डिझेल प्रकरणाचा तपास आता पोलीस उपाधीक्षक मिटके यांच्या खांद्यावर

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात वाढते अवैध धंदे हे वाढत असताना त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र पोलिसांची हि कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे. यामुळे काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. यातच जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले होते. यातच पुन्हा एक मोठी माहिती समोर येत … Read more

डिझेल प्रकरण! मंत्र्यांच्या दबावातून ‘त्या’ पथकातील पोलिस सस्पेंड

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले आहे. दरदिवशी याप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान हे प्रकरण घडल्यानंतर पोलीस प्रशासनावरच शिंतोडे उडवण्यात आले. यातच काहींवर निलंबनाची कारवाई देखील झाली. यातच जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने या प्रकरणावरून मोठा आरोप केला आहे. नुकताच या प्रकरणाचा तपास तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक … Read more

मास्कचा वापर न करणार्‍यांवर होणार दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- संपुर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. तसेच कोरोनाला हद्दपार करण्यासाठीची लढाई जिल्ह्यात सुरु असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. दरम्यान शासनाच्या नियमांचे भंग केल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. सध्या सणासुदीचा … Read more

पद्मश्री व्यक्तिमत्वाच्या मदतीला आमदार लंके गेले धावून !

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- तब्बल ५२ पिकांच्या ११४ गावरान वाणांची देशी बियाणे बँकेत जपवणूक करणाऱ्या अकोले तालुक्यातील पद्मश्री राहिबाई पोपरे यांना मिळालेले शेकडो पुरस्कार आता पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी भेट दिलेल्या लोखंडी मांडण्यांमध्ये (रॅक) विराजमान होणार आहेत. अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदीवासी गावातील सामान्य अशिक्षित महिला असलेल्या राहिबाई यांनी देशी बियाण्यांची … Read more

60 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतायेत मारुतीच्या ‘ह्या’ कार; जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- आपल्याला एखादी कार खरेदी करायची असेल आणि आपले बजेट नवीन कार विकत घेण्यासारखे नाही तर काळजी करू नका . आपण सध्या सेकंड हँड कार खरेदी करू शकता. विशेषत: ज्या ग्राहकांना कार खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी सेकंड हँड कार खरेदी करणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण याद्वारे ते … Read more

अरे वा ! स्मार्टफोनशी कनेक्ट होणारी रॉयल एनफील्डची ‘ही’ बहुप्रतीक्षित बाईक लॉन्च

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- रॉयल एनफील्डने आपले सर्वाधिक प्रतिक्षीत असलेली बुलेट मीटियर 350 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. त्याची प्रारंभिक किंमत 1.76 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक फायरबॉल, सेटेलर आणि सुपरनोव्हा या तीन भिन्न वैरिएंट मध्ये ते विकत घेऊ शकतील. यात त्यांना पिवळा, काळा आणि लाल रंगाचा पर्याय मिळेल. लॉन्चबरोबरच … Read more

1 डिसेंबरपासून बीएसएनएल प्लॅनमध्ये होणार ‘हे’ बदल ; ‘ह्या’ ग्राहकांना होणार ‘हा’ फायद

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- 1 डिसेंबरपासून बीएसएनएल अनेक योजना बदलणार आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी 3 नवीन पोस्टपेड योजना देखील सादर करेल, ज्याची किंमत 199 रुपये, 798 आणि 999 रुपये आहे. बीएसएनएल आणखी एक मोठा बदल करणार आहे, ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होईल. कंपनी आपल्या 106 आणि 107 रुपयांच्या योजनेची वैधता वाढवणार आहे. … Read more

सणासुदीच्या काळात कापड बाजारात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- शहरातील कापड बाजार येथे सणासुदीच्या काळात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने भुरट्या चोरीपासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी बाजारात पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित … Read more

केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, सरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर संघटना एकवटले

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने हे हक्क आणि अधिकार अबाधित ठेऊन केंद्र सरकारने घेतलेल्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. जगातील पहिली कामगार, … Read more

संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटकाळाची जाणीव ठेऊन बिरोबा दूध संकलन केंद्रास (ता. राहुरी) दूध पुरवठा करणार्‍या दूध उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. दूध उत्पादक शेतकर्‍यांना एकरकमी ठेव, बोनस म्हणून साखर वाटप तसेच स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल, फेटा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. घोरपडवाडीचे माजी उपसरपंच नवनाथराव … Read more

शिवसेनेचे हे नेते पोहोचले गडाखांच्या घरी.. कुटुंबियांचे केले सांत्वन

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रकाश गडाख यांचा गळफासा मुळे मृत्यु झाला. रविवारी त्यांच्यावर सोनई येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.   गौरी गडाख यांच्या मृत्युमुळे सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सोनईला येत गडाख कुटुंबियांची … Read more

भजन पडले महागात; आणखी दहा जणांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. मात्र जिल्ह्यातील अकोळनेर मधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांना त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी केली असता काही … Read more

महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची स्थिती

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ८ अंश सेल्सिअसने घट होऊन चंद्रपूरमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी या ठिकाणी राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भातील इतर ठिकाणीही तापमानातील घट कायम आहे. मराठवाडय़ातील परभणी व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावमध्येही तापमानाचा … Read more

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जॉबची ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अपयशी झाल्यानंतर येरूसलेममधील नगर निगमने त्यांना नोकरीची ऑफर देऊ केली आहे. नगर निकायच्या फेसबुक पेजवर जॉब बोर्डची लिंक शेअर करण्यात आली आहे आणि लिहिलं आहे की, ‘डोनाल्ड जे. ट्रम्प तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आमच्या नवीन येरूसलेम जॉब बोर्ड नवीन नोकरीच्या संधींसह अपडेट … Read more

अहमदनगरमध्ये फ्री होम डिलिव्हरी आणि 2 ते 50 % सूटही; ‘खरेदिवाला’तर्फे ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-सध्या दिवाळीच्या किराणा सामानासह सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी नगरकरांची लगबग सुरू आहे. अशावेळी लोकरंग कॉर्पोरेशन संचालित ‘खरेदिवाला मेगामार्ट’तर्फे ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर झालेली आहे. यामध्ये किराणा सामानाची यादी फ्री होम डिलिव्हरीसह ग्राहकांना तब्बल 2 ते 50 टक्के इतकी भरघोस सूट मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना संचालिका माधुरी चोभे यांनी … Read more

शाळेत घुसून चोरटयांनी केली तोडफोड; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-विद्येचे माहेरघर व शिक्षणाची गंगा वाहणाऱ्या शाळेतच चोरीची घटना घडल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. दरम्यान कोरोनामुळे सध्या शाळा बंदच असून याच दरम्यान शाळेत झालेल्या चोरीच्या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील जिल्हा परिषद शाळेत अज्ञात चोरट्यांनी तिसऱ्यांदा चोरी करण्याचा … Read more

चोरटयांनी लांबवीले चक्क एक टन सीताफळ

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असलेल्या बळीराजावर संकटांचा ओघ कायमच आहे. कोरोना काहीसा कमी झाला तर परतीच्या पावसाने झोडपले, ते संकट जाते नाही तोच फळबागांची चोरीच्या घटनांमुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आजवर शेतातील कांदे, डाळिंब, कलिंगडांची चोरी झाल्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. आता चोरट्यानी सीताफळांवरही डल्ला मारला. … Read more

ट्रक-बोलेरो अपघातात दोन कामगारांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदे | घारगाव येथील निलगिरी हॉटेलजवळ शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ट्रक व बोलेरो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात माथाडी कामगार मंडळाच्या २ कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. माथाडी कामगार मंडळाची बोलेरो (एमएच १७ एएन ००५२) राशीनहून श्रीगोंदेमार्गे नगर येथे जात होती. नगरहून दौंडला जाणाऱ्या एमएच १२ जेएस … Read more