाराम गायकवाड (वय २७ वर्षे) हे राहुरी तालुक्यातील … Read more

उसन्या पैशावरुन नातवाकडून आजीला मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरुन नातवाने आजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चुलत्याला तलवार दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे नुकतीच ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला रामभाऊ जाधव (वय ७५) या राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द, ता. राहुरी येथे त्यांचा मुलगा व मोठा नातू युवराज यांच्यासह राहतात. त्यांच्या शेजारीच … Read more

Ahmednagar News : आई व भावजयला लाथा बुक्क्यांनी मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : हे घर माझे आहे, या घरात तूम्ही रहायचे नाहीत, असे म्हणून भावाने भावाला तसेच आई व भावजयला लाकडी दांडा, लोखंडी पाईप व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दि. २७ मार्च २०२४ रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. प्रियंका विशाल गोडगे वय २२ वर्षे रा. लाख रोड, देवळाली प्रवरा, ता. … Read more

टेलरच्या खूनप्रकरणी दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील गुंजाळे येथे टेलर काम करणाप्या एका तरुणाचा गोळी मारून खून करण्यात आला होता. सुमारे दोन वर्षांनंतर या घटनेतील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील प्रदिप एकनाथ पागिरे हा टेलर काम करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरासमोरच त्याचे दुकान असल्याने … Read more

राहुरी तालुक्यातील १० लाख टन उसाचे झाले गाळप

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदाचा ऊस गळित हंगाम अंतिम टप्प्यात असून राहुरी तालुक्यातील जवळपास १० लाख मेट्रिक टन उसाचे राहुरीतील खासगी कारखान्यासह जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या हंगामत सर्वांनाच वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले. हंगाम जिल्ह्यातील २२ साखर कारखाने यंदाच्या हंगामात सुरू राहिले. यात १३ सहकारी तर नऊ खासगी साखर … Read more