…म्हणून ‘या’ तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही !

कर्जत : तालुक्यात अद्याप कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. परंतु खबरदारी म्हणून आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय व नगर पंचायत यांनी पोलिसांच्या मदतीने तयारी केली आहे. तालुका आरोग्य विभागात ५ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३५ आरोग्य उपकेंद्रांतर्गत एकूण ३८१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात १२ वैद्यकीय अधिकारी, १५४ आरोग्य कर्मचारी व २१५ आशा सेविका … Read more

नामदार प्राजक्त तनपुरे यांची माजी आमदार कर्डिले यांच्यावर नाव न घेता टीका म्हणाले ….

राहुरी :- वांबोरी चारी योजनेअंतर्गत येर्णा­या राहुरी नगर पाथर्डी नेवासा तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ पाझर तलावात इतिहासात पहिल्यांदाच हक्काचे ६८० एमसिप्टी पाणी यावर्षी आम्ही दिले असून, यापूर्वी कधीही एप्रिल महिन्यात वांबोरीचारीला पाणी सोडण्याचे काम झाले नाही. मात्र एप्रिल महिन्यातही बोनस म्हणून काही दिवस वांबोरी चारीला पाणी सोडून राहुरीकर पाणी आडवणारे नसून पाणी देणारे आहेत. त्यामुळे … Read more

जिल्हा बॅँकेची बदनामी केली तर ….वाचा काय म्हणतात बॅँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर

अकोले : अहमदनगर जिल्हा बॅँकेचा देशासह राज्यात लौकीक आहे. शेतकरी व ठेवीदारांच्या विश्वासावर आजवर बॅँकेने यशस्वी वाटचाल केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॅँकेत झालेली नोकरभरती शासन व उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून झाली आहे; मात्र काही लोक या भरतीविषयी गैरसमज पसरवत आहेत. बॅँकेला बदनाम करणाऱ्या अशा लोकांविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांचे दुखःद निधन

जामखेड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व जामखेड तालुक्यातील जवळा सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रदीप पाटील (वय ३६) यांचे दुःखद निधन झाले. पाटील यांची तालुक्यात ओळख आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून होती, जवळा जिल्हापरिषद गटात किंगमेकर म्हणून त्यांना ओळखले जात. पक्षाच्या विवध पदांवर काम करत असतानाच पाटील यांनी जवळा सेवा संस्थेच्या चेअरमनपदी, ‘जामखेड तालुका … Read more

दारू व्यवसायाची माहिती दिल्याच्या रागातून महिलांनी केली ‘त्या’ महिलेस बेदम मारहाण

पारनेर :- अवैध दारू व्यवसायाची माहिती दिल्याच्या रागातून तीन महिलांनी एका महिलेस बेदम मारहाण केली. मारहाणीची तक्रार देण्यासाठी निघालेल्या महिलेचा विनयभंगही करण्यात आला. ही घटना देवीभोयरे येथे घडली. महिलेच्या फिर्यादीवरून तीन महिलांसह मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विनयभंग करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. देवीभोयरे येथील कौलवस्तीवर एक महिला अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती पीडित … Read more

मास्क न वापरणाऱ्यांकडून झाला ‘इतका’ दंड वसूल

अहमदनगर Live24 :- आदेश देऊनही अनेकजण मास्क न वापरता रस्त्यांवर फिरतात. त्यामुळे मनपाच्या पथकांनी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला गती दिली आहे. गुरूवारी दिवसभरात सुमारे साडेदहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईसाठी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी चार पथके नेमली आहेत. प्रभाग १ ते ४ समित्यांसाठी ही पथके आहेत. बुधवारी पथकाने कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावला. … Read more

सरपंच स्वत: भरणार ग्रामस्थांची पाणीपट्टी !

अहमदनगर Live24 :- सध्या जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे जग अडचणीत आले असून हाताला काम नसल्यामुळे खेड्यातील गरीब जनता अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीमध्ये आधार म्हणून वडुले खुर्दचे (ता.शेवगाव) लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब सोपान आव्हाड यांनी एप्रिल व मे या दोन महिन्याची गावातील ग्रामस्थांची पाणीपट्टी स्वत: भरण्याचा निर्णय घेऊन पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात … Read more

रोहित पवारांच्या मतदारसंघात ८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

अहमदनगर Live24  :- कर्जत तालुक्यात आठ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून या गावात टँकर सुरू करणे आवश्यक असल्याने सभापती सौ. अश्विनी कानगुडे यांनी पंचायत समितीमध्ये याबाबत आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना काही गावात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या गावात शासकीय टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत पंचायत समितीमधून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला,जिल्ह्यात बाधितांची संख्या आता ३८ !

अहमदनगर :- जामखेड येथे काल कोरोना बाधीत आढळलेल्या २ व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकाच दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ५ ने वाढली आहे. सकाळी संगमनेर येथील ०४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. काही दिवसापूर्वी … Read more

श्रीगोंदेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण !

श्रीगोंदा :- तालुक्यातील यापूर्वी पाठविलेले सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्याने श्रीगोंदेकरांना मोठा दिलासा मिळाला असला तरीही आता नवीन निघालेला आजार म्हणजे सारी चा एक संशयित रुग्ण श्रीगोंद्यात आढळल्याने पुन्हा श्रीगोंदेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यात कोरोना विषाणूशी संबंधित लोकांचे सर्वच्या सर्व अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत. मात्र आता आता … Read more

माजी आमदार औटींच्या दुर्लक्षामुळे पाण्याचे संकट !

पारनेर :- ग्रामपंचायत तसेच नगरपंचायतीची १५ वर्षे सत्ता असतानाही मुलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्याने तलावात पाणी असूनही शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड दयावे लागत असल्याची घणाघाती टीका माजी उपनगराध्यक्ष तथा विदयमान नगरसेवक चंद्रकांत चेडे यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचे नाव न घेता केली. गेल्या काही दिवसांपासून पारनेर शहरास विलंबाने पाणीपुरवठा होत असून त्या … Read more

उपनेते अनिलभैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कौतुकास्पद उपक्रम, 28 दिवसांपासून सातत्याने दररोज 3000 लोकांपर्यंत अन्नवाटप

अहमदनगर :- देशात सध्या कोरोना विषाणूमुळे दहशत पसरली आहे. त्यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय घेत जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. नगर शहर शिवसेनेच्या वतीने संचारबंदी काळात गोरगरीब आणि गरजू आहेत, विविध ठिकाणी अडकलेले आहेत अशांसाठी अन्नछत्र मोबाईल व्हॅन तर्फे मोफत अन्न पोहोचवण्याचं काम शिवसैनिक करत आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या गोष्टी सुरु, कोणत्या बंद जाणून घ्या ही महत्वाची माहिती

अहमदनगर : कोरोना प्रसार रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कृषी, सामाजिक क्षेत्र, वन, मत्स्य उत्पादन व पशुसंवर्धन, वित्तीय क्षेत्र, मनरेगा, सार्वजनिक सोयी सुविधा आदींना चालना मिळावी, यासाठी सोशल डिस्टंटचे पालन बंधनकारक करीत परवानगी दिली आहे. कॅन्टोंमेंट झोन यातून वगळण्यात आला आहे. या आदेशातील निर्देशांचे … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील हे शहर हॉटस्पॉट केंद्र जाहीर, प्रतिबंधाची मुदत आता ०६ मेपर्यंत वाढवली

अहमदनगर :- जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी जामखेड शहरात ०२ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात दिनांक ६ मे, २०२० पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांना झाली बारामतीची आठवण, आता म्हणाले….

अहमदनगर –  जामखेडमध्येही करोनाची रुग्ण संख्या वाढली असून ही संख्या ११ वर गेली आहे.त्यामुळे प्रशासनाने तातडीने जामखेड मध्ये ‘भिलवाडा पॅटर्न’ लागू करावा, अशी मागणी अहमदनगरचे माजी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी केली आहे यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माजी मंत्री प्रा राम शिंदे म्हणाले कि , अहमदनगर जिल्ह्यात कोरोना महामारी लॉक डाऊन सुरु होऊन काल एक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे आणखी चार रुग्ण वाढले, जिल्ह्यातील रुग्णाची संख्या आता ३७ वर !

अहमदनगर Live24  :- संगमनेर येथील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. #coronaupdates#संगमनेर येथील चौघांना कोरोनाची लागण. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले अहवाल प्राप्त. #कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता ३७. पैकी २० जणांना डिस्चार्ज तर दोघांचा मृत्यू.@_Rahuld@bb_thorat @prajaktdada @mrhasanmushrif @GadakhShankarao @NagarPolice pic.twitter.com/K9CcL4Rg25 — जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर (@InfoAhilyanagar) April 23, 2020 पुण्याच्या लष्करी वैद्यकीय … Read more

राहुरीतील ६८ गावांत गरजूवंतांना घरपोच किराणा पोहोच : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

नगर : गेली ३0 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जात आहे. आजही ते नियमितपणे सुरु आहे. या लोक दरबाराच्या माध्यमातून माझ्याशी जनतेचे नाते जुळले आहे. लोक दरबारामध्ये वैयक्तिक प्रश्नांपासून शासनाचे विविध प्रश्न मांडण्याचे काम जनतेने केले आहे. ते सोडविण्याचे काम मी आजही प्रामाणिकपणे पार पाडत आहे. जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासास … Read more

साठ वर्षांच्या महिलेचा तीस वर्षीय युवकाने विनयभंग केल्याप्रकरणी अटक

पाथर्डी : करंजी परिसरातील एका खेड्यात साठ वर्षे वयाच्या महिलेचा एका तीस वर्षे वयाच्या युवकाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. महिलेने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. जमलेल्या ग्रामस्थांनाही युवकाने शिवीगाळ केली असून याबाबतवृद्ध महिलेने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, करंजीजवळील … Read more