रेल्वे स्टेशन परिसरात ‘तो’ गावठी कट्टा घेऊन फिरत होता अन अचानक पोलीस आले समोर….

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:-श्रीरामपूर शहरात रेल्वे स्टेशनसमोर विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस स्वतःजवळ बाळगुन फिरणार्‍या एकास पोलिसांनी अटक केली आहे. सचिन बाळू धुमाळ (वय 30) रा.संभाजी चौक, अशोकनगर, ता. श्रीरामपूर असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल नहादेव नरवडे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा … Read more

परजिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणारे अट्टल चोरटे सापडले पोलिसांच्या तावडीत

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:- श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. हे चोरटे पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथून दुचाकी चोरण्याचं काम करत असत. दरम्यान याप्रकरणातील दोघा आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर येथील अक्षय गाडेकर यांच्याकडून पोलिसांनी नंबर नसलेली मोटारसायकल … Read more

तर कापडबजार मधील व्यापारी बेमुदत उपोषणास बसणार

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर शहरातील कापड बाजारातीलअतिक्रमण धारकांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता हाच प्रश्न कायम स्वरूपी सुटण्यासाठी येत्या मंगळावर पासून व्यापारी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. दरम्यान अधिक माहिती अशी, १२ मार्च रोजी रस्त्यवरील पथविक्रेत्यांचे आणि कापड बाजारातील एका दुकानदाराचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बसला आग लागून पूर्णपणे जळून खाक ! तब्बल पस्तीस प्रवासी…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24:- नांदेडहुन पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक बसला आग लागून ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील कल्याण -निर्मल (विशाखापट्टण) राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. बसला पाठीमागून आग लागल्याचे बसच्या मागे असलेल्या वाहन चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाला आग लागल्याची … Read more

आमदार निलेश लंके यांच्या अडचणी वाढणार ? शिवसेना नेते म्हणतात आमचाच…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022  Ahmednagar Politics :- आधी शिवसेना नगरसेवकांची फोडाफोडी आणि नंतर करोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केले काम यामुळे पारनेर तालुका चर्चेत आला आहे. आधी विधानसभा आणि नंतर नगरपालिका असे दोन पराभवाला समारे जावे लागलेल्या शिवसेनेने आता पुन्हा या तालुक्यावर दावा ठोकला आहे. पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे … Read more

क्लासमधील अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या युवकाला न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गणेश दादासाहेब सावंत (वय 20 रा. जोहारवाडी ता. पाथर्डी) या युवकाला जिल्हा न्यायालयाने दोषीधरून एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला. सरकारी वकील म्हणुन श्रीमती मनिषा पी. … Read more

प्रवासात अंगावर थुंकल्याचा जाब विचारताच तरूणाला सात जणांकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- दुचाकीवरून समोर चाललेला व्यक्ती पाठीमागे न पाहताच थुंकला. पाठीमागे असलेल्या तरूणाच्या अंगावर ती थुंकी उडाली. याचा जाब विचारल्यावरून सात जणांनी तरूणास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजता कायनेटीक चौकातील जाधव वडेवाले यांच्या दुकानासमोर घडली. मारहाणीत अक्षय किशोर गुप्ता (वय 30 रा. श्रीकृष्णनगर, केडगाव) हा तरूण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शालेय विद्यार्थीनीचा धरणाच्या भिंतीवरुन पडुन दुर्दैवी मृत्यु

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24 :- भंडारदरा धरणाच्या भिंतीवरून मोबाईल वर चित्रीकरण करण्याच्या नादात तोल गेल्याने एका शालेय विद्यार्थीनीचा धरणाच्या भिंतीवरुन पडुन दुर्दैवी मृत्यु झाला असुन या मृत्युमुळे भंडारदरा धरणाच्या ढिसाळ सुरक्षे यंत्रणेचे पुन्हा लक्तरे वेशीवर टांगले गेले आहेत. अकोले तालुक्यातील ब्रिटिश कालीन भंडारदरा धरण हे उत्तर नगर जिल्ह्याची जीवन रेषा समजले जाणारे.या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी ! सिव्हिलमधील ऑक्सिजन प्लॅटवर चोरट्यांचा डल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:-  जिल्हा शासकीय रूग्णालयातील सेंट्रल ऑक्सिजनची लाईनचे चोरट्यांनी नुकसान करून ऑक्सिजन पुरवठा करण्याकरीता असणारे साहित्य चोरून नेले. यामुळे काही काळासाठी जिल्हा रूग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान या प्रकरणी शुक्रवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा प्रल्हाद उंदरे (वय 40 … Read more

बिग ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आले शिर्डित ! म्हणाले राजकारण गेलं चुलीत…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Politics :- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट समाना रंगलेला पहायला मिळाला. त्यावरून टोकाचे राजकारण सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच फडणवीस यांनी शिर्डीतून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला. सध्याच्या घडामोडींच्या संदर्भाने ते म्हणाले, ‘राजकारण गेलं चुलीत. मात्र, … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सबस्टेशनमध्ये घुसून कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24:- कार्यालयात घुसून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना मारहाण करण्यात आली. अकोळनेर (ता. नगर) सबस्टेशन येथे ही घटना घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघा सख्या भावांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास सुरेश भोर व विजय सुरेश भोर (दोघे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साखरपुडा ठरलेल्या तरुणाच्या बाबतीत घडले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24 :- विहिरीचे खोदकाम सुरू असताना विजेचा शॉक लागून कणगर ता. राहुरी येथील आरबाज शेख (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे घडली आहे. भोकर परीसरातील वडजाई शिवारात रविंद्र गोविंद काळे यांचे गट नं.140 मध्ये पन्नास फूट विहीर खोदाईचे काम सुरू होते. हे काम राहुरी … Read more

अहमदनगरच्या बोगस आर्किटेक्टवर दिल्लीत गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Crime news :- अहमदनगर शहरातील आर्किटेक्ट यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून कौसिंल ऑफ आर्किटेक्चरचे रजिस्ट्रेशन मिळविल्यामुळेे त्यांच्यावर लोदी रोड नवीदिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ओम मुकुंदराव नगरकर ऊर्फ ओम गवळी असे गुन्हा दाखल झालेल्या आर्किटेक्टचे नाव आहे. ओम नगरकरांनी आर्किटेक्चर पदवीला प्रवेश न घेता परिक्षा पास झाल्याचे खोटे … Read more

अहमदनगरमध्ये अवजड वाहतुक नियमांचे उल्लंघन; एसपींनी दिले ‘हे’ आदेश

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar news :-शहरामध्ये अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यामुळे ही अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्यावरून वळवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या संदर्भात लेखी स्वरूपामध्ये आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक शाखेला दिलेल्या आहेत. दरम्यान शहरामध्ये अवजड … Read more

जवखेडे हत्याकांड; न्यायालयाची दिशाभूल केल्याचा तपासी अधिकार्‍यावर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर जवखेडे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. आरोपींच्या वतीने विधिज्ञ सुनील मगरे, नितीन मोने, छगन गवई, सिद्धार्थ उबाळे, अरूण चांदणे हे काम पाहत आहेत. संजय, जयश्री आणि सुनील जाधव यांच्या हत्याकांडात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावण्यात आले होते. यानंतर या गुन्ह्याचा तपास … Read more

श्रीरामपूर, श्रीगोंद्यात चार ठिकाणी एलसीबीची छापेमारी

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- श्रीरामपूर, श्रीगोंदा तालुक्यातील चार ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकले. याप्रकरणी चौघांविरूध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून या कारवाईत हातभट्टी दारू व रसायन असा 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुहास नंदकुमार आलवट व बरकतअली रशीद शेख … Read more

अहमदनगर ब्रेकींग : जिल्हा परिषद शाळेच्या आवारात तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagarlive24:- राहुरी तालुक्यातील बारागांव नांदुर येथील विशाल विठ्ठल पवार वय २२ या तरुणाने गुरुवारी रात्री जिल्हा परिषद शाळेच्या छताला ओढणीच्या सहाय्याने रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, कृष्णा विघे, सुनील चव्हाण, पोलिस पाटील अशोक पवार अदिंनी … Read more

घरासमोर पटांगणात बसलेल्या माय- लेकांवर कुऱ्हाडीने वार

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagar crime :- शेतातील बांधावरील गवत पेटविण्यास विरोध केला. या कारणावरून एक महिला व त्यांच्या मुलांवर आरोपींनी लोखंडी रॉड व कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना दिनांक ५ मार्च रोजी राहुरी तालूक्यातील सोनगाव सात्रळ येथे घडली. सौ. सविता राजेंद्र धनवटे वय ४० वर्षे राहणार … Read more