नगरमध्ये तिसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे आयोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘द पब्लिक ब्रॉडकास्ट, वन विभाग (महाराष्ट्र शासन) आणि न्यू आर्ट्स महाविद्यालय, अहमदनगर यांच्या वतीने अहमदनगर येथे तिसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ५ जून रोजी जगारिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा महोत्सव संपन्न होणार आहे.

सदर महोत्सवात पर्यावरण व निसर्ग विषयक लघुपट, माहितीपट व चित्रपट दाखविले जाणार आहेत.यासाठी २१ हजाराहून अधिक रकमेची बक्षिसे जाहीर केली आहेत अशी माहिती महोत्सवाचे मुख्य आयोजक कृष्णा बेलगांवकर यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून अहमदनगर मध्ये ‘राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे’ आयोजन केले जाते. दिवसेंदिवस निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून यावर प्रखर भाष्य होणे गरजेचे आहे. यासाठी विविध स्तरावर अनेक संकल्पना राबविल्या जातात.

मात्र सध्या टेक्नोसावी जग असल्याने दृकश्राव्य तसेच चित्रभाषेच्या माध्यामतून यावर चांगली नजर टाकता येऊ शकते. या विचाराने राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा घेतली जात आहे. देशभरातील विविध राज्यातून लघुपट, माहितीपट या महोत्सवात सहभाग नोंदवितात.

यासोबतच दरवर्षी नामांकित दिग्दर्शकांच्या उपस्थितीत पर्यावरणावर भाष्य करणाऱ्या एका चित्रपटाचे स्क्रिनिंग केले जाते तसेच पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित केले जाते.

चालू वर्षी लघुपट व चित्रपट यांसोबत निसर्ग चित्रां प्रदर्शन देखील आयोजित करणार आहे अशी माहिती महोत्सव संचालक आकाश गोटीपामुल यांनी दिली. जास्तीत जास्त निसर्ग व पर्यावरण प्रेमींनी या महोत्सवासाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.