राज्यात सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे, आ. काळेंचे विठूरायाला साकडे !

ashutosh kale

कोपरगाव मतदार संघासह राज्यात सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होवू दे, असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी विठूरायाला घातले आहे. आषाढी एकादशीनिमित्त काल बुधवारी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव बेट भागातील श्री काशी विश्वेश्वर, श्री शुक्लेश्वर व परमपूज्य राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज तसेच कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आषाढी … Read more

जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे कालव्याच्या कामासाठी जलशक्ती मंत्रालयाचा निधी मिळावा – ना. विखे

vikhe

जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या राहिलेल्या कामांसाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील यांच्याकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना ना. विखे पाटील यांनी निळवंडे प्रकल्पाच्या संदर्भात सविस्तर पत्र दिले. जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या सद्यस्थितीची … Read more

राज्याला पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचा तडाखा !

vadali paus

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २४ तासांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पुढील ४८ तासांत घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातही हवामानशास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. … Read more

न्यायदेवता शनी ग्रहामुळे ‘या’ 3 राशीच्या लोकांचे नशीब चमकणार, माता लक्ष्मीच्या विशेष कृपेने अचानक धनलाभ होणार !

rashibhavishya

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. जेव्हा ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते तेव्हा राशीचक्रातील विविध राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पाहायला मिळतो. राहू आणि शनी ग्रहाचे देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. असे म्हणतात की, राहू आणि शनी ग्रह आपल्या कर्मानुसार फळ देतात. दरम्यान, … Read more

जोरदार पावसाचा दुष्काळ कधी संपणार ? पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग ? वाचा सविस्तर

pavus

जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. मात्र अजूनही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. जूनमध्ये राज्यातील कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला मात्र उर्वरित ठिकाणी पावसाची तीव्रता खूपच कमी होती. दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर मोसमी पावसाची सक्रियता फारच कमी झाली. … Read more

सुजय विखे आणि त्यांचे कुटुंब कोणाशीच प्रामाणिक नाही, फेरमतमोजणीच्या मागणीवर खा. लंके यांचा डॉ. विखेंवर हल्लाबोल !

lanke vikhe

नगर : प्रतिनिधी ईव्हीएम मशिनबाबत वास्तविक आमच्यासारख्याने तक्रार करायला हवी होती. तुम्ही भाजपाचे, देशात तुमचे सरकार आणि तुम्हीच यंत्रणेवर अविश्‍वास दाखवत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाहीत असे सांगत खा. नीलेश लंके यांनी भाजपाचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या फेरमतमोजणीच्या मागणीवर माध्यमांजवळ प्रतिक्रीया देताना विखे यांचे नाव न … Read more

अहमदनगरमधील ‘ताबेमारी’ ! आता थेट ‘या’ मंदिर देवस्थानचीच जमिनी बळकावली

tabemari

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ताबेमारी हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आलेला दिसतो. या ताबेमारीमुळे सर्वमान्य लोक जेरीस आले आहेत. बऱ्याचदा या ताबेमारी करणाऱ्या लोकांना कुणाचे अभय आहे का? असाही आरोप केला जातो. आता एक देवस्थानच्या जमिनीवर ताबेमारी केल्याची घटना समोर आली आहे. सद‌गुरु देवेंद्रनाथ महाराजांचे पादुका मंदिर असलेल्या बहिरवाडी (ता. नेवासा) येथील देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवर … Read more

घरकुलासाठी पैसे मिळालेत? ‘या’ लोकांना पैसे माघारी द्यावे लागणार, तुम्हीही यात नाहीत ना? पहा..

gharkul

Ahmednagar News : केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या सुखसोयीसाठी विविध योजना राबवत असते. यातील एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे गरिबांना घरे. २०१५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण ही मोदी सरकारने सुरु केली. या योजनेच्या अंतर्गत संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात ५ हजार ३८४ इतकी घरकुले बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना तितक्याच घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ५,१७३ लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू … Read more

जिल्हा प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी दिंडी मार्गावर सुविधा, पालकमंत्री विखे पाटलांचा पुढाकार

vikhe

Ahmednagar News : आषाढी वारीच्या निमिताने जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशसानाने दिंडी मार्गावर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यातून विविध धार्मिक प्रतिष्ठान तसेच गावांमधून दोनशेहून अधिक दिंड्या आषाढी करीता पंढरपूरला जातात.गेली अनेक वर्षाची ही परंपरा सुरू आहे.मात्र मागील वर्षी सोलापूर आणि नगर जिल्ह्याच्या … Read more

जगदंबा विद्यालयात टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी

dindi

Ahmednagar News :  आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व भाविक पंढरपूरच्या दिशेने वारी करत आहेत. यातच जगदंबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस आपल्या विद्यालय परिसरामध्ये पांडुरंगाची दिंडी काढली. या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक वेगवेगळ्या वेशभूषेत साधुसंतांच्या अभंगात आणि टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक गुणांची जोपासना व्हावी म्हणून या दिंडीचे आयोजन केले … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश भागात बरसला, पण पाणलोटात रुसला ! धरणांत पाणीसाठा नाहीच..

pavus

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. राहुरी, कर्जत , जामखेड, नगर तालुक्यासह अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊसही झाला. दरम्यान असे असले तरी पाणलोट क्षेत्रात अद्यापही म्हणावा तितका पाऊस पडलेला नाही. त्यामुळे म्हणावी तितकी आवक धरणात होत नाहीये. धरण साठ्यात मान्सून हंगामात … Read more

नगरकरांचा नादच खुळा ! ५ जणांनी अवघ्या ३४ तासांत पार केले ६०३ किमी अंतर.. नगर-पंढरपूर-अक्कलकोट- तुळजापूर- नगर..

cycle

Ahmednagar News : समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ज्या इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात. अहमदनगरमध्ये अशा तरुणांची कमतरता नाही. अनेक क्षेत्रात तशी वेगळी कामगिरीही नगरकरांनी करून दाखवली आहे. दरम्यान आता आणखी एक किमया नगरकरांनी केली आहे. पाच ध्येयवेड्या युवकांनी नगर-पंढरपूर-अक्कलकोट- तुळजापूर- नगर असा सुमारे ६०३ किलोमीटरचा प्रवास ३३ तास २७ मिनिटांत पूर्ण … Read more

वर्षानुवर्षे रखडलेल्या अहमदनगरमधील ‘त्या’ २४ प्रमुख रस्त्यांना मंजुरी, वर्षभरात होणार पूर्ण

road

Ahmednagar News : नगर शहरातील रस्त्यांची दुर्दशा हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. दरम्यान आता मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामांचा मार्ग मोकळा झाला असून नगर शहर व उपनगर परिसरातील २४ रस्त्यांचे कामी लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाने मंजूर केलेले परंतु व आचारसंहितेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून हे रस्तेकाम रखडलेले होते. दरम्यान आता या २४ रस्त्यांच्या … Read more

अहमदनगरमध्ये कार व दुचाकीचा भीषण अपघात ! कार जळून खाक, तर दोघे…

apghat

Ahmednagar News : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मोपेडवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. १५ जुलै) संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरात घडली. अपघातानंतर ही कार पेटलेल्या अवस्थेत शहर पोलिसांना आढळली. अक्षय लक्ष्मण पवार (रा. रायतेवाडी) व धीरज गुंजाळ (रा. खांडगाव) असे जखमी तरुणांची नावे आहेत. अपघातानंतर कार चालक संकेत … Read more

बापरे ! मुद्दल तीन लाख, सावकाराने मागितले १५ लाख, जाचाला कंटाळून पती घरातून निघून गेला, नंतर महिलेने..

savakar

Ahmednagar News : सावकारकी हा आपल्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत सावकार अव्वाच्यासव्वा व्याज आकारतात. आता तिन लाख मुद्दलीच्या बदल्यात १५ लाख रुपये मागितल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधून पुढे आली आहे. सावकाराने एकास तीन लाख रुपये व्याजाने दिले होते. कर्जदाराने एक वर्षे व्याज परतही केले. परंतु, पुढे व्याज देणे शक्य झाले नाही. सावकाराने व्याजासह … Read more

सुपा परिसरात सर्वत्र वरुणराजा मेहेरबान, बळीराजा आनंदी, तलावांच्या जलसाठ्यात देखील वाढ !

moog sheti

पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात रविवारी दुपारनंतर व सोमवारी रात्री पावसाने हजेरी लावल्याने सर्व परीसर जलमय झाला. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने खरीप पिकांची वाढ चांगली झाली असून, पिकांचे उत्पादनात चांगली वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दमदार पावासामुळे पाणी नालीमध्ये बसत नसल्याने ते रस्त्यावरून वाहिल्याने रस्ते धुवून … Read more

साईबाबा मंदिर सुरक्षेबद्दल सात सदस्यांची समिती गठीत करून, ३० नोव्हेंबरपर्यंत गोपनिय अहवाल द्या – उच्च न्यायालय

saibaba

शिर्डी येथील साईबाबा मंदिर सुरक्षेबद्दल सीआरपीएफ, सीआयएसएफ लागू करण्यासंदर्भात शिफारस, सूचना करण्यासाठी ७ सदस्यांची समिती गठीत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनास दिले आहे. सदर समितीने उच्च न्यायालयात ३० नोव्हेंबर पर्यंत आपला गोपनिय अहवाल सादर करण्याचा आदेश दिले आहे. सदर समितीचे अध्यक्ष राज्याचे निवृत्त मुख्य सचिव रहातील, अशी माहिती याचिकाकर्ते, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी … Read more

नगर जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकर प्रकरणी रुग्णालयच नव्हे तर आता ‘या’ चार विभागाचा मागितला अहवाल, तेथेही गफला? पहा..

POOJA KHEDKAR

Ahmednagar News : बहुचर्चित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भातील विविध प्रमाणपत्रांची नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपविभागीय महसूल अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून अहवाल मागवले आहेत. याबाबतची माहिती मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण विभागाच्या (डीओपीटी) सूचनेनुसार ही चौकशी केली जात … Read more