राज्य कोरोनाशी लढतंय अन भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय !

अहमदनगर Live24 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधिमंडळात राज्यपाल नियुक्त सदस्यत्व देण्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. कोरोना’च्या संकटकाळात विरोधकांनी एकजूट दाखवावी आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री वारंवार करत आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतलेली भेट किंवा उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीविरोधात हायकोर्टात दाखल झालेली याचिका, या … Read more

सध्या लॉकडाऊन संपलेले नसले तरी कोरोनाची लढाई कायम – राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 / राहुरी :- रेड ऑरेंज झोनमधील भागात लॉकडाऊन कमी झालेले नसून काही भागात पेट्रोल, किराणा, कृषी सेवा केंद्र, यांचा कालावधी मर्यादित असून कृषीक्षेत्राशी निगडित असणारी ठिबक, अवजारे, यांची दुकाने शासकीय निकषाप्रमाणे सुरू करणार असल्याची माहिती उच्च शिक्षण व तंत्रज्ञान राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीत पत्रकार परिषदेत दिली. सध्या लॉकडाऊन संपलेले नसले तरी … Read more

ना नफा ना तोटा तत्त्वावर भाजीपाला घरपोहोच

पारनेर :- तालुक्यातील निघोज व परिसरात संदीप पाटील फाउंडेशनचे संस्थापक सचिन वराळ व त्यांचे सहकारी ना नफा ना तोटा तत्त्वावर भाजीपाला घरपोहोच करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद झाल्याने भाजीपाला व इतर वस्तू मिळवण्यासाठी लोकांना कसरत करावी लागत होती. भाजीपाला घेण्यासाठी एसटी बसस्थानक परिसरात जावे लागत होते. सचिन वराळ व सुनील पवार यांनी यातून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याचा बालकावर हल्ला

संगमनेर :- तालुक्यातील सुकेवाडी महादेव वस्ती येथे शेतात आईच्या पाठीमागे पायी चाललेल्या 6 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. सुनील नामदेव चव्हाण (वय 6) असे जखमी बालकाचे नाव आहे. सुकेवाडी येथील महादेव वस्तीवर बबन मुरलीधर सातपुते यांच्या स. नं. 180 मधील पंडित क्षेत्रात रात्री 8 … Read more

कोरोनाचे राज्यात एकूण ४६६६ रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ०९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ … Read more

संतापजनक : तरुणीचा विनयभंग करत डोक्यात मारली कुऱ्हाड …

अहमदनगर Live24 :- अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्ष वयाच्या तरुणीला आरोपी ओंकार लक्ष्मण सदाफळ याने इशारा करुन माझ्याबरोबर चल, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. तरुणीने जाब विचारताच आरोपी व त्याच्या आई-वडिलांनी तरुणीच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन लाकडी दांड्याने मारहाण केली. महिलेने पोटात लाथ मारली तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग … Read more

महत्वाची बातमी : ‘सारी’चे रुग्ण शोधण्याची मोहिम झाली गतिमान,घरोघरी होतेय सर्वेक्षण

अहमदनगर  :- श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत असणार्‍या (सारी) रुग्णांची ते रुग्णालयापर्यंत येण्याची वाट न पाहता विविध पथके स्थापन करुन ग्रामीण आणि नागरी भागात सर्वेक्षण करुन आजाराची लक्षणे असणार्‍या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात तालुकानिहाय विविध पथके स्थापन करुन घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. कोरोना विषाणू … Read more

कोरोनावर मात करण्यासाठी गरजूंसाठी सरसावले माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 :- सरपंच पदापासून राज्याच्या मंत्रीपदापर्यंत लोकसंपर्काच्या माध्यमातून वाटचाल केलेले नेतृत्व ही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची ओळख आहे. तीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सत्ता असो वा नसो, सामान्य जनतेच्या सोबत प्रसंगात माजी मंत्री कर्डिले यांनी नेहमीच आघाडीवर राहून जनतेचे प्रश्‍न मार्गी लावले. जनतेसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी लॉकडाऊनच्या काळातही सामान्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिअरबारचा मालक बेपत्ता,वेगवेगळ्या चर्चेला उधान….

अहमदनगर – राहुरी तालुक्‍यातील उंबरे येथील हॉटेल नटराज बियर बार ‘चा मालक दि.१७ एप्रिल रोजी दुपार पासुन अचानक रहस्यमय गायब झाल्याची घटना घडली असुन याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. संतोश रघुनाथ ढोकणे वय वर्ष ३२ राहणार उंबरे हा तरुण दि.१७ रोजी दुपारी जेवन झाल्या नंतर काळी दुचाकी पल्सर घेवुन गेला मी … Read more

ऊस तोडणी मजुरांना त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी शासनाने तयार केलेली नियमावली ही अतिशय किचकट – आ. विखे पाटील

अहमदनगर – ऊस तोडणी मजुरांना त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी शासनाने तयार केलेली नियमावली ही अतिशय किचकट आणि प्रशासकीय स्‍तरावर वेळकाढुपणाची ठरणार असल्‍याने हे परिपत्रक मागे घ्‍यावे, आणि ऊस तोडणी मजुरांची आहे त्‍याच ठिकाणी वैद्यकीय तपासणी करुन एस.टी महामंडळाच्‍या गाड्यांमधुन त्‍यांना गावी सुरक्षित पोहचविण्‍याची व्‍यवस्‍था करावी अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. या … Read more

धक्कादायक : ‘त्या’ कोरोना बाधीत मृत व्यक्तीच्या दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट

अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही बाधीत काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या रुग्णाची मुले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता ३१ झाली आहे.  जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात … Read more

ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर जिल्ह्यात आणखी ०२ जण कोरोना बाधीत

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात आणखी ०२ जण कोरोना बाधीत असल्याची माहिती समोर आली आहे. जामखेड येथील काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या बाधीत व्यक्तीच्या २९ आणि ३६ वर्षीय मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ३१ झाली असून पैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अहमदनगर Live24 वर … Read more

बिग ब्रेकिंग : नगर-कल्याण महामार्गावर एकाचा खून

अहमदनगर – नगर – कल्याण महामार्गावरील नेप्ती फाटा येथे कुजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. मयत व्यक्तीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आहेत.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर तालुक्‍यात नगर-कल्याण रोड परिसरात नेप्ती गावच्या शिवारात पुलाचा पाईप असून या पाईपात एका अनोळखी इसमाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह लपविल्याचे आढळून आले. एका स्थानिक … Read more

क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या ‘त्या’ मोठ्या डॉक्टरांना अहमदनगर मध्ये केले दाखल !

अहमदनगर – श्रीरामपुरात क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या एका मोठ्या डॉक्टरांना आज नगर येथे क्वॉरंटाईन करण्यासाठी हलविण्यात आले. याबाबत दुपारी विविध तर्कवितर्क आणि चर्चना ऊत आला होता. याबाबतची अधिक माहिती अशी की, नेवासा येथील एका पेशंटला श्रीरामपुरातील डॉक्टरांनी तपासल्यानंतर सदर पेशंट नंतर कोरोनाग्रस्त असल्याचे रिपोर्टवरुन पुढे आले त्यामुळे श्रीरामपुरातील दोघा डॉक्टरांसह ८ जणांच्या स्रावचे नमुने तपासण्यात आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारातील जांभूळवाडी फाट्यावरील निळवंडेच्या कालव्यात अंदाजे ४० वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या नाकातून व डाव्या कानातून रक्त बाहेर आले होते. मृताच्या शरीरावर गुलाबी फुलबाहीचा शर्ट, … Read more

रोहित पवारांचा कर्जत-जामखेडसाठी पुन्हा ‘मदतीचा हात’ ! १५ हजार कुटुंबांसाठी ४ ट्रक कांदा-बटाटे

अहमदनगर – कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालखंडात कर्जत-जामखेडसाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा ‘मदतीचा हात’ पुढे आला आहे. मतदारसंघातील गोर-गरीब शिधापत्रिका नसणाऱ्या, भूमीहीन, मोलमजुरी करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या, ज्यांना शिधापत्रिका आहेत परंतु त्यांची शासनस्तरावर नोंदणी नसल्याने धान्य मिळत नसलेल्या लोकांना आता एक किलो कांदा व एक किलो बटाटा देण्यात येणार आहे. … Read more

सार्वजनिक ठिकाणी ‘ही’ चूक केल्याने जेलची हवा

श्रीगोंदा – शहरातील जुबेर मोहम्मद इसाक कुरेशी रा.कुरेशी गल्ली येथील तरुणाने रोकडोबा चौकात येऊन सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन पिचकारी मारत असतांना दिसल्याने या व्यक्तीने जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेश उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडुन कोरोना विषाणूचा धोका असल्याचे माहिती असून देखील संसर्ग पसरण्याचा कारणीभूत होईल असे वर्तन केल्याने … Read more

आमदार बबनराव पाचपुते म्हणाले काळजी करू नका…

श्रीगोंदे :- काही ठिकाणी गेजच्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, काळजी करू नका. सर्वांचे भरणे पूर्ण होईल, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले. घोडचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, उपअभियंता दिलीप साठे, देशमुख यांच्यासमवेत पाचपुते यांनी रविवारी चारी ९ ते १४ ची पाहणी केली. ते म्हणाले, १३२ … Read more