टेलरच्या खूनप्रकरणी दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : तालुक्यातील गुंजाळे येथे टेलर काम करणाप्या एका तरुणाचा गोळी मारून खून करण्यात आला होता. सुमारे दोन वर्षांनंतर या घटनेतील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील प्रदिप एकनाथ पागिरे हा टेलर काम करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरासमोरच त्याचे दुकान असल्याने गावातील अक्षय कारभारी नवले हा मयत प्रदिप याच्याकडे नेहमी येत होता.

सुमारे दोन वर्षापूर्वी ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजे दरम्यान मयत प्रदीप एकनाथ पागिरे हा त्याच्या दुकानात काम करत होता. त्यावेळी मयत प्रदिप पागीरे जवळ अक्षय नवले होता. त्यावेळी काहीतरी कारणावरुन अक्षय याने प्रदिप पागिरे याच्या नाकावर बंदुकीतून गोळी मारली.

ती गोळी प्रदिप याच्या मानेत जाऊन अडकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रदिपला अक्षय नवले याने त्याच्या गाडीतून अहमदनगर येथील एका रुग्णालयात नेले. तेव्हा अक्षय नवले याने प्रदिप पागीरे याला रुग्णालयात दाखल करून गाडी पार्किंग करुन येतो, असे सांगून त्या ठिकाणाहून तो पसार झाला.

त्यावेळी प्रदिप हा रुग्णालयात उपचारापूर्वीच मव्रत झाला होता. कोणताही साक्ष पुरावा नसल्याने तसेच मयत प्रदीप पागिरे याचा खून झशला की, त्याने आत्महत्या केली, हे समजू शकले नव्हते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यात २०/२०२२ नुसार सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीसांकडुन सुरु होता. या दरम्यान मयत प्रदीप पागीरे याच्या नातेवाईकांना प्रदिप याच्या खुनाबाबत गावातून थोडीफार माहिती मिळाली आणि त्यांना अक्षय नवले याचा संशय आला. त्यानंतर काल मयत प्रदीप एकनाथ पागीरे याचा भाऊ अविनाश एकनाथ पागिरे (वय ३६ वर्षे, रा. गुंजाळे, ता. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय कारभारी नवले (रा. गुंजाळे, ता राहुरी) याच्यावर गुन्हा रजि. नं. ३४२/२०२४ नुसार भा.दं.वि. कलम ३०२, शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम २५/३ प्रमाणे खून व आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रदिप पागीरे याची हत्या झाल्यानंतर हत्येच्या वेळी वापरलेली बंदुक जप्त करण्यात आली आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, तब्बल दोन वर्षांनंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.