पद्मभूषण डॉ.बाळसाहेब विखे पाटील यांच्याबाबत मुख्यमंत्री उध्‍दव ठाकरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्‍दबध्‍द केलेल्‍या देह वेचावा कारणी या आत्‍मचरित्राचे प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचा नामविस्‍तार समारंभ व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून संपन्‍न झाला. मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे हे देखील या व्‍हर्च्‍युअल रॅलीत सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी आपल्‍या भाषणात विखे पाटील कुटुं‍बांशी असलेल्‍या ऋणानुबंधाचा भावनीकतेने उल्‍लेख करत शिवसेना प्रमुखांनी कोंडलेला हिरा कोदणात बसविला अशा शब्‍दात डॉ.विखे पाटील यांच्‍या कार्याचा गौरव केला. मुर्ती छोटी असली तरी त्‍यांची किर्ती मोठी होती. विखे पाटील घराणे जिद्दीने परंतू परिस्थितीवर मात करत पुढे आले आहे.

पक्षीय मतभेद विसरुन मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. जे करणे शक्‍य झाले नाही ते करण्‍यासाठी भविष्‍यात काम करण्‍याचे सुचित करुन मोदीजींचा आशिर्वाद आहेच असा आवर्जुन उल्‍लेख त्‍यांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.विखे पाटील यांच्‍या आत्‍मचरित्रातील गोष्‍टींचा उल्‍लेख करत दुष्‍काळमुक्त महाराष्‍ट्रासाठी त्‍यांचे प्रयत्‍न मोलाचे होते.

त्‍याचे काम आता सुरु झाले असले तरी, आमच्‍या सरकारमध्‍ये या विषयीचे झालेले निर्णय विद्यमान सरकारने पुढे नेण्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. आ.चंद्रकांत पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. जेष्‍ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांनी संपादीत केलेल्‍या मुलखा वेगळा माणुस या ग्रंथाचे यावेळी उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व स्‍वागत माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले तर आभार डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment