मोठी बातमी : सत्यजित तांबे होणार आमदार ?

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड लवकरच होणार आहे. खरंतर या जागांवर जूनमध्येच निवड होणं अपेक्षित होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपाल नियुक्त जागांसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. 12 जागांपैकी काँग्रेसच्या गोटात चार जागा तर राष्ट्रवादीकडूनही 4 नावे चर्चेत … Read more

‘त्या’ तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- पुणे जिल्ह्यातील म्हसे बुद्रूक येथून पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथे शेळ्या, मेंढया चारण्यासाठी येणाऱ्या तरूणास जातीवाचक शिविगाळ करून, मानसिक त्रास देत आमच्या गावात मेंढ्या चारायला यायचे नाही, अशा वारंवार देण्यात येणाऱ्या धमक्यांना कंटाळून परसराम लालचंद्र काळे या २५ वर्षीय तरूणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी म्हसे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा ११.६६ लाखांचा गुटखा जप्त

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- एकलहरे परिसरातील आठवाडी शिवारात गेल्या मंगळवारी गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अर्धा कोटींचा गुटखा पोलिसांनी जप्त केला होता. त्याच भागातील बंद खोलीत गुटखा असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली. पोलिस पथकाने तपासणी केली असता तेथे ११ लाख ६६ हजारांचा गुटखा व सुगंधी तंबाखू मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी करीम … Read more

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये आणावेत, या कारणावरून सासरी होणाऱ्या जाचास कंटाळून पूनम अमोल कासार (२३) हिने शनिवारी सकाळी निमगाव खुर्द येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सासरच्या तिघांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पूनमचा विवाह अमोलशी २०१९ मध्ये झाला होता. अनेक कारणावरून तिचा … Read more

धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी जय मल्हार सेनेचे अर्ध जलसमाधी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-भारतीय राज्य घटनेतील तरतुदी नुसार महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्या वतीने गुरुवार दि. २२ ऑक्टोबर पासून राज्यव्यापी अर्ध जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस जय मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख प्रदिपराज भोंडे, राज्य समिती … Read more

मंदिर बंद, उघडले बार.. महिलांवर वाढले अत्याचार , उद्धवा अजब तुमचे सरकार..

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- महिलांवरील वाढते अत्याचार, त्यांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, व केंद्राने परवानगी देऊनही आघाडी सरकारने बंद ठेवलेली धार्मिक स्थळे याच्या निषेधार्थ श्रीगोंदा भाजपा च्या वतीने आ.श्री.बबनरावजी पाचपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शनी मंदिर, शनिचौक, श्रीगोंदा, येथे भजन करून लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये डॉ.सौ.प्रतिभाताई बबनराव पाचपुते, श्रीगोंदा भाजपा चे … Read more

पद्मभूषण डॉ.बाळसाहेब विखे पाटील यांच्याबाबत मुख्यमंत्री उध्‍दव ठाकरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्‍दबध्‍द केलेल्‍या देह वेचावा कारणी या आत्‍मचरित्राचे प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचा नामविस्‍तार समारंभ व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून संपन्‍न झाला. मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे हे देखील या व्‍हर्च्‍युअल रॅलीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी आपल्‍या भाषणात विखे पाटील कुटुं‍बांशी असलेल्‍या ऋणानुबंधाचा भावनीकतेने … Read more

माजी खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- माजी खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारणाला समाजबदलाचे माध्यम मानून काम केले. त्यांनी ग्रामविकास, सहकार, सिंचन आणि शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम केले आहे. सहकार चळवळीला त्यांनी वेगळा आयाम दिला, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली तर स्वत:तील साधेपणा जपत परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य आणि ती … Read more

शिवाजीराव कर्डिले हे जनतेच्या मनातील आमदार : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील जनता आजही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आमदार नसताना यांच्याकडे विविध प्रश्‍न घेऊन येतात व ते सोडविण्याचे काम कर्डिले करतात. गेली २५ वर्षे त्यांनी विकास कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये घरात न बसता नागरिकांना आधार व धीर देण्याचे काम केले आहे. आर्थिक … Read more

स्नेहालय मुळे इसळक आणि निंबळक गावांची पंचक्रोशी सेवातिर्थ बनली– आ. निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांच्या एड्स बाधित , लैंगिक शोषित महिला आणि मुले , दिव्यांगांच्या बहुविध पुनर्वसन प्रकल्पांमुळे इसळक आणि निंबळक या गावांची पंचक्रोशी सेवातीर्थ बनल्याचे प्रतिपादन आ. निलेश लंके यांनी आज केले. आपल्या स्थानिक विकास निधीचे उद्घाटन आमदार लंके यांनी स्नेहालयच्या इसळक येथील हिंमतग्राम प्रकल्पात १० लक्ष रुपयांचे सभामंडप … Read more

शेतकरी कायद्याविरोधात 15 ऑक्टोबरला काँग्रेसची भव्य शेतकरी बचाव रॅली

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने घाईघाईने 3 शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले आहेत त्याचा आम्ही काळे कायदे म्हणून उल्लेख करतो. या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रातही आंदोलन सुरु केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता 15 ऑक्टोबरला दुपारी 4.00 वा. महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे 10 हजार गावात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या आदिवासी तरुणाची आत्महत्या की खून ?

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी या भागातील आदिवासी समाजामध्ये खून, बलात्कार, जाळपोळ, आत्महत्या असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडत आहेत. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी व समाज कल्याण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या आदिवासी भटके … Read more

महत्वाची बातमी : प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील नागरिकांना कळविण्यात येते की, दिनांक 13 ऑक्‍टोबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 404 क्युसेक, जायकवाडी धरणातुन 9432 क्‍युसेक, मुळा धरणातुन 600 क्‍युसेक, सीना धरणातुन सीना नदीस 364 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. भीमा नदी दौंड पुल येथे 3,882 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मासे पकडण्यासाठी गेलेले दोघे गेले वाहुन

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथील सीना नदीतील बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा चुलत्या पुतण्याचा नदीच्या वाहत्या पाण्यात तोल जाऊन वाहुन गेले. पाण्याचा प्रवाह जादा आसल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. जामखेड तालुक्यात सध्या मागिल अठवड्यापासुन जोरदार पाऊस पडत आसल्याने तालुक्यातील सर्व तलाव, नदी, नाले व बंधारे ओसांडून वहात आहेत. चौडीं येथील … Read more

अवैध धंद्यांचा व गुन्हेगारी प्रवृत्तीचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुका, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे. दारू, मटका, जुगार, अमली पदार्थ, गांजा विक्री सर्रासपणे चालू आहे. टाळेबंदीच्या काळात देखील पोलीसांच्या वरदहस्ताने सर्व व्यवसाय चालू होते. टाळेबंदीत युवकांच्या हाताला काम नसल्याने अनेक युवक नशेच्या आहारी गेले. घरातील सामान व महिलांचे दागिने विकून अनेक … Read more

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची मंगळवारी आढावा बैठक

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकर्ता व पदाधिकारी यांची मंगळवार 13 ऑक्टोबर 2020 रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी भवन, अहमदनगर येथे हि बैठक पार पडणार आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! पोलीस निरीक्षक विकास वाघ अखेर निलंबित

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये असलेले विकास वाघ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेले पोलीस निरीक्षक विकास वाघ याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. एका महिलेने विकास वाघ याने वारंवार धमकी देत अत्याचार केल्याची फिर्याद … Read more

आर्थिक मदतीविना कोरोना योद्धांचे कुटुंबीय आले अडचणीत

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जगभर सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांसाठी झटणाऱ्या व परिणामी प्राणाला मुकणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे कुटुंब आर्थिक मदतीविना अडचणीत सापडले आहे. कोरोना संकटात महापालिका कर्मचाऱ्यांनी अहोरात्र नागरिकांना सहकार्य केले. यात महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांच्या वारसांना सुरक्षा कवच … Read more