वाढत्या तापमानाचा दूध व्यवसायाला फटका !

Ahmednagar News

Ahmednagar News : वाढत्या तापमानामुळे दूध व्यवसाय सध्या अडचणीत सापडला आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम शिवारातील हिरव्या चाऱ्यावरही झाला आहे. पाणी पातळीत घट झाल्याने दुभती जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तालुक्यातील अनेक भागात विहिरीसह कुपनलिकांनी तळ गाठल्याने हिरवा चारा दुर्मिळ झाला आहे. चाराटंचाईचा दुग्धव्यवसायावर परिणाम झाला आहे. संकरित गायीचे दूध सहज उपलब्ध होत असले, तरी … Read more

श्रीगोंदा तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढला

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहरासह तालुक्यात उन्हाच्या तडाख्यामुळे जिवाची लाही लाही होत आहे. उन्हाचा पारा ४० पार गेला असून, उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजे दरम्यान उन्हाचा चटका इतका असतो की, नागरिक घराबाहेर किंवा कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडायचे टाळत आहेत. त्यातच तालुक्यात पाणी टंचाईच्या झळाही यंदा वाढीव तापमानाने बसू लागल्या … Read more

तहान भागविणारे हातपंप ठरु लागले ‘बुजगावणे’

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळीसह परिसरातील ग्रामस्थांची तहान भागविणारे हातपंप देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने आज रोजी इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. कुपनलिकांचा वाढता वापर, सहज विकतचे उपलब्ध होणारे पाणी आणि पाणीपुरवठा योजनांचा विस्तार, यामुळे हातपंपांचे अस्तित्वच धोक्यात सापडले आहे. प्रशासनाने याची दखल घेत गावोगावी सर्वेक्षण करून नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर … Read more

उष्माघातापासून करा स्वतःचा बचाव

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळा सुरू झाला असून उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत आहे. अनेक ठिकाणी उष्माघातामुळे अनेक जण आजारी पडू लागले आहेत. सकाळची सूर्यकिरणेही प्रखर असल्याने लोकांचे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. यामुळे तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे डीहायड्रेशनचा धोका वाढतो. यामुळे या ऋतूत विशेष काळजी घ्यावी लागते. मग … Read more

MP Sujay Vikhe : महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच होईल, कारण…

महाराष्ट्र मजबूत झाला तरच देश मजबूत होईल, मोदींच्या विकासाचे यान चंद्रावर पोहचले आहे. मात्र राहूल गांधीचे यान अद्यापही लॉंच होऊ शकले नाही. महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच होईल, कारण आता जनतेचा विश्वास फक्त मोदी गॅरेंटीवर असल्याचे प्रदिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेत ते … Read more

महायुतीच्या कार्यकर्त्यांचा चांगूलपणा सभेनंतर केले पटांगणाची साफ सफाई

महायुतीने लोकसभेचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या सभेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सभा पटांगणाची साफ सफाई करून एक आगळा वेगळा आदर्श लोकांसमोर ठेवला. यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचे लोकांकडून कौतूक केले जात आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शात सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला उमेदवारी अर्ज दाखल … Read more

मोदींची गॅरंटी आता देशवासियांना मिळाली ! त्‍यामुळेच तिस-यांदा पंतप्रधान करण्‍यासाठी नागरीक सज्‍ज

Modi Govt

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश आज महासत्‍ता बनत आहे. त्‍यांचे नेतृत्‍व आता विश्‍वमान्‍य झाल्‍यामुळेच देशाचे भवितव्‍य घडणार आहे. केवळ दहा जागा लढविणारे जाणते राजे देशाचे भवितव्‍य घडवू शकणार नाहीत असा टोला लगावून जिल्‍ह्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक विकसीत करण्‍याचा आपला प्रयत्‍न असून, आपली भूमि‍का उद्योग व्‍यवसाय आणण्‍याची आहे. इतरांसारखी धाक, दडपशाही करुन घालविण्‍याची नाही अशी … Read more

शरद पवार नेहमीच विखे यांच्या विरोधात उमेदवार देतात पण… उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना विजयाचा विश्वास

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खा. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिलेली आहे. अजून लंके … Read more

Ahmednagar News : पाणी पिणे जीवावर बेतले ! कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू, शेवगावात बुडाला मालेगावमध्ये मृतदेह आढळला

Ahmednagar News

Ahmednagar News : पाणी पिणे युवकाच्या अगदी जीवावर बेतले आहे. जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर कामावरून पाणी प्यायला गेलेला युवक कालव्यात बुडाला. त्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील कांबी येथे घडली. अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय २२) असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना शनिवारी (दि.२०) दुपारी धाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान … Read more

नगरमध्ये तिसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे आयोजन

‘द पब्लिक ब्रॉडकास्ट, वन विभाग (महाराष्ट्र शासन) आणि न्यू आर्ट्स महाविद्यालय, अहमदनगर यांच्या वतीने अहमदनगर येथे तिसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ५ जून रोजी जगारिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा महोत्सव संपन्न होणार आहे. सदर महोत्सवात पर्यावरण व निसर्ग विषयक लघुपट, माहितीपट व चित्रपट दाखविले जाणार आहेत.यासाठी २१ हजाराहून अधिक रकमेची बक्षिसे … Read more

Ahmenagar News : करोडो घेऊन पळालेले शेअर ट्रेडर्स गुंतवणूकदारांना पोलिसांत गेल्याने देतायेत धमकी, एकाने तर बंदूकीचाच विषय काढला…

Ahmednagar News

अहमदनगरमध्ये सध्या अनेक घोटाळे विशेषतः सहकार क्षेत्रातील घोटाळे उजेडात आले. त्यापाठोपाठ शेअरमार्केटमधील काही ट्रेडर्स करोडो रुपये घेऊन पळाल्याची घटना घडली. याने अहमदनगर जिल्हा हादरून गेला. शेवगाव तालुक्यामधील काही शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यावसायिकांनी रातोरात पलायन केल्यानंतर फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रारी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भूमिगत झालेले काही शेअर ट्रेडर्स व्हॉट्सअॅप ग्रुपवर खळबळजनक … Read more

Ahmednagar News : अहमदनगरच्या चिंचा साता समुद्रापार ! जगभरात मागणी, मजूर,व्यापारी, शेतकरी झाले मालामाल

chinch

Ahmednagar News : चिंच हे फळ सर्वपरिचित आहे. चिंचेला औषधांत, विविध पदार्थांत टाकण्यासाठी प्रचंड मागणी असते. चिंचोक्यालाही तितकीच मागणी असते. अहमदनगर जिल्ह्यात चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघते. चिंचेचे व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात अहमदनगरमध्ये आहेत. दरम्यान यंदा चिंचेला चांगला बाजार मिळत असल्याने शेतकरी, व्यापारी, मजूर यांची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे. यंदा ९ ते १५ हजार … Read more

Ahmednagar News : पिण्याचे पाणी मिळेना, त्रस्त जनता आक्रमक ! निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ‘या’ गावाचा इशारा

pani tanchai

Ahmednagar News : पाणी टंचाई, पाण्याचे दुर्भिक्ष्य आदी गोष्टीची अहमदनगर जिह्यातील काही तालुक्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या. आता या पाणीटंचाईमुळे नेवासेमधील जनता त्रस्त झाली आहे. आता नागरिकांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशाराच दिला आहे. नागरिक म्हणतात, मागील दोन वर्षांपासून पिण्याचे पाणी १० ते १५ दिवसांतून येत आहे. याबाबत अनेकवेळा निवेदन देऊन देखील कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने … Read more

Ahmednagar News : निवडणूक आचारसंहितेचा फडमालकांना फटका, सुपारी कमी केली तरी यात्रोत्सवात आमंत्रण मिळेना ! लोककलावंतांवर उपासमारीची वेळ

tamasha

Ahmednagar News : तमाशा हा महाराष्ट्राच्या लोककलेपैकी एक लोककला. एक काळ होता तमाशाला सुगीचे दिवस होते. कार्यक्रमाचे फड गावोगावी रंगायचे. परंतु जसजसे काळ बदलत गेला तसतशी करमणुकीची साधने बदलत गेली. त्यामुळे आता तमाशाला शक्यतो यात्रोत्सवाचाच आधार राहिला. या काळात अनेक गावात तमाशाचे फड उभे राहतात. परंतु सध्या लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरु असल्याने यालाही ग्रहण लागले … Read more

नीलेश लंके साधेपणाने अर्ज दाखल करणार ! महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार

MLA Nilesh Lanke

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल करणार आहेत. मतदारसंघातील आजी माजी आमदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती लंके यांच्या संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. सन २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीतही लंके यांनी शक्तीप्रदर्शन … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘बड्या’ मल्टीस्टेटकडून पतसंस्थेच्या लाखोंच्या ठेवी गायब पैसे मागताच जीवे मारण्याच्या धमक्या, संचालकांसह १८ जणांवर गुन्हा

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याने सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पतसंस्था अगदीच धोक्यात आलेल्या दिसतात. मध्यंतरी काही घोटाळे उघड झाले असतानाच आता एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. अहमदनगरमधील महालक्ष्मी मल्टिस्टेट पतसंस्थेने त्यांच्याकडे ठेवलेल्या ठेवी परत न करता ज्ञानेश्वर पतसंस्थेची ४९ लाख ५४ हजार ९६१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याचे … Read more

सुजय विखेंनी दिला अनिल भैय्यांच्या आठवणींना उजाळा, अनिलभैय्या यांच्या आठवणीने विखे गहिवरले, खा. विखे म्हणतात…..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पाच वर्षांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. 18 व्या लोकसभेसाठी देशात निवडणुका सुरू आहेत. संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडी मध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत … Read more

सायकलवरून संसदेत जाणारा खासदार ! कोण होते अहमदनगर दक्षिणचे पहिले खासदार ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : सहकार, कृषी, क्रीडा, उद्योग, पर्यटन, शिक्षण, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याने आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. आता जिल्ह्यालाही एक वेगळी ओळख मिळाली आहे. अहमदनगर आता अहिल्यानगर बनले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अहमदनगरचे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर … Read more