दु:ख बाजुला ठेवून तहसीलदारांनी मोबाइलवरून घेतले आजोबांचे अखेरचे दर्शन

नेवासा : तहसीलदार रुपेश सुराणा यांच्या आजोबांचे काल निधन झाले. मात्र निधनाचे दु:ख पचवून अंत्यविधीला न जाता त्यांनी मोबाइलवरून आजोबांचे अखेरचे दर्शन घेतले व दु:ख बाजुला ठेवून त्यांनी त्यांच्या कामाला प्राधान्य दिले. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास तहसीलदार रुपेश सुराणा यांचे आजोबा राणू लाल सुराणा यांचे निधन झाले. ही दु:खद घटना समजताच ते भावनाविवश झाले. काही … Read more

होय ! आपले अहमदनगर आता कोरोनामुक्त होतेय …

अहमदनगर Live24 :- अहमदनगरमधील दोन कोरोना बाधित असलेल्या रुग्णांचा १४ दिवसानंतरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना हॉस्पिटल देखरेखीखाली ठेवणार आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबिकर यांनी ही माहिती दिली जिल्ह्यामध्ये ११ मार्च रोजी दुबईहून आलेल्या एका डॉक्टराला या संसर्गजन्य आजाराची लागणं झाली होती. त्यानंतर बाधीताचा आकडा वाढत तब्बल ३१ पर्यंत … Read more

कोरोनामुळे शेतकरी हवालदिल,शेतकऱ्यांचे होतेय मोठे आर्थिक नुकसान…

अहमदनगर Live24 :- लॉकडाऊनच्या आदेशामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे भाजीपाल्यासह फळविक्रीमध्ये कमालीची घट झाली आहे. भाजीसह फळांचे दरही कोलमडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने तो हवालदिल झाला आहे. शेतात काबाडकष्ट करून पिकवलेला भाजीपाला, फळे तसेच इतर सर्वच शेतमाल कवडीमोल किंमतीला विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ६९ जण अडकले राजस्थानमध्ये

अहमदनगर Live24 :- अहमदनगर जिल्ह्यातील ६९ जण राजस्थानमध्ये दिड महिन्यांपासून अडकले असल्याची माहिती मिळत आहे. नातेवाईकांनी प्रशासनाकडे राजस्थानमध्ये अडकलेल्या नागरिकांना गावी आणण्याची मागणी केली आहे. नगर जिल्ह्यातील ६९ नागरिक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय येथे सेवक म्हणून सेवा करण्यासाठी गेले होते. सर्व जण ९ मार्च रोजी रेल्वेने दहा दिवस सेवा करण्यासाठी राजस्थानमध्ये पोहोचले. परंतु देशात लॉकडाऊन जाहीर … Read more

अचानक कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याची जोरदार अफवा वाऱ्यासारखी पसरली….

कर्जत :- तालुक्यातील एका महिलेस सारी आजाराच्या संशयावरून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. यानंतर मात्र कर्जतमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याची जोरदार अफवा पसरली. त्यामुळे चुकीची माहिती प्रसारीत केल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी दिली. कर्जत तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्वांनीच सुस्कारा सोडला असताना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन लाखाची खंडणी घेणाऱ्या सरपंचास अटक

अहमदनगर Live24 :-  जामखेड तालुक्यातील पिंपळगाव ऊंडा येथे पिस्तुलाचा धाक दाखवून दोन लाखाची खंडणी घेणाऱ्या तिघांना जामखेड पोलिसांनी जेरबंद केले. आपटी गावचे सरपंच नंदकुमार प्रकाश गोरे (वय ३०), सचिन बबन मिसाळ (वय ३४), वाल्मिक किसन काळे (वय २४ सर्व रा.आपटी ता.जामखेड) असे पकडण्यात आलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत. याबाबत समजली माहिती अशी की, सोमनाथ शिवदास जगताप … Read more

उशिरा का होईना, श्रीगोंद्याच्या आमदारांनी या प्रश्नी लक्ष घातले…

श्रीगोंदे :- कुकडी कालव्याचे आवर्तन शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाने घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी मंगळवारी पत्रकाद्वारे केले. कुकडी कालव्याचे पाणी सोडण्याच्या सुरुवातीपासून आपण मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. उशिरा का होईना, श्रीगोंद्याच्या आमदारांनी या प्रश्नी लक्ष घातले. आता अधिकारी व … Read more

‘त्या’ दोन कोरोनाबाधितांना मिळणार डिस्चार्ज

अहमदनगर ;- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर अजून ५४ अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, कोरोना बाधीत ०२ रुग्णांचे १४ दिवसानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बूथ हॉस्पीटल मधून डिस्चार्ज दिला जाणार आहे. यात आलमगीर येथील एक आणि सर्जेपूरा (नगर) येथील एका रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा … Read more

ही बातमी वाचून तुम्हालाही रडू येईल …व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावे लागले आईचे अंत्यदर्शन

अहमदनगर Live24 :-  नोकरीनिमित्त केंद्रशासित प्रदेश दमण येथे असलेल्या आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील मुलाला उपास्थित राहता आले नाही. त्यामुळे त्याने व्हिडीओ कॉलद्वारे आपल्या आईचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ आली. अंत्यविधीही त्याने व्हिडिओ कॉलिंगद्वारे केला. त्यामुळे उपस्थित अनेकांचे डोळे पानावले. सध्या कोरोनामुळे सर्वजण घरातच आहे. अतिमहत्त्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जाणे अवघड झाले आहे. राज्यांसह … Read more

अहमदनगर मध्ये क्वारंटाइन करण्यात आलेले ‘ते’ डॉक्टर ठणठणीत…

श्रीरामपूर :-  क्वारंटाइन केलेल्या डॉक्टरांना सोमवारी नगर येथे बोलवण्यात आल्याची माहिती समजल्यावर थोडी चर्चा झाली. मात्र, ही प्रशासकीय बाब असून ते ठणठणीत असल्याचा खुलासा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केला. नेवाशाच्या रुग्णाला श्रीरामपुरातील डॉक्टरांनी तपासले होते. हा रुग्ण नंतर कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले. त्यामुळे दोघा डॉक्टरांसह ८ जणांच्या स्राव तपासण्यात आले. ते सर्व निगेटिव्ह निघाले. त्यानंतर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा तालुका झाला ‘कोरोनामुक्त’

अहमदनगर :- राहात्यात आढळलेल्या रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुका कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली. तथापि, लॉकडाऊनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंडोनेशियातील व्यक्ती कोल्हार, भगवतीपूर, लोणी खुर्द व बुद्रूक, हसनापूर, दाढ बुद्रूक, पाथरे व हनंमतगाव या सात गावांतील पंचवीस व्यक्तींच्या संपर्कात आला होता. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांबाबतची माहिती, जाणून घ्या तुमच्या परिसरात किती आहेत कोरोना बाधित …

अहमदनगर :- जिल्ह्यात आतापर्यंत ३१ करोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी तब्बल १८ रुग्णांनी ‘करोना’वर मात केली आहे. यामध्ये १७ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून एकाला हॉस्पिटलमध्येच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर, कोपरगाव व जामखेड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यु झाला आहे. उर्वरीत ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुकानिहाय कोरोना रुग्ण पुढीलप्रमाणे ;-  नगर : … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : अपहरण आणि खंडणी मागतिल्याप्रकरणी सरपंचावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 :-  हॉटेल चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात गावठी पिस्तूलचा धाक दाखवत अपहरण करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करून तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून दोन लाखांची खंडणी वसूल करणे, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यास ठार मारण्याची धमकी देणे या आरोपांखाली आपटीच्या सरपंचासह एकुण तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ शिवदास जगताप ( वय 24, रा. पिंपळगाव उंडा … Read more

रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

अहमदनगर – लॉकडाऊनमधून सदर रिक्षा वाहतुकीला शिथीलता देवुन शासनाने परमिट, परवाना दिलेल्या ऑटो रिक्षा चालकांना वाहतुकीची परवानगी द्यावी अथवा जिल्हा पातळीवर आर्थिक मदत-मानधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहराबरोबरच राज्य व देशपातळीवर कोरोना वायरसमुळे लॉकडाऊन, तर … Read more

लॉकडाऊनमध्ये अहमदनगरच्या ‘या’ लग्नाळूंना झाली लग्नाची घाई,पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला!

अहमदनगर Live24 :- लॉकडाऊनमध्ये अहमदनगरमधील पाथर्डी शहरातील एका कुटुंबाने कोरोनाचे सर्व निर्बंध मोडून चक्क कपड्यांच्या दुकानात जाऊन लग्नाचा बस्ता बांधला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन 18 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पाथर्डी शहरातील मेनरोडवरील श्रीराम कलेक्शन हे कापडाचे दुकान आहे. दुकानाचा मालक आनंद मारुती फासे याने शेकटे व मोहटे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने सख्ख्या भावाची हत्या, पोलिसांवरही केला कुऱ्हाडीने हल्ला !

अहमदनगर Live24 :-  वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या सख्ख्या भावाचा काटा काढण्यासाठी एका भावाने त्याच्या सख्ख्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला. पैठण शहरात रविवारी स्कूल बसचालकाचा धारदार शस्राने गळा चिरून खून झाल्याचे उघड झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण व पैठण पोलिसांनी २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावून आरोपीस बेड्या … Read more

आमदार नीलेश लंके ठरले देवदूत !

अहमदनगर Live24  :- आठ महिन्यांची मुलगी, दोन वर्षांचा मुलगा यांच्या दुधाची तसेच कुटूंबाच्या जेवणाची व्यवस्था करू न शकल्यामुळे सुपे येथे वास्तव्यास असलेल्या मध्यप्रदेशातील राजवर्धन या मजुराच्या मनात आत्महत्या करून जिवनयात्रा संपवून टाकण्याचे विचार घोळत होते. त्याच वेळी आ. नीलेश लंके यांची फेसबुकवरील पोष्ट राजवर्धनच्या वाचनात आली आणि आत्महत्येचे गारूड दुर होउन आठ दिेवसाच्या कालखंडानंतर राजवर्धनच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : १९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ;- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. या व्यक्ती जामखेड, नगर, नेवासा, कोपरगाव, पारनेर येथील असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. अठरा जण ‘करोना’मुक्त जिल्ह्यात आतापर्यंत ३१ करोनाबाधित रुग्ण … Read more