Shirdi Loksabha : भाजपने शिर्डीतून रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारली तर काय होईल ?

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : भारतीय जनता पक्षाने शिर्डीतून रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारली तर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार देण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे. निवडणुकीत भाजपच्या विरुद्ध कार्यकर्ते काम करतील एवढी तीव्र भावना आहे, असेही रिपाइंच्या प्रमुखांनी सांगितले. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत रिपाइं नेते विजय वाकचौरे, राजाभाऊ कापसे, दीपक गायकवाड यांनी ही माहिती दिली. … Read more

शिर्डीतून ठरलं ! ‘ह्या’ नेत्याला मिळणार शिवसेनेकडून उमेदवारी !

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे स्पष्ट केले आहे. वाकचौरे हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून विजयी होतील, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारीही उपस्थित होते. यामुळे शिर्डीतील उमेदवारीचा सस्पेन्स आता उठला असून, वाकचौरे यांच्या उमेदवारीची मुंबईतून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. … Read more

मंत्री विखेंच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात पाच कौशल्य विकास केंद्र

Ahmednagar News

Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पाच चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची नुकतीच सुरुवात झाली. या पाचही केंद्रांचा प्रारंभ काल बुधवारी (दि. १३) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत दुरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आला. नगर जिल्ह्यात नुकताच नमो महारोजगार मेळावा झाला होता. या मेळाव्यातच कौशल्य विकास केंद्राची उभारणी … Read more

थोरात कारखान्याकडून १30 दिवसात १० लाख किंटल साखर निर्मिती

Ahmednagar News

Ahmednagar News : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ या गळीत हंगामात १३० दिवसात ९ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून १० लाख क्किं टल साखर उत्पादित केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले, कार्यक्षेत्र व परिसरात झालेल्या कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती … Read more

नगरचे अहिल्यानगर नामकरण करून आश्वासनांची वचनपुर्ती : मंत्री विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहराचे अहिल्यानगर, असे नामकरण करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून, महायुती सरकारने आश्वासनांची वचनपुर्ती केल्याची प्रतिक्रीया महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी … Read more

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : आंतरराष्ट्रीय कबड्डी संघात दोन मार्काने आरक्षणामुळे नंबर हुकला, त्यामुळे नैराश्य आल्याने २० वर्षीय कबड्डीपटू ओम मोहन मोरे या तरुणाने प्रवरा संगम येथे पुलावरून गोदावरी पात्रात उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी (दि.१२) मार्च रोजी रात्री ८ वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ओम छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. त्याचे वडील … Read more

Ahmednagar News : महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी, महसूलच्या पथकावर वाळूचे वाहन घालण्याचा प्रयत्न, थरार सीसीटीव्हीत कैद

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील वाळूतस्करीच्या घटना, वाळू तस्करांची दहशत आदी घटना काही नवीन नाहीत. महसूल विभागाकडून अनेकदा यावर विविध उपाययोजना देखील होतात. परंतु वाळूतस्करी किंवा वाळू तस्करांची मुजोरी काही कमी होताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे वाळूतस्करांनी कामगार तलाठी व कोतवाल यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक … Read more

Ahmednagar Breaking : अखेर तो बिबट्या जेरबंद..! वृद्ध महिलेवर केला हल्ला

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील माळेगाव येथील येसूबाई लालू सुकटे (वय ६०) या वृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास राजूर वनविभागास चार तासांत यश आले. राजूर वनपरिमंडळ क्षेत्रातील माळेगाव या खेडेगावात बुधवारी (दि. १३) दुपारी दोनच्या सुमारास अंदाजे दहा वर्षे असणाऱ्या बिबट्याने अचानक मानव वस्तीत प्रवेश केला. या गावातील कौलारू घरात घुसून त्याने वृद्ध … Read more

भररस्त्यात भरतोय बाजार ! बाजारतळातील संकुलाचे कोट्यवधी पाण्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव शहरातील गावठाण भागातील बाजारतळावर भरणारा बाजार सोमवारी मुख्य रस्त्यावर भरवण्यात आला. नगरपरिषदेने तसेच मुख्य अधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर फलकाद्वारे भाजी विक्रेत्यांनी राघोजी भांगरे ओट्यावर बाजार भरवावा म्हणून आवाहन केलेले असताना, त्याला अक्षरशः वाटण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या. पालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भर रस्त्यात बाजार भरला होता. त्यामुळे वाहनधारकांना व पायी चालणाऱ्यांना मोठा त्रास … Read more

Jal Jivan Mission : योजनांची कामे निकृष्ट माजी मंत्री पिचड यांचा आरोप : चौकशीची केली मागणी

Jal Jivan Mission

Jal Jivan Mission : केंद्र व राज्य सरकारच्या जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजनेची सर्वच कामे निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून या कामांची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी योजनेच्या मुख्य अभियंता मीनाक्षी पलांडे यांच्याकडे माजी मंत्री मधुकरराव पिचड व उपस्थितांनी केली. अकोले तालुक्यातील राजूर येथील कार्यालयात सायंकाळी साडेचार वाजता पिचड, मुख्य अभियंता … Read more

शिर्डीत लोखंडे यांना स्वपक्षातूनच विरोध, ६ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Ahmednagar News

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिर्डी मतदारसंघातील सहा तालुक्यांतील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकत्यांनी राजीनामे देत खा. सदाशिव लोखंडे यांना विरोध दर्शवला आहे. आता लोखंडे नको सक्षम उमेदवार द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख अनिता जगताप व शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी सांगितले. ऐन तोंडावर शिर्डी लोकसभा … Read more

Ahmednagar Politics : नगरच्या कार्यकर्त्यांचा नादच खुळा ! ‘या’ आमदाराच्या समर्थकाने प्रचारासाठी घातला दोन हजार कोटींचा शर्ट

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आजकालचे राजकारण व राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते यात मोठा बदल झालाय. साधे नेते व त्यांचे साधेभोळे कार्यकर्ते दिसणे आता दुर्मिळच झाले आहे. पण आपल्या नेत्यासाठी काहीपण करण्याची वृत्ती मात्र कार्यकर्त्यांची आजही कायम आहे. काही कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी, नेत्याच्या प्रचारासाठी काय भन्नाट कल्पना लढवतील हे सांगणे मुश्किल. सध्या सोन्याचा शर्ट, ब्रासलेट, साखळ्या घालून चर्चेत … Read more

Ahmednagar News : जमावाकडून तिघांना बेदम मारहाण, अहमदनगरमधील ‘या’ गावात ‘राडा’

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील कोल्हेवाडी रोड येथे तिघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगळवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले असून यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात दुसऱ्या गटाने मोठी गर्दी करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, … Read more

Ahmednagar Crime : पेपर देण्यासाठी गेलेल्या मुलीला पळवले

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : तालुक्यातील एका परिसरात राहणारी मुलगी इयत्ता दहावीचा पेपर देण्यासाठी गेली असता, तिला पळवून नेण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील एका परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी नेवासा तालुक्यातील एका ठिकाणी शिक्षण घेत होती. दहावीचे पेपर असल्याने ती श्रीरामपूर येथून सकाळी नेवासा येथे जाण्यासाठी बसने गेली असता, तिला कोणीतरी … Read more

प्रवरा, मुळा आणि गोदावरी धरण समुहाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्रवरा, मुळा आणि गोदावरी धरण समुहाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तनाचे सुयोग्य नियोजन करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी, मुळा, भंडारदरा, निळवंडे कालवा प्रकल्पाची उन्हाळी हंगाम आवर्तनाच्या नियोजनाची … Read more

मतदार संघातील रुसलेला विकास आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे परत आला !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव मतदार संघातील रुसलेला विकास आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे परत आल्याने गाव खेडी कामास विरोधकही दबक्या पावलाने हजेरी लावीत असल्याचा दावा आमदार काळे समर्थकांकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार काळे यांनी गाव खेड्यात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. हा विकास धुमधडाका पाहून … Read more

Shirdi News : कामगारांचा शिर्डीत मोर्चा ! दोन गुंठे जागा व घर बांधून देण्याचे आश्वासन…

Shirdi News

Shirdi News : शेती महामंडळाच्या हजारो कामगारांनी शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. शासनाने कामगारांच्या कोट्यवधींच्या देय रकमा अदा कराव्यात, कामगारांना दोन गुंठे जागा व घर बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, अशा घोषणा देत सोमवारी परिसर दणाणून सोडला. कामगार नेते सुभाष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी हजारो कामगारांनी मोर्चा काढला. अहमदनगर जिल्ह्यातील शेती महामंडळाची … Read more

Leopard Attack : अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

Leopard Attack

Leopard Attack : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकरुखे गावात गावठाण हद्दीत राहात असलेले रामराव लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याने आपल्याजवळ असलेल्या शेळ्या रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरासमोरच्या गोठ्यात बांधल्या. सुमारे रात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ते गोठयाजवळ गेले … Read more