लॉकडाऊन मध्ये माजीमंत्री राम शिंदे करत आहेत ही कामे

जामखेड – माजी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे लॉकडाऊनमुळे सध्या आपल्या मूळ गावी चौंडी येथील घरी आहेत. तसेच दूरध्वनीवरून गरजूंना रेशनचे धान्य मिळण्यासाठी, तसेच उद्‌भवलेल्या परिस्थितीतील समस्या सोडवण्यासाठी अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्याही संपर्कात आहेत. तसेच आपला वाचन, बागकामाचा छंदही जोपासत आहेत. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे चौंडी येथील निवासस्थानी वडील शंकरराव, आई भामाबाई, पत्नी आशाबाई, मुली अक्षता … Read more

जामखेडला हॉटस्पॉट घोषित केल्याने आ.रोहित पवार यांनी केले हे काम

जामखेड : विविध प्रश्नांसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आढावा घेतला. मतदारसंघात असलेल्या अनेक प्रश्नांवर आ.पवार यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सुचनाही केल्या. यावेळी आ.पवार यांनी कर्जत येथील काही स्वस्त धान्य दुकानांना भेटी दिल्या. कोणत्याही व्यक्तीवर धान्य वाटपात अन्याय होणार नाही, शासनाच्या निकषानुसारच धान्याचे वाटपाच्या सुचना केल्या. ज्यांच्याकडे … Read more

मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

कोपरगाव : शहरातील सुभाषनगर येथे मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला असून दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून याप्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. मुजाहिद मज्जीद कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. २२) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर सुभाषनगर येथील आरोपी योगेश संजय शिंदे, संजय रामभाऊ … Read more

मॉर्निंग वॉकला गेले आणि दंड भरून आले ….

शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सध्या लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. तरीही भल्या सकाळी मॉर्निंगवॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शंभराहुन अधिक नागरिकांवर शिर्डी पोलीस व नगरपंचायत यांनी संयुक्त कारवाई केली. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत सर्वांना दीड तास कवायत करायला लावली. दंड आकारल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. शिर्डीत मॉर्निंगवॉकसाठी मोठ्या संख्येने नागरीक घराबाहेर पडत असतात. त्यामुळे शिर्डी पोलीस … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : केंद्रीय राखीव दलाच्या जवानास मारहाण

पाथर्डी : माळीबाभुळगाव शिवारातील शिक्षक कॉलनी येथे केंद्रीय राखीव दलातील जवान मच्छद्रिं चंद्रकांत बडे यांना चौघांनी मारहान करुन गंभीर जखमी केले आहे. बुधवारी कॉलनीत झालेल्या या मारामारीमुळे जिल्हा पोलिस दल चांगलेच कामाला लागले आहे. पाथर्डीत गोळीबार झाल्याची चर्चा सोशल मिडीयातून सुरु झाली आणि जो-तो कोरोना विसरुन केवळ गोळीबाराची चौकशी करीत होता. पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, … Read more

…म्हणून ‘या’ तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही !

कर्जत : तालुक्यात अद्याप कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. परंतु खबरदारी म्हणून आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय व नगर पंचायत यांनी पोलिसांच्या मदतीने तयारी केली आहे. तालुका आरोग्य विभागात ५ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३५ आरोग्य उपकेंद्रांतर्गत एकूण ३८१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात १२ वैद्यकीय अधिकारी, १५४ आरोग्य कर्मचारी व २१५ आशा सेविका … Read more

नामदार प्राजक्त तनपुरे यांची माजी आमदार कर्डिले यांच्यावर नाव न घेता टीका म्हणाले ….

राहुरी :- वांबोरी चारी योजनेअंतर्गत येर्णा­या राहुरी नगर पाथर्डी नेवासा तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ पाझर तलावात इतिहासात पहिल्यांदाच हक्काचे ६८० एमसिप्टी पाणी यावर्षी आम्ही दिले असून, यापूर्वी कधीही एप्रिल महिन्यात वांबोरीचारीला पाणी सोडण्याचे काम झाले नाही. मात्र एप्रिल महिन्यातही बोनस म्हणून काही दिवस वांबोरी चारीला पाणी सोडून राहुरीकर पाणी आडवणारे नसून पाणी देणारे आहेत. त्यामुळे … Read more

शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडतोय

अहमदनगर :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण व शहरीभागात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व आठवडे बाजार, मार्केट कमिट्या बंद असल्याने भाजीपाल्यासह कांदा, टोमॅटो, वांगी, डाळिंब तसेच इतर कृषिमाल शेतात पडून आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. देशभरात सर्वत्र कोरोना संसर्गजन्य रोगाने ग्रामीण व शहरी भागात थैमान घातल्याने सर्व काही लॉकडाऊन झाले आहे. तसेच … Read more

जिल्हा बॅँकेची बदनामी केली तर ….वाचा काय म्हणतात बॅँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर

अकोले : अहमदनगर जिल्हा बॅँकेचा देशासह राज्यात लौकीक आहे. शेतकरी व ठेवीदारांच्या विश्वासावर आजवर बॅँकेने यशस्वी वाटचाल केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॅँकेत झालेली नोकरभरती शासन व उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून झाली आहे; मात्र काही लोक या भरतीविषयी गैरसमज पसरवत आहेत. बॅँकेला बदनाम करणाऱ्या अशा लोकांविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील … Read more

पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या असा झाला पसार बातमी वाहून तुम्हालाही बसेल धक्का …

संगमनेर : तालुक्यातील अकलापूर येथील भोरमळा येथे पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या गज वाकवून पसार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अकलापूर शिवारातील भोरमळा याठिकाणी तेजस मधे यांनी प्रताप भोर यांची शेती वाट्याने केली आहे. शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री सात ते आठ वाजेच्या दरम्यान ते कांद्याला पाणी भरत होते. यावेळी त्यांच्या जवळ … Read more

वाटसरू महिलेची सुखरुप प्रसूती

खरवंडी : नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे मागील आठवड्यात यवतमाळला पायी चाललेल्या महिलेची एटीएमच्या आडोशाला सुखरुप प्रसूती केल्याबद्दल नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने आरोग्य सेविकेचा सत्कार करण्यात आला. लॉकडाऊनच्या धाकाने घर जवळ करण्याकरिता वाघोली येथून वागत (जि. यवतमाळ) पायी जात असताना वडाळा बहिरोबा येथे रस्त्यावरच निर्मला संदीप काळे हीस प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या होत्या. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांचे दुखःद निधन

जामखेड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व जामखेड तालुक्यातील जवळा सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रदीप पाटील (वय ३६) यांचे दुःखद निधन झाले. पाटील यांची तालुक्यात ओळख आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून होती, जवळा जिल्हापरिषद गटात किंगमेकर म्हणून त्यांना ओळखले जात. पक्षाच्या विवध पदांवर काम करत असतानाच पाटील यांनी जवळा सेवा संस्थेच्या चेअरमनपदी, ‘जामखेड तालुका … Read more

दारू व्यवसायाची माहिती दिल्याच्या रागातून महिलांनी केली ‘त्या’ महिलेस बेदम मारहाण

पारनेर :- अवैध दारू व्यवसायाची माहिती दिल्याच्या रागातून तीन महिलांनी एका महिलेस बेदम मारहाण केली. मारहाणीची तक्रार देण्यासाठी निघालेल्या महिलेचा विनयभंगही करण्यात आला. ही घटना देवीभोयरे येथे घडली. महिलेच्या फिर्यादीवरून तीन महिलांसह मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विनयभंग करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. देवीभोयरे येथील कौलवस्तीवर एक महिला अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती पीडित … Read more

मास्क न वापरणाऱ्यांकडून झाला ‘इतका’ दंड वसूल

अहमदनगर Live24 :- आदेश देऊनही अनेकजण मास्क न वापरता रस्त्यांवर फिरतात. त्यामुळे मनपाच्या पथकांनी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला गती दिली आहे. गुरूवारी दिवसभरात सुमारे साडेदहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईसाठी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी चार पथके नेमली आहेत. प्रभाग १ ते ४ समित्यांसाठी ही पथके आहेत. बुधवारी पथकाने कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावला. … Read more

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल

नेवासा :- तालुक्यातील तेलकुडगाव येथील मीरा संतोष गटकळ या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पती, सासरा, सासूसह पाच जणांवर गुन्हा नोंदवला. मिराचा मृतदेह विहिरीतील पाण्यात सोमवारी आढळला होता. तिचे माहेर व सासर गावातीलच आहे. मीराचे वडील हरी भिका गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत विहीर खणण्यासाठी माहेरून दीड लाख रूपये आणावेत, यासाठी मीराचा छळ करण्यात आल्याचे नमूद केल्याने पाेलिसांनी … Read more

सरपंच स्वत: भरणार ग्रामस्थांची पाणीपट्टी !

अहमदनगर Live24 :- सध्या जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे जग अडचणीत आले असून हाताला काम नसल्यामुळे खेड्यातील गरीब जनता अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीमध्ये आधार म्हणून वडुले खुर्दचे (ता.शेवगाव) लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब सोपान आव्हाड यांनी एप्रिल व मे या दोन महिन्याची गावातील ग्रामस्थांची पाणीपट्टी स्वत: भरण्याचा निर्णय घेऊन पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात … Read more

रोहित पवारांच्या मतदारसंघात ८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

अहमदनगर Live24  :- कर्जत तालुक्यात आठ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून या गावात टँकर सुरू करणे आवश्यक असल्याने सभापती सौ. अश्विनी कानगुडे यांनी पंचायत समितीमध्ये याबाबत आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना काही गावात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या गावात शासकीय टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत पंचायत समितीमधून … Read more

शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

संगमनेर :- तालुक्यातील दाढ खुर्द येथे बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेलेले शेतकरी प्रकाश तुळशीराम गिते (वय ४६) यांच्यावर बिबट्याने sangहल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतकरी प्रकाश गिते हे प्रवरा उजव्या … Read more