शेततळ्यात पडून एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री परिसरात राहणारे सोपान हरिभाऊ घोरपडे, वय ६० वर्ष हे शेततळ्याच्या पाण्यात पडून मयत झाले आहे. त्यांना उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता सोपान हरिभाऊ घोरपडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता. प्रवरा हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील यांनी ‘लोणी पोलिसात तशी … Read more

के.के.रेंज संदर्भात राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते संरक्षणमंत्र्यांची भेट घेणार

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील के.के.रेंज हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. गावकऱ्यांपासून ते राजकीय मंडळींपर्यंत सर्वानी याविषयामध्ये हात घातला आहे. दरम्यान नगर जिल्हयातील पारनेर, नगर व राहुुरी तालुक्यातील जमीनी यापूर्वीच के के रेंज साठी लष्कराने ताब्यात घेतलेल्या आहेत. मुळा तसेच काळू धरण, कृषी विदयापिठासाठी करण्यात आलेल्या जमिनीच्या अधिग्रहनामुळे शेतकरी विस्थापीत … Read more

रोजगारासाठी तरुणांचे पंतप्रधानांना साकडे

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- आम्ही सत्तेत आलो कि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ यांसह अनेक पोकळ घोषणा करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तरुणांच्या अपेक्षाभंग केल्या आहेत. उलट कोरोनाच्या या महामारीमुळे सुरु झालेल्या या लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नौकऱ्यांवर गदा आली. बेरोजगारीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. सुशिक्षित व गरजू तरुणांना तातडीने नोकऱ्या द्याव्यात, अशी … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात चार बोकड व तीन शेळ्या फस्त

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढू लागला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान; संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी खुर्द शिवाराजवळच कान्हू गिते यांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार बोकड व तीन शेळ्यां ठार झाल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार झाल्या असून सुमारे 1 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ९५ रुग्ण वाढले वाचा आजचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.४३ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९५ ने वाढ … Read more

सलाम बळीराजाच्या जिद्दीला ! वादळाने झोपला ऊस अन ‘ह्या’ पट्ठ्याने केले ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने श्रीरामपूर तालुक्यातील पुर्व परिसरात जोरदार हजेरी लावली. या पावसाने मुठेवाडगाव, माळवाडगाव शिवारातील ऊस पिके पडल्याने नुकसान झाले आहे. पडलेली ऊस पिके पुन्हा उभी राहणे शक्य नाही. परंतु तालुक्यातील माळवाडगांव येथील शेतकऱ्याने अफाट मेहनत घेऊन एक हेक्टर झोपलेला ऊस ऊठवून नायलॉन दोरीने मोळ्या बांधून उभा केला … Read more

कोरोना रोखण्यासाठी गर्दी व समारंभ टाळा

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-कोरोना रोखण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सतर्कतेने काम करत आहे. सर्वात जास्त रॅपिड टेस्ट संगमनेर तालुक्यात झाल्या आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर गर्दीसह घरगुती समारंभ प्रत्येकाने टाळावे, असे आवाहन नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले आहे. नगराध्यक्ष तांबे म्हणाल्या, मंत्री थोरात, आमदार डॉ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

दिवसभरात कोरोनामुळे आणखी ११ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे आणखी ११ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ३८९ झाली आहे. बाधितांची संख्या २७ हजार १०९ झाली आहे. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत २२८, खाजगी प्रयोगशाळेत २२२ आणि अँटीजेन चाचणीत १७५ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील १२०, पाथर्डी ११, नगर ग्रामीण … Read more

येथील सरकारी कार्यालयाला बिबट्याची रखवाली

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-अकोले येथील वीज केंद्राच्या गेटजवळ चक्क बिबट्या रखवालदार बनल्याने तेथील कर्मचाऱ्यांची चांगलीच फजिती झाली आहे. चक्क महिना उलटून गेला तरी बिबट्या मादी कोदनी वीज प्रकल्पात ठाण मांडून आहे. वन विभागाने गेट उघडे ठेवण्यास सांगितले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. वन विभागाने गेटजवळ शेळी ठेवून पिंजरा लावूनही हा बिबट्या तिच्याकडे ढुंकून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ६२५ रुग्ण वाढले एकूण आकडा पोहोचला @ २७१०९ !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६२५ ने वाढ … Read more

आमदार रोहित पवार यांनी साधला कंगनावर निशाणा,म्हणाले अश्या ड्रामेबाजांना

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  ‘कोरोना,बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा,आम्ही तुला सुरक्षा पुरवू’, अशी शंका मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं येत आहे. म्हणून दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं व ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षा,’ असं ट्वीट करत रोहित पवार यांनी कंगनासह भाजपवर निशाणा … Read more

ट्रक चालकांची लूट आणि खून करणारे आठ दरोडेखोर पोलीसांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील पिंप्री निर्मळ येथील टोलनाक्याजवळ दोन मालट्रक चालकांची लूट आणि एकाचा खून करणाऱ्या आठ आरोपीना लोणी पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केले. कोल्हार येथे वेगवेगळ्या भागात दडून बसलेल्या आरोपींचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. हे दरोडेखोर अहमदनगर जिल्ह्यात रस्तालूट करत होते, दोन दिवसांपूर्वी राहाता तालुक्यात एका ट्रकड्रायव्हरची गळा … Read more

वादळी वा-यासह पावसाने हाती आलेल्‍या पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे करा – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- वादळी वा-यासह पावसाने हाती आलेल्‍या पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे करण्‍याच्‍या सुचना माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी महसुल आणि कृषि विभागाच्‍या आधिका-यांना दिल्‍या आहेत. मागील दोन दिवसात तालुक्‍यात मोठ्या स्‍वरुपात वादळी वा-यासह पाऊस झाला. या पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्‍ये सोयाबीन, तुर, मुग, ऊस, बाजरी हे हाती आलेले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या १६४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६४ ने वाढ … Read more

संगमनेर तालुक्यात दोन दिवसात झाले तब्बल ‘इतके’ कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- संगमनेर शहर व तालुक्यात दोन दिवसात पुन्हा १०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या आता दोन हजारी पार झाल्याने संगमनेरकर आता धास्तावले. शनिवार व रविवारी रात्री उशिरा शहरातील बाजार पेठ (५), गोल्डन सिटी (४), जनता नगर, इंदिरानगर, रंगारगल्ली (२), एसटीकॉलनी, लालतारा हौसिंग सोसायटी, मालदाड रोड, चंद्रशेखर चौक, पाटीलमळा, शिवाजीनगर, … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याने ओलांडली कोरोना रुग्णांची हजारी

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- कोरोना रुग्णांची हजारी नेवासे तालुक्याने ओलांडली. साेमवारी नेवासे तालुक्यात ४४ कोरोना बाधित रुग्ण आढळले. एकूण १०२७ पॉझिटिव्ह रुग्ण झाले. नेवासे येथील कोविड केअर सेंटरला सोमवारी ११९ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये ३१ व्यक्ती तसेच खासगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल ८ व्यक्ती व जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात ५ असे … Read more

कुटुंबाचा पोशिंदाच गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडले …

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर शहरासह तालुक्यात मास्कचा वापर, सॅनिटायझर सह फिजिकल डिस्टन्सिंगचा स्वैराचारी नागरिकांनी फज्जा उडवला असल्याने तालुक्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असून तालुक्याचा आकडा ९६८ वर जाऊन पोहोचला. सुमारे २५ बधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिक त्याला सपशेल … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ५२४ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर :आज ५२४ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २०१ संगमनेर २२ राहाता ४० पाथर्डी २१ नगर ग्रा. ३८ श्रीरामपूर ३६ कॅन्टोन्मेंट १७ नेवासा ०६ श्रीगोंदा ०५ पारनेर १५ अकोले १५ राहुरी २६ शेवगाव १७ कोपरगाव २४ जामखेड १४ कर्जत २० मिलिटरी हॉस्पिटल ०६ इतर जिल्हा ०१ बरे झालेले एकूण रुग्ण:२२६७४ आमच्या … Read more