राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची मंगळवारी आढावा बैठक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकर्ता व पदाधिकारी यांची मंगळवार 13 ऑक्टोबर 2020 रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी भवन, अहमदनगर येथे हि बैठक पार पडणार आहे.

याबाबतची माहिती युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार व युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. कार्यकर्ता व पदाधिकारी आढावा बैठकीसाठी जिल्ह्यातील युवक प्रदेश पदाधिकारी,

युवक तालुकाध्यक्ष, युवक शहराध्यक्ष, युवक जिल्हा कार्यकारिणी यांचेसह युवक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये युवक तालुकाध्यक्ष, युवक शहराध्यक्ष, युवक पदाधिकारी यांचेकडून आढावा घेण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment