अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बारस्कर यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व नागापूर येथील रहिवाशी पोपटराव जगन्नाथ बारस्कर यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. आ. अरुणकाका जगताप आणि आ. संग्राम जगताप यांचे समर्थक राहिलेले पोपटराव बारस्कर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ८ वर्षीय चिमुरडीवर २८ वर्षीय नराधमाकडून अत्याचार पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या ८ वर्षीय चिमुरडीवर घराजवळ राहत असलेल्या एका २८ वर्षीय नरधमाने अत्याचार केला. ही संतापजनक घटना नगर तालुक्यातील एका गावात गुरूवार दि.२४ सप्टेबर रोजी घडली आहे. संबंधित नराधम रशिद बेग यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केले आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील त्या गावात पीडित मुलगी … Read more

दुखःद बातमी : कैकाडी महाराजांचं कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- पंढरपुरातील प्रसिद्ध कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त हभप रामदास महाराज जाधव यांचं कोरोनामुळे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे , त्यांच्यावर अकलूजमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली … Read more

सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2020 या काळात संपूर्ण जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यात येईल अशी माहिती समन्वयक किरण काळे व कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे . युवक काँग्रेसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more

सर्व केसरी शिधापत्रक धारकांना स्वस्त धान्य मिळावे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भावामुळे व्यवसायात मंदी आहे, बाजारपेठेत ग्राहक नाही आणि सामान्यांच्या रोजगारात घट झाली अशा कठिण परिस्थितीत शासनाने 8-10 रुपये प्रतिकिलोचे धान्य बंद केले आहे ते पुन्हा रेशनवर मिळावे आणि सरसकट केसरी शिधापत्रक धारकांना हे स्वस्त धान्य उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी नगर शहर काँग्रेसच्यावतीने शासनाला करण्यात आली. शहराध्यक्ष बाळासाहेब … Read more

‘हार्मोन्सची हार्मोनी’ या विषयावर रविवारी ऑनलाईन मोफत व्याख्यान

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांचा मानसिक ताण-तणाव वाढत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाचे मानसिक धैर्य वाढविण्यासाठी येथील योग विद्या धाम या संस्थेने रविवार दि.27 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ऑन लाईन ‘हार्मोन्सची हार्मोनी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे, अशी … Read more

तो शब्द ऐकताच माजी मंत्री तावडे घाबरले

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे अहमदनगरला आले होते. आयोजित कार्यक्रम प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरु असताना एक वाक्य ऐकून चक्क मंत्री विनोद तावडे हे चांगलेच घाबरले होते. याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रा. राम शिंदे … Read more

शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार नुकसान भरपाई द्यावी

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  नगर दक्षिण मध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 30 हजार नुकसान भरपाई मिळावी तसेच दक्षिण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था याबाबत भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, जिल्हध्यक्ष अरुण मुंडे, संघटन सचिव प्रसाद ढोकरीकर, सरचिटणीस दिलीप भालसिंग, उपाध्यक्ष शाम पिंपळे, … Read more

आता स्वस्थ बसून चालणार नाही; मराठा समाज आक्रमक

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  मराठा आरक्षणांबाबत न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आता सकल मराठा समाज बांधवांमध्ये एक संतापाची लाट उसळली आहे. आरक्षणाचा निर्णय लवकर व्हावे यासाठी समाज बांधव एकटावू लागले आहे.याच पार्श्वभूमीवर आज कर्जत तहसील कार्यालयाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे वतीने ठिय्या आंदोलन केले. मराठा समाजाला आपल्या भावी पिढीला काहीतरी द्यायला हवे आणि ते देणार नसलो … Read more

माजी पालकमंत्र्यांची सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकट काळातही राजकीय कुरघूड्या सुरूच आहे. ‘राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेचे घेणेदेणे नाही. राज्य सरकारने कुठलीही जनतेला मदत केली नाही, असे चित्र महाराष्ट्रात पाहण्यास मिळत आहे. अशी कडवी टीका जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केली. दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगरमध्ये शहर भाजपच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी उचलले हे पाऊल….

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अनेक प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने शिक्षणाची धारा घराघरापर्यंत पोहचविणाऱ्या शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या शिक्षकांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. महाविद्यालय व विद्यापीठीय कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत उच्च व तंत्र शिक्षण व वित्त विभागाच्या उदासीनतेच्या भूमिकेचा निषेध म्हणून … Read more

ढोल वाजवत ते बसले आंदोलनला

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्याने पेट घेतला आहे. मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. धनगर समाज अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) आरक्षणाच्या अंमल बजावणीसाठी संघर्ष करत आहे. याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी सरकारला जागे करण्यासाठी आज दुपारी पाथर्डीच्या तहसील कार्यालयासमोर ढोल वाजवत धरणे … Read more

कृषी विधेयकांबाबत महसूल मंत्र्यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कृषी विधेयकांच्या मुद्यावरून केंद्र सरकार विरोधात विरोधक एकटावले आहेत. कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. याचवेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या वादग्रस्त कृषी विधेयकांची अंमलबजावणीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याविषयी घोषणा केली. कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य … Read more

बँक अकाऊंटमधून पैसे चोरीला गेल्यास करा ‘हे’ , मिळतील सारे पैसे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कोरोना महामारी काळात फसवणुकीच्या अनेक घटनात घडत आहेत. आरबीआय लोकांना यापासून वाचण्यासाठी वारंवार सूचना देत आहे. जर तुमच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास तुम्ही काय करायला हवे, याबाबतची माहिती आरबीआयने दिली आहे. आरबीआयनुसार, जर बँक खात्यातून पैसे काढले गेले असतील अथवा फसवणूक झाल्यास तीन दिवसांच्या आत याबाबत बँकेला सुचना द्यावी. … Read more

योग्य उपचाराअभावी ‘त्या’ महिलेचा झाला मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- आरोग्य विभागाने केवळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावरच लक्ष केंद्रीत केल्याने कोरोनाव्यतीरिक्त आजाराने ग्रासलेल्या रूग्णांची हेळसांड होत आहे. अशाच हेळसांडीमुळे, शासकिय अनास्थेमुळे तालुक्यातील जवळे येथील महिलेला आपला जीव गमवावा लागला. दि. १२ सप्टेबर रोजी जवळे येथील सुनंदा दरेकर या महिलेस श्‍वसनाचा त्रास होउ लागल्याने स्थानिक डॉक्टरांनी त्यांना पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात … Read more

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे सर्वसामान्यांचे नेते : माज मंत्री विनोद तावडे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- भाजप सरकारच्या काळामध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी-पाथर्डी-नगर मतदारसंघामध्ये विविध विकास कामे मंजूर करुन आणली. प्रत्येक गावामध्ये शासनाचा निधी घेऊन जाण्याचे काम करत आले. कुठलाही राजकीय वारसा नसताना गेली २५ वर्षे नगर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या बळावर त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात … Read more

कोरोनाला हरवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  ही मोहीम सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आहे. कोणताही नागरिक केवळ दुर्लक्षामुळे उपचारापासून वंचित राहणार नाही याची काळजी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घ्यावी. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेस स्नेहबंध … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार : प्रतीक बारसे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्रातील बहुजनची शक्ती म्हणून उदयास आलेल्या बहुजन वंचित आघाडीच्या नावाने या आघाडीला बदनाम करण्याच्या हेतूने अनेक हितशत्रूनि बहुजन आघाडीच्या नावाने व्हॉटस अँप ,ट्विटर ,फेसबुक ,इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया वरती वंचित बहुजन आघाडीच्या नावाने ग्रुप तयार केले आहेत अकाउंट उघडले आहेत आणि त्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारा विरुद्ध पोस्ट … Read more