ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावल्याने सरकारी कामात अडथळा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार दिनांक २७ मे रोजी करजगांव येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयात घडलाय. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आलाय. राहुरी तालूक्यातील करजगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील पाणिपुरवठा कर्मचारी सोमनाथ बापुसाहेब देठे हा दिनांक २७ … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स @ २८ मे २०२१ जाणून घ्या जिल्ह्यातील अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २२९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४३ हजार २४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

या’ शहरातील १५ बालकांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोरोना माहामारीची तिसरी लाट येऊ घातली.त्याचा लाटेचा विशेष करुन लहान मुलांवर प्रभाव लहान मुलांवर होणार असल्याचे सांगितले गेले. दि.24 ते 27 मे या चार दिवसात देवळाली प्रवरा शहरात 1 ते 16 वर्ष वयाचे 15 लहान मुले कोरोना बाधित आढळले असल्याने कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असुन त्याचा देवळाली … Read more

जिल्हा परीषद शाळेत 20 हजारांचे साहित्य चोरी, शाळेच्या मैदानावर तळीरामांचा उच्छाद!

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील सहा वर्ग खोल्यांचे दगडाच्या साह्याने दरवाजे तोडून सहा खोल्यातील इलेक्ट्रिक फँन व खुर्च्यासह इतर साहित्य असे 20 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. लाँकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने शाळेच्या मैदानावर तळीरामांनी उच्छाद मांडला आहे.मैदानावर दारुच्या रिकाम्या व … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या चोवीस तासांतील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1408 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 131 अकोले – 121 राहुरी – 89 श्रीरामपूर – 94 नगर शहर … Read more

किरकोळ कारणावरून तरूणावर केले कोयत्याने वार!

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  शेतात नांगरणी करण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरूणावर कोयत्याने वार करून गजाने बेदम मारहाण करत जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे घडली आहे. याबाबत सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर  या मारहाणीत मुसा मेहबूब पठाण (वय ३६ वर्षे रा. ब्राम्हणी ता. राहुरी) हा तरुण गंभीर जखमी … Read more

वाळू तस्करांच्या सुसाट गाडीला सोनई पोलिसांचा ब्रेक

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  रात्रीचा फायदा उठवत वाळूची अवैध वाहतुक करत असलेल्या टेम्पोसह दोन आरोपीस सोनई पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई सोनई-कांगोणी रस्त्यावर करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनई-कांगोणी रस्त्यावर पोलीस पथकाने छापा टाकून चोरटी वाळू वाहतुक करणारा टेम्पो सह आरोपी सचीन रामदास माळी व विक्रम सुभाष माळी … Read more

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात चाचण्यांची संख्या वाढवा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दैनंदिन २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या गेल्या काही दिवसांत होत आहेत. त्यामुळे बाधितांना तसेच त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. … Read more

धक्कादायक ! शेतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- शेतात नांगरणी करण्याच्या कारणावरून एका तरूणावर कोयत्याने वार करून गजाने बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे घडली आहे. याप्रकरणी मुसा मेहबूब पठाण (वय 36 वर्षे रा. ब्राम्हणी ता. राहुरी) याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहाजणांवर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यात मृत्यूवाढ ठरतेय चिंतेची बाब !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. मात्र त्याचबरोबर एक चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान रेड झोनमध्ये समावेश असलेल्या नगर जिल्ह्यात नव्या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करून … Read more

पोलिसांना पाहून तळीरामांनी ठोकली धूम

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राहुरी शहरात सार्वजनिक ठिकाणी तळीरामाची मैफील जमविणा-या लोंकावर राहुरी पोलिसांनी दि. 26 मे रोजी धाड टाकून कारवाई केली. पोलिसांना पाहून तळीरामांनी धुम ठोकून पसार झाले. मात्र त्यांच्या तीन मोटरसायकली जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड रोडवर असलेल्या गाडगे महाराज काॅम्प्लेक्स समोरील मोकळ्या जागेत … Read more

तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणारे 3 आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- पत्नीस माहेरी पाठविण्यास पतिने नकार दिल्याने त्यास पत्नीचे नातेवाईकांनी मारहाण केल्यामुळे राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील तरुण रोहित कचरू लांडगे (वय 24) याने राहते घरी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत रोहित लांडगे यांची आई शिवा बाई यांनी दिल्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. मयताची सासू … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे,   गेल्या 24 तासांत 1610 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  नगर शहर – 122 नगर तालुका – 90 श्रीगोंदा – 73 पारनेर – 90 कर्जत – 71 जामखेड – 82 राहुरी – 126 पाथर्डी – 86 … Read more

राहुरी तालुक्यात महिनाभरात तब्बल १.५४ लाखांची गावठी व देशी दारू जप्त

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  लॉकडाऊन दरम्यान राहुरी तालुक्यात हातभट्टी व देशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या गुत्त्यावर पोलिसांनी मंगळवारी छापे टाकून २७६० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.  दारूविक्री करणारे पसार :- पोलिस आल्याचा सुगावा लागताच दारूविक्री करणारे पसार झाले. दरम्यान, मागील महिनाभरात पोलिसांनी २७ गुत्तेदारांवर कारवाई करत १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.  पोलिसांची … Read more

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत आहे मात्र लहान मुलांचे कोरोना बाधित होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे, १८ वर्षांखालील रुग्णांसाठी आद्याप लस उपलब्ध झालेली नसल्याने लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे. मुलांच्या आकेडवारीकडेही लक्ष :- कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात येत असल्याने बाधित मुलांच्या … Read more

सोनार विशाल कुलथे यांच्यामारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- शिरूर कासार येथील विशाल कुलथे या सोनाराचा निर्घुण खून करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राहुरी तालुका सोनार संघटनेचे अध्यक्ष महेश शहाणे यांनी केली. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सोने खरेदी करण्याच्या उद्देशाने कुलथे यांना सलूनच्या दुकानात बोलावून गळा दाबून हत्या करण्यात … Read more

‘या’ शहरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राहूरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीने राहूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, २६ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सदर मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करणाकरिता पळवून नेले. … Read more

‘त्या’जुगार अड्ड्यावर छापा; पाचजण ताब्यात!

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच उद्योग व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम नसल्याने ते जुगारासारख्या अवैध व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच … Read more