खासदार डॉ.सुजय विखे यांचा उद्या सत्कार

कर्जत :- नगर दक्षिण चे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांचा तालुका महायुतीच्या वतीने ३१ मे रोजी कर्जत येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी विविध विकासकामांचा प्रारंभही करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या … Read more

भरदिवसा वृद्ध महिलेचे दीड तोळे सोने लुटले

श्रीगोंदा : तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे श्रीगोंदा- मांडवगण रस्त्यावर आज सायंकाळी पाच वाजता नातीसह घरी जाणाऱ्या ८० वर्षांच्या वृद्ध महिलेच्या गळयातील दीड तोळे सोन्याचे मणी हिसकावून नेले. चोरटयांनी ज़ोराचा हिसका दिल्याने रस्त्यावर पडून ही वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली आहे. लुटमार करणारा चोरटा पळताना दुचाकीला धडकल्यामुळे नागरिकांच्या तावडीत सापडला व लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात … Read more

माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा मोठा वाटा – सुजय विखे

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने बदलतील असे वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. लोकसभा निवडणूक झाली आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीतील सहकार्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. तसेच, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मुलीच भारी !

अहमदनगर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च -2019 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी च्या परीक्षेचा निकाल काल जाहिर झाला. त्यात नगर जिल्ह्याचा एकुण निकाल 88.07 टक्के इतका लागला. या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारल्याने जिल्ह्यात यंदाही मुलीच हुश्‍यार ठरल्या आहेत. यंदाच्या बारावीच्या परिक्षेला नियमित आणि पुनर्परीक्षार्थी असे दोन्ही मिळून 64हजार … Read more

आ.बाळासाहेब थोरातांपुढे जिल्ह्यात कॉंग्रेस टिकविण्याचे आव्हान !

अहमदनगर :- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे यांच्या झंझावातापुढे साऱ्यांचाच पाला पालापाचोळा झाल्याचे चित्र निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे.  फक्त अकोल्याचा गड शाबूत राखण्यामध्ये पिचड पिता-पुत्रांना यश आले. हा अपवाद वगळता इतर सर्वच विधानसभा मतदारसंघांत विखे यांचा झंझावात विरोधी पक्षातील सर्वांना नेस्तनाबूत करून गेला, हे मान्यच करायला हवे. पंतप्रधान … Read more

ब्रेकिंग : गच्चीवर खेळणाऱ्या बहीण-भावाचा शॉक बसून मृत्यू

कर्जत :- तालुक्यातील गवंडी गल्लीत घराच्या गच्चीवर खेळत असताना विजेचा धक्का बसून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. आयर्न विनय कुमार निषाद (वय ७ वर्ष) व जानवी विनय कुमार निषाद (वय ३) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि रात्री घराच्या गच्चीवर खेळत असताना आयर्न (वय ७ वर्ष) व जान्हवी(वय ३ वर्ष) या दोघांना विजेच्या … Read more

…म्हणून आरोपीच्या घरासमोरच केला पत्नी व मुलाचा अंत्यविधी!

राहुरी :- तालुक्यातील वांबोरी येथील एकाने आपल्या पत्नी व मुलाचा खून केल्याची घटना रविवारी घडली होती. त्यानंतर काल पत्नीच्या नातेवाईकाने आरोपी पतीच्या घरासमोरच या दोघांचा अंत्यविधी केला. वांबोरीतील मोरेवाडी येथे कौटुंबिक वादातून काल भारत मोरे याने आपल्या चार वर्षांच्या मुलासह पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच पकडले … Read more

आ. शिवाजी कर्डिलेंना बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुका पार पडताच शिवसेना – भाजप व महाआघाडी नेत्यांत श्रेयावाद रंगला आहे,आणि आमदार शिवाजीराव कर्डिले या वादाचे केद्रबिंदू आहेत.  खासदार डॉ. सुजय विखे यांना भाजपात येण्याची ऑफर देतानाच त्यांच्या भाजपा प्रवेशासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे आ. शिवाजीराव कर्डिले यांना डॉ. विखे यांच्या विजयाचे श्रेय मिळू नये म्हणून कर्डिले विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच कर्डिलेंना बदनाम करण्याचा … Read more

बहुजन वंचित आघाडी लढवणार जिल्हा परिषद पोटनिवडणूक

राहुरी | बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य शिवाजी गाडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ३ जूनपासून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बहुजन वंचित आघाडी ही निवडणूक लढवणार आहे. राहुरी खुर्द येथील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भावनिक मुद्दा करून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काहींच्या हलचाली सुरू आहेत. तथापि, हे चित्र लोकशाही तत्त्वात न बसणारे … Read more

संतापजनक : पारनेर मध्ये नराधम आजोबाने केला १६ वर्षीय नातीवर अत्याचार,डॉक्टरांकडे नेल्यावर नऊ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड !

पारनेर :- नगर जिल्ह्यात पुरोगामी म्हणून ओळख असणाऱ्या पारनेर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील पोखरी मध्ये स्वताच्या १६ वर्षीय अल्पवयीन नातीवर आजोबा व नातवाने गेल्या वर्षी अत्याचार केल्याने ती मुलगी गर्भवती राहिली. पोखरी येथील संबंधित आजोबा व नातवाच्या विरोधात पारेनर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या दोघांना अटक केली … Read more

खासदार झालेला नातू आजोबांचे स्वप्न कसे साकारणार ?

राहाता :- स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी तब्बल आठ वेळेस संसदेत प्रतिनिधित्व केले. त्यामुळेच केंद्रीय मंत्री होऊन देखील लोकमानसात ‘खासदारसाहेब’ हे अढळ स्थान प्राप्त केले. साहेबांच्या रूपाने या विखे घराण्यात साडेतीन दशके खासदारकी नांदली. आता खासदारसाहेबांचे वारसदार डॉ. सुजय हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने विखे पाटील परिवारातील व्यक्ती पुन्हा खासदार झाले. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदानंतर बाळासाहेब … Read more

बसची वाट पाहत उभ्या असलेल्या शिक्षकाला मारहाण

अहमदनगर :- घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या शिक्षकाला बळजबरीने चारचाकी वाहनात बसून मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याची अंगठी व इतर कागदपत्रे असा ३७ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेण्यात आला. ही घटना २४ मे रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील वाळूंज बायपास शिवारात घडली. सुरेश नीळकंठ उगले (३५, घोगरगाव, ता. श्रीगोंदे) असे … Read more

पालकमंत्री राम शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली – रोहित पवार

अहमदनगर :- जातीयवादी शक्ती व मनुवादी विचारांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत मनसे, वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेतले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी रविवारी जामखेड दौऱ्यात व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पवार आले होते. विविध गावांमध्ये जाऊन भेटी घेतल्यानंतर जामखेड येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पवार म्हणाले, देशात चुकीचे … Read more

सुजय विखेंच्या यशात शिवाजी कर्डिले यांचा संबंध नाही !

अहमदनगर :- डॉ. सुजय विखे यांना अहमदनगर मतदारसंघातून तब्बल २ लाख ८१ हजार ४७४ मताधिक्य मिळाले. पाथर्डी तालुक्यातून सर्वाधिक ५४ हजार ८३५ मताधिक्य असून दुसऱ्या क्रमांकाची ५४ हजार १४९ मते नगर तालुक्यातून मिळाली. या मताधिक्यात महाआघाडी आणि निष्ठावंत भाजपचा वाटा आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांचा या यशात कोणताही संबंध नाही. त्यांना जनतेने सपशेल नाकारले, असा … Read more

ब्रेकिंग : राहुरीत पत्नी अन मुलाची निर्घुण हत्या

राहुरी :- तालुक्यातील बांबोरी येथे पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केली. भारत मोरे असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी संध्या मोरे आणि मुलगा साई मोरे याची केली हत्या केली. वांबोरी परिसरात मोरेवाडी आज दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास भारत ज्ञानदेव मोरे(वय-30) याने पत्नी संध्या मोरे ( वय-28) मुलगा साई मोरे (वय-5) या दोघांची धारदास शस्त्र बॅटने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून या 35 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त !

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचा पावणेतीन लाख मतांनी पराभव केला. दक्षिण लोकसभा निवडणुकीत 19 उमेदवार खासदारकीच्या रिंगणात उतरले होते. तर शिर्डी लोकसभा मतदार संघात 20 उमेदवारांनी नशिब अजमावले होते. या दोन्ही मतदार संघात 39 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी 35 उमेदवारांची … Read more

भाजपाचा प्रचार करणाऱ्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर – लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मतमोजणीच्या दिवशी नगर शहरातील गांधी मैदान येथे गुरुवार (दि.२३) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. समीर गवळी (रा.शिला विहार, गुलमोहोर रोड) याने फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सूरज सुभाष जाधव, ऋषिकेश (भैय्या) कैलास डहाळे, दर्शन करंडे यांच्यासह … Read more

नगर दक्षिणेतून सुजय विखे तर शिर्डीतून सदाशिव लोखंडे खासदार !

अहमदनगर :- सतराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. अहमदनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी – उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा २ लाख ७५ हजार ७१० मतांनी पराभव केला. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार तथा सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा १ लाख २० हजार १९५ … Read more