राहुरी तालुक्यात महिनाभरात तब्बल १.५४ लाखांची गावठी व देशी दारू जप्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  लॉकडाऊन दरम्यान राहुरी तालुक्यात हातभट्टी व देशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या गुत्त्यावर पोलिसांनी मंगळवारी छापे टाकून २७६० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 

दारूविक्री करणारे पसार :- पोलिस आल्याचा सुगावा लागताच दारूविक्री करणारे पसार झाले. दरम्यान, मागील महिनाभरात पोलिसांनी २७ गुत्तेदारांवर कारवाई करत १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलिसांची कारवाई :- देवळाली प्रवरा, वांबोरी, राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात घरांच्या आडोशाला चालणाऱ्या दारूविक्रीवर पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली.

मुद्देमाल जप्त :- पहिला छापा राहुरी रेल्वे स्टेशन येथे टाकून १ हजार किमतीची १० लिटर गावठी दारू, वांबोरी येथे सडे रस्त्यालगत असलेल्या चौकात संत्रा या देशी दारूच्या १ हजार ४० रुपये किमतीच्या २० बाटल्या, तर देवळाली प्रवरा येथे संत्रा दारूच्या ७२० रुपये किमतीच्या १२ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. 

पुढील तपास सुरु :- सहायक फौजदार टिक्कल, हेड काॅन्स्टेबल आव्हाड, काॅन्स्टेबल शिवाजी खरात हे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.