बनावट सोने बँकेत ठेवत केला कोटींचा घोटाळा; या तालुक्यातील प्रकार

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-  सध्याच्या परिस्थितीत सोन्याचे दर गगनाला भिडले आहे. मात्र नड राहिली कि सोने गहाण ठेवून पैसा उपलब्ध करता येतो. यासाठी नागरिक देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच सोनेतारण करून बँकेकडून कर्ज घेता येते. मात्र राहूरी तालुक्यातील एका सहकारी बँकेच्या शाखेत बनावट सोने तारण ठेऊन कोट्यावधी रुपयांचे बोगस कर्ज उकळल्याचा धक्कादायक प्रकार … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयास 15 लाखाची मदत जाहीर

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-  पाथर्डी तालुक्यात बिबट्याने नागरी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या घटनेची राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी तत्काळ दखल घेतली आहे. व बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयास तात्काळ १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच बिबट्याला पकडण्याचे आदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी यावल येथील पथक, जळगाव येथील पथक, … Read more

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी लावलेल्या पिंजऱ्यातून भलत्याच गोष्टी झाल्या गायब

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरदिवशी बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच काल जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील एका चिमुरड्याला बिबट्याने आईच्या कुशीतून उचलून नेले. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरे लावले होते. मात्र एक भलतीच गोष्ट घडल्याचे उघडकीस आले आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ८४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८२ ने वाढ … Read more

अमेरिकेतील ‘तो’ पाऊस पाहून आमदार रोहित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-   जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड … Read more

ती ऑडिओ क्लिप पूर्णपणे बनावट – राठोड यांचे स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्याला लाभलेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांची तडकाफडकी जिल्ह्यातून बदली करण्यात आली आहे. त्यांची वादग्रस्त क्लिपची मोठी चर्चा झाली असून हि क्लिप सोशलवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. यामुळेच त्यांची बदली करण्यात आली असल्याच्या चर्चा सध्या पाथर्डी तालुक्यात सुरु आहे. दरम्यान या क्लिप … Read more

रुग्णालयाच्या नावाखाली ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा महाघोटाळा

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पाच हजार बेडच्या हॅास्पिटलच्या नावाने 12 हजार कोटी रुपयांचा उद्धव ठाकरे सरकारने घोटाळा केला आहे. याचे सर्व पुरावे घेऊन आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत. असे देखील किरीट सोमय्या यांनी सांगितले. तसेच किरीट … Read more

बिबट्याने उचलून नेलेल्या त्या चिमुरड्याचा मृतदेह आज सापडला

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका वस्तीवरील सार्थक बुधवंत या ३ वर्षाच्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. आज (शुक्रवार) सकाळी त्याचा मृतदेह घरापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर शेतात बंधाऱ्याच्या बाजूला विहिरीजवळ आढळून आला आहे. यावेळी हा मृतदेह अर्धवट खालेल्या अवस्थेत सापडला. गेल्या पंधरा दिवसात या नरभक्षक … Read more

अत्यंत दुर्दैवी! मुलाची वाट पाहणाऱ्या वडीलांनी सोडले प्राण; कुटुंब झाले निराधार

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी इसाक तांबोळी नावाचा तरुण कुकडी नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली होती. अनेक दिवस झाले तरी मुलाचा काही शोध लागत नसल्याने हताश झालेल्या इसाक च्या वडिलांनी देखील देह त्यागला. एकीकडे वडिलांनी प्राण सोडले आणि दुसऱ्या दिवशीच ईसाकचा मृतदेह आढळून आला. तांबोळी कुटूंबावर ओढावलेल्या या करूण प्रसंगामुळे सर्वत्र हळहळ … Read more

केवळ 10999 रुपयात मिळवा टीव्हीएसची नवीन स्कूटर; सोबत ‘ह्या’ ऑफर्सही

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- या दिवाळीत तुम्हीही जर बाईक वा स्कूटर खरेदी करण्याचे ठरवले असेल तर नक्कीच ही बातमी वाचा. दिवाळीपूर्वी वाहन विक्री वाढविण्यासाठी सर्व वाहन कंपन्या त्यांच्या वाहनांवर भारी सूट देत आहेत. आता टीव्हीएस मोटर कंपनी देखील यात सामील झाली आहे.या उत्सवात ऑनलाइन बाइक खरेदी करून आकर्षक सवलत आणि इतर ऑफर देखील … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे वन विभागाला आदेश

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्यात बिबट्याने नागरी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या घटनेची राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी तत्काळ दखल घेतली असून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयास तात्काळ १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच बिबट्याला पकडण्याचे आदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी यावल येथील पथक, जळगाव येथील पथक, नाशिक … Read more

‘ह्या’ बँकेस आरबीआयने ठोठावला 22 लाखांचा दंड

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील डीसीबी बँकेला 22 लाखांचा दंड ठोठावला आहे. आर्थिक उत्पादनांसाठी असणारे मार्केटिंग नियम मोडल्याचा आरोप बँकेवर आहे. बॅंकेने दाखल केलेल्या बीएसई फाइलिंगमध्ये सांगितले की, आरबीआयने 28 ऑक्टोबरला हा दंड बँकेवर लावला. रेग्युलेशन कायद्यांतर्गत दंड आकारला :- आरबीआयने सांगितले की त्याने बँकिंग रेग्युलेशन एक्ट 1949 अन्वये डीसीबी … Read more

“नागवडे’ व “कुकडी’ सहकारी साखर कारखाने उसाला उच्चांकी भाव देतील

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-तालुक्‍यातील खासगी कारखान्याने पहिला हप्ता जाहीर केला आहे. नागवडे, कुकडी सहकारी साखर कारखाने यापेक्षा जास्तीचा भाव देतील. अशी ग्वाही नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली. श्रीगोंदा तालुक्‍यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने यावर्षी उसाचे उच्चांकी गाळप होणार आहे. काळजी करू नका; सर्व गाळप … Read more

त्या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा : आ. मोनिकाताई राजळे

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्याच्या परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला आहे. मढी शिरापूर परिसरात या बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण व संतापाची भावना देखील आहे, असे नमूद करीत ‘साहेब, नरभक्षक झालेल्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा’ अशी आर्त हाक आमदार मोनिकाताई राजळे यांनी प्रशासनाला घातली आहे. … Read more

शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार – महसूलमंत्री

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- केंद्रातील भाजप सरकारने आणलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून 31 ऑक्‍टोबरला राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात येणार आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा हुतात्मा दिन तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत या दिवशी राज्यभरात किसान … Read more

तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- अन्याय झाला कि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी खाकी वर्दी आपल्या अंगी चढवली त्यांच्याकडूनच अत्याचार झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबार येथील तरुणीस लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेवासा येथील उपनिरीक्षकासह तीन जणांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटलांचे सरकारवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यातच न्यायालयाने स्थगिती लावल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर चांगलीच टीका केली आहे. ‘राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी भांडणार्‍या संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतयं, हे दुर्देव आहे,’ … Read more

विहिरीतील ‘ती’ पिल्ले बिबट्याची नव्हे; गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सध्या बिबट्याने धहसाहत माजवली आहे. अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच जामखेड तालुक्यात बिबट्याविषयी एक अफवा पसरली यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरलं होत. याबाबत माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील हळगाव येथील एका विहिरीत बिबट्याचे दोन पिल्ले असल्याची खबर गुरूवारी सायंकाळी सोशल … Read more